कर्करोग हा माणसाला कधीच होऊ नये. झालाच तर त्याच्याकरिता कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन पुनर्वसन केंद्रासारखे मदतगार मिळावे. कारण कर्करोगी व्यक्ती एकच असते परंतु त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होत असतो. संपूर्ण कुटुंब या आजारपणाभोवती गुरफटले जाते. त्यामुळे या रोगग्रस्त व्यक्तीची मानसिक स्थिती ढासळते. तसेच त्याच्या कुटुंबाचीही केवळ मानसिक स्थितीच नाही तर आर्थिक स्थितीही ढासळते. परिणामी कुटुंब उध्वस्त होण्याची देखील वेळ येते. मात्र या सर्वांना एक आशेचे किरण म्हणजे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन पुनर्वसन केंद्र आहे. अशी माहिती केंद्राच्या जनसंपर्क संचालिका सुमन अग्रवाल यांनी दिली.
सदर केंद्राच्या माध्यमातून अग्रगण्य रिटेल आउटलेट्स, ट्रेड शो, प्रदर्शने, कॉर्पोरेट हाऊसेस आणि वैयक्तिक ग्राहकांद्वारे विकल्या जाणाऱ्या कलात्मक, विक्रीयोग्य उत्पादनांची निर्मिती असे अनेक उपक्रम राबविले जातात. आता सुरु असलेल्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उत्सवांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची निर्मिती करण्यात आली आहे. या वस्तूंची माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने आज ४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रेस क्लब येथे या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तसेच प्रसिद्धी माध्यमांशी संवादही साधण्यात आला. यावेळी केंद्राच्या कार्यकारी संचालिका श्रीमती मंजू गुप्ता, सीईओ सप्रू बिसेन यांच्यासह प्रत्यक्ष कर्करोगग्रस्त ज्यांनी या वस्तू बनवल्या ते आणि त्यांचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्करोगामुळे निर्माण होणाऱ्या प्रत्येक समस्येवर समाधान देण्याचे कार्य सदर केंद्राकडून अव्याहतपणे होत आहे. या केंद्रासोबत मी नुकतीच काही दिवसांपूर्वी जोडल्या गेलेली आहे. मी अनेक समाजसेवी संस्थांसोबत काम केले आहे. माझ्या कामाचा अनुभव पाहून या केंद्राने मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. ही संधी मला अधिक काम करण्यासाठी स्फूर्तीदायक ठरणार आहे. विशेष करून जनसंपर्काचे काम माझ्याकडे असल्याने मला या केंद्राकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबतची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत कधी पोहोचवता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहिन. या केंद्राचे कार्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पत्रकारांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन शेवटी अग्रवाल यांनी केले.
श्रीमती मंजू गुप्ता यांनी 1987 मध्ये स्थापन केलेले, हे केंद्र रूग्णांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी, त्यांच्या एकूण जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी समर्पित आहे. आजपर्यंत, CPAA पुनर्वसन केंद्राने 32,447 रुग्ण आणि कुटुंबांचे यशस्वीरित्या पुनर्वसन केले आहे. हे पोषण आणि सहानुभूतीपूर्ण वातावरणात विशेष प्रशिक्षण देते, रूग्णांना नवीन कौशल्यांसह सुसज्ज करते जे भविष्यातील रोजगाराच्या संधींचे दरवाजे उघडतात. केंद्राच्या पुढाकारांमध्ये अग्रगण्य रिटेल आउटलेट्स, ट्रेड शो, प्रदर्शने, कॉर्पोरेट हाऊसेस आणि वैयक्तिक ग्राहकांद्वारे विकल्या जाणाऱ्या कलात्मक, विक्रीयोग्य उत्पादनांची निर्मिती समाविष्ट आहे. मिळणारा महसूल गरीब कर्करोग रुग्णांना मदत करतो. त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान, रुग्णांना आणि काळजीवाहूंना बिनशर्त समर्थन मिळते, ज्यात रोजगार, कर्करोगाची औषधे, कुटुंबासाठी मासिक रेशन, भाड्याची प्रतिपूर्ती आणि आवश्यक तेथे शाळेची फी यांचा समावेश होतो. व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये टेलरिंग, भरतकाम, दिया आणि मेणबत्ती बनवणे, स्क्रीन प्रिंटिंग, बॉक्स मेकिंग आणि ब्रेस्ट प्रोस्थेसिस क्राफ्टिंग यांचा समावेश होतो. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) चे पुनर्वसन केंद्र कर्करोगाच्या रूग्णांसाठी आशा आणि सशक्तीकरणाचे किरण आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्याद्वारे त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान पुन्हा मिळवता येतो. आम्ही परोपकारी आणि कॉर्पोरेशनचे वंचित कर्करोग रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमच्यात सामील होण्यासाठी स्वागत करतो, असे म्हणत केंद्राच्या कार्यकारी संचालिका श्रीमती मंजू गुप्ता यांनी या प्रभावी उपक्रमाला आणखी समृद्ध करण्यासाठी सहकार्याचे आमंत्रण दिले.
0 टिप्पण्या