एस.सी.,एस.टी. व्ही.जे.एन.टी. आणि मुस्लीम यांच्यासह बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी व त्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी तसेच देशाचे गौरवशाली संविधान वाचवण्यासाठी आझाद समाज पार्टी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा आज पक्षाच्या वतीने करण्यात आली. आजाद समाज पार्टी- भिमआर्मी चे संस्थापक खा. चंद्रशेखर आजाद यांचे आदेशानुसार महाराष्ट्र प्रभारी अविनाश शांती, महाराष्ट्र अध्यक्ष आनंद लोंढे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष इम्तियाज पिरजादे यांचे नेतृत्वामध्ये आगामी विधानसभा पुर्ण ताकदीने सर्वांना सोबत घेवून लढवणार असल्याची माहिती आज प्रसिद्धी माध्यमांना दिली. मुंबईतील प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या वतीने याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी अॅड. सुमित साबळे, कैलास जैस्वार, जितेंद्र निकाळजे, यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने चंद्रशेखर आजाद यांची महारॅली आयोजित करण्यात येत आहे. मुंबई, धुळे, अमरावती, नागपुर, औरंगाबाद व सोलापूर या ठिकाणी मोठ्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत. यामुळे अधिक संख्येने बहुजन समाज आझाद समाज पार्टीकडे वळणार आहे. प्रस्थापिक आंबेडकरी पक्षांसोबत आमची बोलणी सुरू असून आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. यातून काही सकारात्मक निर्णय होईल आणि येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच आंबेडकरवादी जनतेला आशादायी चित्र पहायला मिळेल असा आशावाद मुंबईचे प्रभारी (महासचिव) जितेंद्र निकाळजे यांनी व्यक्त केला.सर्व राखीव जागासहित मुस्लीम बहुल क्षेत्रात मुस्लीम उमेदवार, एससी राखीव मध्ये एससी उमेदवार या फार्मुला "जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी" या फार्मुला लावण्यात येणार आहे. या फार्मुला प्रमाणे उमेदवार निवडण्यात येणार आहेत. आतापर्यंत औरंगाबाद मध्ये " डॉ. नामवंत", औरंगाबाद पुर्व " पटेल बिरादरी" औरंगाबाद पश्चिम "राखीद", सोलापूर मध्य "काँग्रेसचे माजी महापौर " मोहोळ " माजी आयएएस", अमरावती, अचलपूर परतवाड " माजी महापौर नगरसेवक", धुळे, नागपूर, नाशिक, भिंवडी, मालेगांव, नांदेडमध्ये इच्छूक उमेदवारांची यादी पक्षाकडे तयार असल्याचे अविनाश शांती यांनी सांगितले.
मुंबई मधील भायखळा, वांद्रे, कुर्लासह जवळपास ४० ते ५० जागा बहुतांश उत्तर भारतीय बहुसंख्य मतदार संघ असलेल्या जागा पक्ष निवडणूक लढवणार आहे. यासाठी मुंबईतील आमच्या पॉकेट जागा आणि तिथे पक्ष बांधणीचे काम जोरात सुरू असून यावेळी प्रस्थापित पक्षांना जनता आपली जागा दाखवेल आणि आझाद समाज पार्टीच्या उमेदवारांना नक्कीच न्याय देईल. असा विश्वास मुंबई प्रदेश अध्यक्ष चाँद शेख यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या