सेवा संस्था, बदलापूर यांच्या विद्यमाने रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी एकदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शांतीप्रकाश हॉल, कुर्ला कॅम्प, गुरु नानक हायस्कूलजवळ, उल्हासनगर -4, जि. ठाणे येथे दिवसभर चालणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन डॉ. संजय अपरांती हे करणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर सारंग थोरात हे
स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचे मुख्य संयोजक म्हणून बी. अनिल तथा अनिल भालेराव हे काम पाहत आहेत. ते सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या उद्घाटन सत्रात संमेलनाची भूमिका मांडतील. राजेश वानखेडे, रोहित साळवे व किरण सोनवणे यांची यावेळी विशेष उपस्थिती असेल. उद्घाटनसत्राचे सुत्रसंचालन प्रा. अनिल कवठेकर तर आभार प्रदर्शन शामराव सोमकुवर हे करतील.
दुपारी : १२:३० वाजता "भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण समाजाची संकल्पना" या विषयावर प्रा. प्रेमरत्न चौकेकर यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या परिसंवादात वक्ते म्हणून प्रा. दफेदार अकीफ असणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुधाकर सरवदे हे करतील. दुपारच्या भोजनानंतर ३ वाजता दुसरे सत्र सुरू होईल. या सत्रात अनिल भालेराव यांच्या 'घुसमट' कथासंग्रहातील निवडक कथांचे कथाकथन प्रणय वानखेडे व ममता मयूर आढाव हे करतील . या सत्राचे सूत्रसंचालन सौ. प्रीती माने करतील. दुपारीः ३:३० वाजता कार्यकारणी सत्कार आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल. संध्याकाळी ४ वाजता "मराठी साहित्यातील आंबेडकरी साहित्याचे योगदान" या विषयावर नारायण सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या परिसंवादात वक्ते म्हणून प्रा. प्रज्ञाकिरण वाघमारे व डॉ. आशालता ब्राह्मणे हे उपस्थित राहतील. या सत्राचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. राजू वानखेडे हे करतील. संध्याकाळी ५:३० वाजता संगीता लव्हाळे या एकपात्री नाटक "मी सावित्री बोलते" सादर करतील. प्रा. उत्तम भगत यांच्या अध्यक्षतेत संध्याकाळी ५:४५ वाजता निमंत्रितांचे भव्य कवीसंमेलन होईल. या सत्राचे सूत्रसंचालन मिलिंद जाधव हे करतील. कवी संमेलनात
अश्विनी म्हात्रे, विना मेश्राम, प्रिया मयेकर, जयवंत ठोसर, प्रभा ढाले-ठोसर, माधुरी फाटक, शितल चेंदवणकर, वैभवी माने, राजेंन्द्र मार्कंडेय, सुधाकर सरवदे, भटू जगदेव, शाम बैसाणे, सिध्दार्थ मगर, देवीलाल रौराळे, अशोक भालेराव, विक्रम गांगुर्डे, प्रीती माने, अजय शिवराम गणविर, स्मिता भद्रीगे, राजेश साबळे, सुभाष आढाव, मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव, विजय भोईर आदी कवींना निमंत्रीत करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष सद्धममकार प्रा. आनंद देवडेकर हे समारोपाचे भाषण करतील. या सत्राचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शामराव सोमकुवर हे करतील. या आंबेडकरी साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक बी. अनिल तथा अनिल भालेराव यांनी केले आहे.
0 टिप्पण्या