Top Post Ad

सहा दशकांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा


मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली   एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. 
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके....' असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठी भाषेला जवळपास २००० वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी २०१३ सालापासून प्रयत्न केले जात होते. त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती.

 अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात
1) संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
2) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.
 अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.
3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
२००४ मध्ये देशातील तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली.
तामिळनंतर २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगू,२०१३ मध्ये मल्याळम, २०१४ मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. 
देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता.
संकलन - संजीव वेलणकर पुणे.


''' लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...' 'अमृतातेहि पैजा जिंके' अशी महती असलेल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही लोकसभेत आवाज उठवला आणि अखेर आज तो भाग्याचा दिवस उजाडला याचा अभिमान आहे. गेल्या १० वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित असणारा मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्याबद्दलचा प्रस्ताव आज अखेर केंद्राने मंजूर केला याचा आनंद आहे. आजचा दिवस सर्व मराठी भाषा प्रेमींसाठी गौरवाचा दिवस आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्वरित जाहीर करावा ही मागणी मी लोकसभेत जुलैमध्ये केली होती. राज्यात काँग्रेसची सरकार असताना मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीच्या समृद्ध इतिहासाचा सबळ पुरावा देणारा तज्ञांचा अहवाल ११ जुलै २०१४ रोजी केंद्राकडे सादर केला होता. मात्र या अहवालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रावर सूड उगवणाऱ्या त्यांच्या सरकारने मागील दहा वर्षांत काहीही निर्णय घेतला नव्हता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपाच्या याच मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दलच्या द्वेषाची खबर घेतली, त्यांना चांगलाच धडा शिकवला. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने अखेरेस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला. असो.. सर्वांना पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा. -  खासदार वर्षा गायकवाड

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. गेल्या सहा दशकांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून, जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्र, तर्फे आपण २०२३,जानेवारी महाराष्ट्र पत्रकार दिनाच्या निमित्ताने "प्रभादेवी, दादर येथील पु ल देशपांडे कला अकादमी मध्ये,मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून विशेष परिसंवाद आयोजित केला होता, आजच्या बातमीने खरोखरच आनंद झाला आहे, आपल्या मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, हा आमच्या भाषेचा गौरव आहे," मी मराठी, माझी भाषा मराठी"! नारायण पांचाळ (जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्र)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com