Top Post Ad

रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीत शंभर उमेदवार जाहीर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विधानसभेच्या निवडणुकीत  शंभर उमेदवार जाहिर केले असल्याची घोषणा पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषद मध्ये अधिकृतरित्या सर्व उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील,  महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुनिताताई चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्यासह  महाराष्ट्र सचिव अशोक ससाणे, महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड, महाराष्ट्र सचिव रमेश भोईर, कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे, नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, ठाणे शहर अध्यक्ष दयानंद उलमी, मुंबई संघटक नितीन जाधव, कल्याण - डोंबिवली अध्यक्ष किसन वक्ते इत्यादी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  लोकसभेमध्ये संविधान वाचविण्यासाठी संविधान विरोधी लोकांना सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला बिनशर्त पाठींबा दिला. विधानसभेमध्ये रिपब्लिकन जनतेला सत्तेमध्ये सन्मान पुर्वक संधी दयावी यासाठी पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीकडे इच्छा व्यक्त केली. महाविकास आघाडीने आतापर्यंत काही विचार केला नाही. तेव्हा आम्ही आमच्या पक्षाचे अस्तित्व राखण्याकरिता पहिली उमेदवार यादी घोषित करीत आहोत व लवकरच दुसरी यादी घोषित करु असे मत दिपकभाऊ निकाळजे यांनी व्यक्त केले.

लोकशाही संपवण्यासाठी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या शक्तींना सत्तेवरून हटवा.
सरकारी सेवांमधील अनुसूचित जाती/जमाती/मागासवर्गीयांचे रिक्त कोटे भरून बेरोजगारी दूर करणे.
ज्या खाजगी उद्योगांना भारत किंवा राज्य सरकारांनी कमी दरात जमीन आणि अनुदान दिले होते त्यांना त्या उद्योगांमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे.
आरक्षणातील 50 टक्के मर्यादा हटवून मराठा समाजाला आरक्षण देऊ.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे जे बांधकाम सुरू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करणे.
मुंबईतील अण्णाभाऊ साठे स्मारकाचे पूर्ण करणे
इतर राज्यांप्रमाणेच मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा आणि 200 युनिटपर्यंत वीज सर्वांना देणे.
जातीनिहाय जनगणना करणे.
भूमिहीन शेतकऱ्यांना महार वतन शेतजमिनीचे हक्क मिळवून देणे.
वर्षानुवर्षे वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देणार.
वाढती बेरोजगारी आणि महागाईला आळा बसण्यासाठी उपाययोजना करणे.
महिलांचे कल्याण आणि सुरक्षा मजबूत करणे. 
शेतकरी MSP लागू करून त्यांची पिके खरेदी करतील
अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करणे 
इत्यादी मुद्यांवर या निवडणुकीला आम्ही सामोरे जात असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील यांनी स्पष्ट केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com