Top Post Ad

हिंदू-मुसलमानांत फूट पाडून गोंधळ निर्माण करणे हा त्यांचा आवडता छंद

महाराष्ट्रासारखे प्रगत आणि सुजलाम् सुफलाम् राज्य दिवाळखोरीत गेले. त्यामुळे घराघरांत दिवाळी साजरी होत आहे ती कर्ज काढून. दिवाळी आनंदात साजरी करायची की अंधारात, हे यापुढे श्रीमंत अदानी महाराज ठरवतील. कारण मोदी-शहा आल्यापासून सर्व प्रकारच्या लक्ष्मीपूजनाचा मान फक्त त्यांनाच मिळत आहे,  महाराष्ट्र लुटणाऱ्यांचा पराभव करावाच लागेल,  असं म्हणत उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या दिवाळी अंकातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षाचे होतील व ते ठरल्याप्रमाणे निवृत्त होतील अशी वेडी आशा काही देशभक्तांनी धरली आहे. त्यामुळे मोदी गेलेच तर पंत जाऊन कोणते राव त्या पदावर चढतील व देशाला हुकूमशाहीच्या जाचातून मुक्त करतील तेच पाहायचे आहे, लोकसभा निवडणुकांत जनतेने मोदींचे विमान जमिनीवर आणले. चारशे पार जागा जिंकून देशाचे संविधान बदलण्याचा त्यांचा इरादा होता. चारशे पार या अहंकाराच्या फुग्यास टाचणी लावली ती महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी. या दोन्ही राज्यांतील जनता शहाणपणाने वागली व त्याच शहाणपणाने मतदान करून मोदींच्या बहुमताचा घोडा अडवला. मोदी यांनी सत्ता स्थापन केली, पण दोन 'सेक्युलर' म्हणवून घेणाऱ्या नेत्यांच्या कुबड्यांवर ते राज्य करीत आहेत, मोदींसारख्या विश्वगुरूने कुबड्यांचा आधार घेत राज्य करणे त्यांच्या इभ्रतीस शोभत नाही. पण सेक्युलर कुबड्यांवर लटकत त्यांच्या हिंदुत्वाच्या गर्जना सुरूच आहेत. पंतप्रधान हे एका जातीधर्माचे नसतात. ते देशाचे व अखिल समाजाचे असतात. पण हिंदू-मुसलमानांत फूट पाडून गोंधळ निर्माण करणे हा देशाच्या पंतप्रधानांचा आवडता छंदच बनला आहे, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

मोदी हे जर हिटलरचा मार्ग स्वीकारत असतील तर त्यांना तेही धडपणे जमलेले नाही. फार थोड्या वर्षांत हिटलरने जर्मनीला अफाट सामर्थ्य दिले. त्याची कर्तबगारी विलक्षण होती! पण हिटलरला एक गोष्ट कधीच समजली नाही. कुठे थांबावे ते त्याला समजले नाही! त्यामुळे त्याने स्वतः बरोबर जगाचाही विध्वंस करून घेतला. माणसाचे मोजमाप त्याच्या उद्दिष्टावरून आणि कर्तबगारीवरून केले जाते, "'चारशे पार' च्या वखवखत्या दौडबाजीस महाराष्ट्राने लगाम घातला. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आला. आता विधानसभा निवडणुकांचे मैदान जवळच आहे. हे मैदान मारून महाराष्ट्र लुटणाऱ्या मिंधे व त्यांच्या दिल्लीतील 'शाह्यां' चा पराभव करावाच लागेल," असं ठाकरेंनी मनोगताच्या शेवटी म्हटलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com