Top Post Ad

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सावरकर...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं ‘फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स’ अशा नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत कौतुक करण्यात आलेलं आहे. अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मुख्य प्रयत्न झाले होते. सावरकर हे विज्ञानवादी होते व काँग्रेसची विचारसरणी सुधारण्याची गरज आहे”, असं परखड मत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या  "फाईव्ह डिकेड्स ईन पॉलिटिक्स" याआत्मचरित्रात मांडुन कांग्रेसलाच "घरचा आहेर"  दिला आहे..  आम्ही नेहमीच म्हणत असतो कांग्रेस हा दुटप्पी विचारांचे लोकांचा पक्ष आहे... राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी वि.दा.सावरकर यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते व त्यावरून नाशिक येथील कोर्टात खटला सुरू होता... आता नुकतेच समन्स बजावण्यात आले आहे अशी बातमी  सकाळ ,  लोकमत व इतर मिडिया मध्ये आली आहे...... राहुल गांधी यांनी घेतलेल्या भुमिकेच्या एकदम विरोधात भूमिका कांग्रेसचे एक दलित समाजातील असलेले पण नेहमीच पांढरपेशी भुमिका घेत असलेले नेते   सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक असल्याने काँग्रेसची आता कोंडी होण्याची शक्यता आहे.  

    एकिकडे सावरकर यांच्या वर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांना "कोर्टकचेरीचा" त्रास सहन करावा लागत आहे व  कोर्टाने "समन्स" बजावत राहुल गांधीला "कटघर्यात" ऊभे करत असताना दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांनी सावरकरांची स्तुती आत्मचरित्रात करून कांग्रेस व राहुल गांधी यांनाच "कटघर्यात" ऊभे केले आहे असे दिसून येते.       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी "अस्पृश्यता व जातियवाद" संपवण्यासाठी ऊभी हयात खर्ची घातली होती हे सर्वश्रुत आहे... आता सुशीलकुमार शिंदे यांना जर सावरकर यांनी "अस्पृश्यता व जातियवाद"  संपवण्यासाठी खुप मोठे योगदान दिले असं सुचवायचे आहे... तर मग प्रश्न उरतो "डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याचे काय ?" कि नेहमीप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य सुशीलकुमार शिंदे सारखे पांढरपेशी कांग्रेसी दलित पुढारी अनुल्लेखाने दुर्लक्षित करत आहेत ? 

    सुशीलकुमार शिंदे यांनी "कांग्रेस पक्षाला घरचा आहेर" देताना आत्मचरित्रात असेही म्हटले आहे की "कांग्रेसने आपली विचारसरणी सुधारण्याची गरज आहे". म्हणजेच कांग्रेसने कोणती विचारसरणी स्विकारावी असं सुशीलकुमार शिंदे यांना अभिप्रेत आहे ? कांग्रेस स्वतःला "धर्मनिरपेक्ष विचारांचा पक्ष" (ते तसे नसुन सुध्दा) म्हणवत असते....मग सावरकर तर हे "कट्टर हिंदुत्ववादी" विचारांचे होते व कांग्रेसने सुध्दा सावरकरांचे "कट्टर हिंदुत्व"  स्विकारून बिजेपी प्रमाणेच "कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष" व्हायला पाहिजे असे तर सुशीलकुमार शिंदे यांना सुचवायचे नाही ना ? की बिजेपीला खुश करण्यासाठी तर सुशीलकुमार शिंदे यांनी सावरकरांवर अशी स्तुतीसुमने उधळली नसतील ना ?  आम्ही नेहमीच म्हणत असतो *"कांग्रेस व बिजेपी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत"*... आणि हे वारंवार सिद्ध होते आहे...

 धनराज मोहोड... नवी मुंबई..


२५ मे १९८३ ला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळयाच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर असल्याने मी त्या कार्यक्रमाला गेलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद निवारणात सावरकरांचे मोठे काम आहे. सावरकरांना मी पाठिंबा दिला ह्या मुद्यावर मी ठाम राहिलो. जातीयवाद संपवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. मी स्वतः मागासवर्गातला असल्यामुळे सावरकरांच्या या प्रयत्नांचे मला विशेष महत्व वाटते.  वास्तविक सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेऊन सावरकर उभे राहिले. त्यामुळे त्यांना अनेकदा त्रास सोसावा लागला. सावरकरांबाबतचे संकुचित विचार हे आपल्यासमोरचं एक आव्हान आहे असं मी मानतो”, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलं.
सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात काँग्रेसच्या वाटचालीबाबतही भाष्य केलं आहे. “प्रदीर्घ काळ राजकारणात काम केल्यानंतर मला असे वाटते की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे”, “मला असेही वाटते की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हा आपला नेता असतो, मग तो कोणत्याही राज्याचा असो. आणि आपण प्रदेशाध्यक्षांकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे. मात्र हे होत नाही. यामागचं कारण मला असं वाटतं की, राजकीय सत्ता आणि मुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदांचाच मोह असतो. पण इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की, पक्ष आतून मजबूत असला तरच तुम्हाला सत्ता मिळते. ह्याची बरीचशी उदाहरणं आपण अलीकडच्या काळात अनेक राजकीय पक्षात पाहात आहोत”, असं सुशीलकुमार शिंदे आपल्या आत्मचरित्रात म्हणाले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com