महात्मा गांधी ह्यांच्या जयंती निमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ह्या दरम्यान "स्वच्छ्ता ही सेवा" ह्या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. ह्यात संपूर्ण भारतात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत तसेच विविध कार्यक्रम किर्ती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ही राबवले . ह्यात स्वच्छता ही सेवा हा संदेश आत्मसात करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी एकत्र स्वच्छतेबद्दल शपथ घेतली. कचऱ्याचे योग्य नियोजन आणि प्लास्टिकचा होणारा घातक परिणाम ह्यावर गौरी गुरव ह्यांनी मुलांना सत्राद्वारे खूप छान मार्गदर्शन ही केले. २५सप्टेंबर ते २९ सप्टेंबर " स्वच्छ्ता ही संपत्ती खरी... करू जनजागृती घरोघरी! " ह्या मोहिमेअंतर्गत स्वच्छतेबद्दल स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन ही करण्यात आले होते.
सोबतच " स्वच्छता ही सेवा " हा प्रण घेतल्यामुळे समुद्रकिनारी वाढत्या कचऱ्याचे आणि त्यात प्रकर्षाने प्लास्टिकचे प्रमाण पाहता ह्या उपक्रमाअंतर्गत ३ वेळा समुद्र किनारे स्वच्छता मोहीम ही राबविण्यात आली. ह्या मोहिमेदरम्यान काही स्वयंसेवकांनी समुद्र किनारी पडलेल्या प्लास्टिकच्या झाकणांचा ढीग पाहता त्यातून काहीतरी कलात्मक बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठीच ३० सप्टेंबर ला पुन्हा एकदा समुद्रकिनारी बॉटल कॅप कलेक्शन ड्राईव्ह काढण्यात आली तसेच १ ऑक्टोबर रोजी कीर्ती महाविद्यालयातील मैदानात एन.एस.एस स्वयंसेवकांनी त्याच साचलेल्या प्लास्टिकच्या झाकणांचा वापर करत बेस्ट आऊट ऑफ वेस्ट अशी रांगोळी काढली. ह्या संपूर्ण उपक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद जोग सर सोबतच उपप्राचार्य डॉ. मीनल म्हापुस्कर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले सोबतच कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश दळवी सर आणि प्रा. पूजा कांबळे मॅडम ह्यांनी योग्य ते नियोजन करत सर्वांना योग्य ते मार्गदर्शन केले. "स्वच्छता ही सेवा" ह्या उपक्रमातून महात्मा गांधी यांच्या स्वच्छ्तेविषयी असणाऱ्या विचारांना खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात आत्मसात करण्याचा आणि त्यांना एक आदरांजली देण्याचा प्रयत्न कीर्ती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केला असल्याची माहीती ओमकार वाककर यांनी दिली.
0 टिप्पण्या