नऊ रात्री उत्सवानिमित्त मुंबईतील सिद्धार्थ कॉलनी येथील छेदी भय्या नावाने प्रसिद्ध गुप्ता कुटुंबाने त्यांच्या तळमजल्यावरील किराणा दुकानात घट स्थापना केली होती. शनिवारी रात्री पूजाअर्चा करून गुप्ता कुटुंब गाढ निद्रेत् असताना सकाळी 5 च्या सुमारास घटामधील दिवा उंदीराने खाली पाडला. हा दिवा नेमका गुप्ता किराणा मधील विक्री करण्यासाठी आणलेल्या केरोसीनच्या साठ्यावर पडून त्याला आग लागली. गुप्ता व प्रेम गुप्ता यांनी सुरुवातीला आग विझविण्यासाठी त्यावर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण केरोसीनच्या साठ्यावर पाणी टाकल्याने केरोसीन सर्व तळमजल्यावर पसरल्याने आग अधिक भडकत गेली. आगीचा भडका वाढल्याने पहिल्या मजल्यावर व दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात धुर झाला यात गुप्ता याचे कुटुंब गुदरमरून गेले स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण पाणी आणि केरोसीन यामुळे आग व धुराच्या लोळांनी या कुटुंबातील 4 जणांचा बळी गेला. तर इतर 3 जण् गंभीर भाजल्यामुळे अग्निशमन पथकांच्या जवानांनी आणि स्थानिकांनी त्यांना राजावाडी रुग्णाल्यात दाखल केले पण तेथे दाखल करण्याअगोदरच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये 30 वर्षीय प्रेम गुप्ता, 30 वर्षीय मंजू प्रेम गुप्ता, 39 वर्षीय अनिता गुप्ता, 10 वर्षीय निष्पाप नरेंद्र गुप्ता आणि 7 वर्षीय मुलगी परी गुप्ता यांचा समावेश् आहे.
मुंबई पोलीस आणि अग्निशमन विभागाला रविवारी, 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.20 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. एका इमारतीच्या तळमजल्यावर बांधलेल्या दुकानात ही आग लागली. या भीषण आगीत इमारतीमध्ये तळमजल्यावर असलेल्या दुकानातील इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आदी साहित्य जळून खाक झाले. प्राप्त माहितीनुसार, ही एक दुमजली झोपडी होती, ज्यात तळमजल्यावर दुकान चालू होते आणि वरच्या दुसऱ्या मजल्यावर मृत नरेंद्र गुप्ता तर पहिल्या मजल्यावर प्रेम गुप्ता असे कुटुंब राहत होते. तर तळ मजल्यावर गुप्ता व त्याची आजारी पत्नी राहत होती. गुप्ता कुटुंबीय मागील 50 वर्षापासून किराणा मालाचे दुकान चालवीत होते. यात अनेक घरगुती किराणा पासून ते स्वयंपाकासाठी लागणाऱ्या ज्वलन्शील अशा रॉकेलचा ही समावेश होता.
आगीचे वृत्त समजतात कॉंग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे, शिवसेना आमदार प्रकाश फातरपेकर, माजी नगरसेविका आशा मराठे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेबाबत अग्निशमनं दल व मुंबई पोलीस यांच्याकडून या संबंधी माहिती घेतली तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. खासदार चंद्रकात हंडोरे यांनी पीडित कुटुंबाला सरकाराने आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, मंगलप्रभात लोढा, आनंदराज आंबेडकर यांनीही तातडीने घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. पीडित कुटुंबाला 5 लाख प्रती व्यक्ती सहाय व सरकारी खर्चाने उपचार व घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. घटना स्थळावर मुंबई पोलीस,चेंबूर पोलीस ठाण्याचे यांच्या,कर्मचारी,महानगर पालिकेचे एम पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियांता निकाळजे, तसेंच इ व का चे अभियंते या दुर्घटनेची चौकशी करत आहेत.
0 टिप्पण्या