* ठाणे महानगरपालिकेचा ४२वा वर्धापन दिन आज, मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरिश झळके उपस्थित होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच, कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक उपस्थित होते.
महापालिकेच्या. बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात महनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आयुक्त सौरभ राव यांनी अभिवादन केले. यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, सचिन पवार, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, टीएमटीचे व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, सहाय्यक आयुक्त अलका खैरे आणि भालचंद्र घुगे, उपनगर अभियंता गुणवंत झांब्रे, विनोद पवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी चेतना के, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.,
अग्निशमन दल, सुरक्षा दल, एमएसएफ यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व जवाहर बाग अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप कदम आणि बाळकूम अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद काकळीज यांनी केले.
0 टिप्पण्या