Top Post Ad

आमचा अजेंडा जो मंजूर करेल त्या युती-आघाडीबरोबर आम्ही जाऊ - अण्णासाहेब कटारे

 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आपआपल्या राहुट्या संभाळत आहेत. त्यातच  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने देखील आपला झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू केला आहे. मुंबईमध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली आहे. सर्व स्तरातील लोक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दररोज असंख्य नेते कार्यकर्ते जेष्ठ नागरिक महिला युवक युवती पक्षात दाखल होत असल्याचा दावा आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला.  मुंबईच्या बऱ्याचशा भागात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपले जाळे पसरविले आहे. मुंबईमध्ये आणखी पक्षाची ताकत भक्कमपणे उभी करण्यासाठी पक्षाने जुने जाणते रिपब्लिकन नेते अनंत पांचाळ यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये पक्ष बळकट होण्यास मदत होईल असा विश्वासही कटारे यांनी अनंत पांचाळ यांच्या निवडी प्रसंगी केला. यावेळी पक्षातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 


  देशात आरक्षणाच्या प्रश्नावरून गोंधळ सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती-जमातीमध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती-जमाती समूहामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आप-आपसात वाद होतील व अनुसूचित जाती जमाती एकत्र असलेले समूह विखुरला जाईल याची भीती आहे. राज्यांना वर्गीकरणाचे आदेश देण्यात आले असले तरीही गैरवापरच जास्त होण्याची शक्यता आहे.देशातील प्रस्थापित, सत्ताधारी व विरोधी पक्ष मागासवर्गीय यांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करतात मात्र निर्णयाबाबत ते मूग गिळून बसल्याचे चित्र यात दिसत आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीची जनगणना झालेली नाही मग वर्गीकरण कशाच्या आधारावर होणार हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.सुप्रीम कोर्टान आदेशात क्रिमिलियरची तरतूद केलेली आहे ही तर भयावह अशीच बाब आहे. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी यावेळी आण्णासाहेब यांनी केली. 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. आमच्या पक्षाचा एक स्वतंत्र अजेंडा आहे. या अजेंडा ज्या पक्षाला मंजूर असेल. तसेच आमच्या या अजेंड्याप्रमाणे जो आम्हाला सत्तेत सहभागी करून घेऊन त्यांच्या सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. मात्र आमच्या अजेंड्याशी फारकत घेऊन आम्ही कोणासोबतही जाणार नाही. ही पक्षाची भूमिका कायम राहिल असेही कटारे यांनी यावेळी स्पष्ट केले. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com