कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदाची जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी आज २० सप्टेंबर रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन कल्याण डोंबिवली तर्फे अतिरीक्त आयुक्त गायकवाड यांची भेट घेण्यात आली. लवकरात लवकर या पदाची जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अतिरीक्त आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर विषयासंदर्भात बैठक आयोजन करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावर येत्या ७ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध न केल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलन तीव्र भूमिका घेईल असे जाहीर करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा महासचिव राजू खरात, जिल्हा सदस्य राहुल अहिरे,कल्याण डोंबिवली अध्यक्ष कमलेश उबाळे, रोहित शिरसाट व इतर विद्यार्थी सहकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या आवेशात राज्य शासनाच्या वतीने ७५ हजार जागांच्या महाभरतीची घोषणा करण्यात आली. मात्र, विविध टप्प्यांवर ही भरती प्रक्रिया रखडली असून, उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच शासन सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्याच्या विचारात असल्याने उमेदवारांच्या असंतोषाला खतपाणी घातले आहे. राज्यातील १५हून अधिक विभागांतील भरती प्रक्रियाच घोषित झालेली नाही. तर तलाठी आणि जिल्हा परिषदेची भरती परीक्षा होऊनही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. ‘राज्यातील एकही भरती प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने झाली नाही. राज्यात दोन लाखांहून अधिक जागा रिक्त असून, रखडलेल्या भरतीमुळे विद्यार्थी सत्ताधाऱ्यांवर संतप्त आहेत. शासनाने तातडीने निर्णय घेत विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.’’
0 टिप्पण्या