पांढुर्णा- सावरगाव येथे रूढी परंपरेच्या नावावर एकमेकांवर दगडफेक करून ६००हून अधिक जणांना जखमी आणि ८ जणांना गंभीर जखमी करणारी ही कुठली परंपरा? असा संतप्त सवाल करत ही अघोरी प्रथा तातडीने बंद करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एका पत्रकाद्वारे केली आहे.२ सप्टेंबरला 2024 रोजी जाम नदीच्या किनाऱ्यावर हा अघोरी कार्यक्रम पार पडला. पांढुर्णा आणि सावरगाव या गावातील नागरिकांनी नदीच्या दोन किनाऱ्यावर उभे राहून परंपरेच्या नावावरती एकमेकांवरती दगडफेक केली.
मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे परंपरेच्या नावावर ही अघोरी प्रथा ७६ वर्षांपासून चालू आहे. आज पर्यंत अनेक लोकांना अपंगत्व आले आहे तसेच अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यामध्ये आतापर्यंत एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी जीव गमावला आहे.
१९९५ ते २०२३ या दरम्यान नोंद असलेल्या मृतांची संख्या १३ आहे. त्यापूर्वीच्या नोंद नसलेल्यांची संख्या ही अधिक असू शकते अशी भीती समितीने व्यक्त केली.ही जीवघेणी गोटमार प्रथा बंद होण्याच्या दृष्टीने पुढील वर्षभर स्थानिक प्रशासन, विविध सामाजिक संघटना व नागरिक यांच्याशी चर्चा करणार असल्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.
रूढी परंपरांच्या नावावर चालणारी ही घातक प्रथा तातडीने बंद करणे आवश्यक असताना आजूबाजूच्या सहा जिल्ह्यातील प्रशासकीय व्यवस्था या कामी जुंपली जाते आणि यामध्ये स्थानिक आमदारांसारखे लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी होतात हे अधिकच वेदनादायी असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, नरेंद्र कांबळे, ॲड मुक्ता दाभोलकर, प्रा प्रवीण देशमुख, सम्राट हटकर, मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केले
मध्यप्रदेशमध्ये जादूटोणा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा नाही.महाराष्ट्र आणि कर्नाटकानंतर मागीलच महिन्यात गुजरात सरकारने सुद्धा हा कायदा पास केला. अनेक राज्यांमध्ये चालणाऱ्या अशा अघोरी प्रथांना पायबंद घालायचा असेल तर कठोर कायदा असणे ही काळाची गरज झाली आहे.
याच पार्श्वभूमीवरमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जादूटोणा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा हा राष्ट्रीय पातळीवरती व्हावा याची मागणी केली आहे.अशा प्रथा प्रबोधनाच्या मार्गाने बंद करतानाच कायद्याचे पाठबळ मिळाले तर अधिक सक्षमपणे याघोरी प्रथांना आळा घालता येईल असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा प्रविण देशमुख यांनी कळविले आहे.
९८२०४९८५६०
0 टिप्पण्या