इको फ्रेंडली लाईफ आयोजित मिशन ७०० करोड वृक्ष भारतभर या महाउपक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी वृक्षारोपण होत आहे. इको फ्रेंडली लाईफचे संस्थापक आणि पर्यावरण रक्षण चळवळीचे जनक सर श्रीअशोक एन.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील के.सी. अभियांत्रिकी महाविदयालय - एन.एस.एस युनिटने आज २१ सप्टेंबर रोजी बदलापूर येथील एरंजाड परिसरात वृक्षारोपण केले. ७८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात वृक्षारोपण उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. नारळासह आंबा, सीताफळ, जांभूळ अशा रोपांची लागवड यावेळी करण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांना सर श्रीअशोक एन. जे. यांनी खड्डा कसा खणावा, रोप कसे अलगद प्लॅस्टिक बॅग मधून बाहेर काढावे, प्लास्टिक इतस्तः न फेकता रिसायकलींग साठी कसे साठवावे, गरजेनुसार रोपाला आधार कसा द्यावा या सामान्य बांबीबरोबरच प्रत्यक्ष रोपण कसे करावे व ते फळदार होईपर्यंत त्याची निगा कशी राखावी व ही सर्व झाडे ३ ते ४ वर्षात फळदार झाल्यावर खाण्यायोग्य कशी होतात याची परिपूर्ण माहिती दिली.
यावेळी वृक्षारोपण हेच खऱ्या अर्थाने जीवनाचे मुळ शिक्षण आहे याचा अनुभव आज आम्हाला आला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर रोपाची लागवड करताना मातीच्या स्पर्शाने हाताला आणि मनाला जे लाभले ते शब्दात व्यक्त करता येत नाही अशी भावना देखील यावेळी राष्ट्रीय सेवा योजना युनिटने व्यक्त केली. धरतीमातेशी नाळ जोडण्याचा हा अनोखा उपक्रम कायमस्वरुपी आमच्या स्मरणात राहील असे भावपूर्ण उद्गार अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तसेच ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर श्रीअशोक एन.जे. आणि त्यांच्या टीमचे आभारही व्यक्त केले. तसेच अशा उपक्रमातून आम्ही नेहमीच सक्रीय सहभाग घेऊ अशी ग्वाही देखील या विद्यार्थ्यांनी दिली
KC इंजिनिअरींग कॉलेजच्या वतीने प्रा. पुनमजी बागुल, प्रा. प्रियंका सनान्से, प्रा. पोर्णिमा वदक यांनी योग्यरित्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वतोपरी मार्गदर्शन केले.
इको फ्रेंडली संयोजक किशोर बनकर नूतन नाईक, करिष्मा राठोड, गौतम, अशोक भोसले, ओकेश गावित, राहुल गायकवाड यांच्यासह अनेक जणांनी एरंजाड वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदविला असल्याची माहिती संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सुबोध शाक्यरत्न यांनी दिली
0 टिप्पण्या