Top Post Ad

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन

रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जयंती महोत्सव दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी नागपूर येथे दु. 1 वा. कार्यक्रमाचे ठिकाण मधुराम सभागृह हिंदी मोर भवन बर्डी चौक नागपूर येथे आयोजित केला आहे. या जयंती महोत्सवासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उपेंद्र शेंडे साहेब माजी आमदार, राष्ट्रीय सरचिटणीस मा. देशबाबू खोब्रागडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. प्राचार्य मेश्राम सर, राष्ट्रीय संघटन सचिव मा. उत्तमराव गवई, पक्षाचे प्रवक्ते डॉ. एन. व्ही.ढोक, राज्य अध्यक्ष मा. सुनीलभाऊ निर्भवणे, राज्य सरचिटणीस जीवन बागडे, राज्य सरचिटणीस प्रा. अशोक डोले, रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश तारू इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

हा महोत्सव एक वर्षभर चालणार आहे त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना मानसपुत्र मानलेले आहेत त्यांनी त्यांच्या कालावधीत राज्यसभेवर नियुक्त होऊन उपसभापती असताना देशातील अनेक गोरगरीब दलित आदिवासी अल्पसंख्यांकांसाठी काम केलेले आहेत त्यांची चळवळीशी असलेली जवळीकता त्यात आजच्या पिढीला माहीत होण्यासाठी व रिपब्लिकन पक्षाला बळकटी आणण्यासाठी या कार्यक्रमामधून सांगण्यात येणार आहे.

याच महोत्सवामध्ये मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने देशाचे संविधान वाचवण्यासाठी व लोकशाहीला बळकटी आणण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उपेंद्र शेंडे साहेब यांनी कुठलीही अट न ठेवता देश स्तरावर महाविकास आघाडी सोबत युती करून अनेक जागा मिळून आणल्या आणि भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या पक्षाचे बळ घेऊन सत्ता स्थापन करावी लागली, ही बाब महाविकास आघाडीने लक्षात घेण्यासारखी आहे.

आंबेडकरवादी एकमेव रिपब्लिकन पक्ष साथ केल्यानेच महाविकास आघाडीला विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला म्हणून या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या मनोगतातून पुढच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्ररीत्या निवडणुका लढवणे किंवा मित्र पक्षाची युती करून निवडणुका लढवणे हे ठरविण्यात येणार आहे तेव्हा रिपब्लिकन जनतेने व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून आपल्या भागातील जनतेच्या समस्या मांडाव्यात असे आवाहन मा.अरुण कांबळे लोहगावकर जिल्हाध्यक्ष नांदेड, व रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. प्रकाश तारू यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com