Top Post Ad

चैत्यभूमी येथे ६ सप्टेंबर रोजी संविधान यात्रेची सांगता

 भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टाने आपल्या सर्वांना अर्पण केलेलं भारतीय संविधान... याची ताकद, महती भारतीय संविधान देशाच्या प्रगतीमध्ये नव भारतच्या दिशेने विश्वामध्ये या देशाला एक उच्च स्थान देण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका संविधानाने निभावली. तळागाळातील खेड्‌यापाड्‌यात राहणाऱ्या सर्व मंडळीना ही भावना हा संदेश पोहचवण्याचे कार्य संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले. ६ सप्टेंबर २०२४ रोजी संविधान यात्रेचे मुंबईत आगमन होणार आहे. त्यानिमित्त अनेक ठिकाणी  स्वागत कार्यक्रम होणार आहे.  सायंकाळी ४ वाजता वंदनीय बौद्ध भिक्षु संघ व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये चैत्यभूमी दादर या ठिकाणी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक नितीनभाऊ मोरे यांनी दिली. आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसिद्धी माध्यमाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत यशवंत गंगावणे, संजय कांबळे, राकेश मोहिते आदीं मान्यवर उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना मोरे पुढे म्हणाले, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीच्या स्वरूपामध्ये संविधान जागर यात्रा छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर दादर पोहोचल्यानंतर सभागृह मध्ये संविधान सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. संविधान जागर यात्रा समारोप सभेमध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू व केंद्रीय मंत्री भूपेन्द्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या राष्ट्रकार्यक्रमांमध्ये इतर अनेक मान्यवर मंडळी खासदार, आमदार उपस्थित राहणार असून,या संविधान सभेला मुंबई शहरातील तमाम आंबेडकरवादी संघटना मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.
:

सविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधान जागर यात्रा ९ ऑगस्ट २०२४ रोजी सत्याग्रह भूमी चवदार तळे महाड येथे भारतरत्न संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तसेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून क्रांती दिनाच्या दिवशी सुरुवात करण्यात आली.संविधान जागर यात्रा आजपर्यंत महाड, रायगड, खेड. रत्नागिरी, पतीत पावन मंदिर, सिंधुदुर्ग, कणकवली, कोल्हापूर शाहू समाधी दर्शन, हातकणंगले, सांगली पेठ नाका. सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट, महात्मा फुले वाडा, वस्ताद लहुजी साळवे समाधी, अहमदनगर, माळशिरस, सोलापूर, तुळजापूर, उमरगा, लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, हिंगोली, परभणी, केज, बीड, संभाजीनगर, बदनापूर, जालना, चिखली, मेहकर, वाशिम, उमरखेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, भंडारा, उमरेड, दीक्षाभूमी, नागपूर, वर्धा, अमरावती, दर्यापूर, मुर्तीजापुर, अकोला, भुसावळ महाराष्ट्रातील एवढ्या जिल्ह्यामध्ये प्रवास करत सभा बैठका घेत आज जळगाव जिल्ह्यामध्ये दखल झाली आहे.

पुढे जळगाव वरून धुळे नाशिक कल्याण अंबरनाथ उल्हासनगर ठाणे करत संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईच्या दिशेने येत असताना अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये संविधान यात्रेचे जल्लोषपूर्वक स्वागत करण्यात आले. अनेक संघटनांच्या वतीने महाराष्ट्रभर संविधान जागर यात्रेचे उत्साहाने स्वागत होत असताना, संविधानाबद्दल निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून यात्रा जवळ जवळ यशस्वी झाली आहे. तसेच भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्ष असल्यामुळे एक वेगळा जोश एक वेगळे वातावरण आहे. संविधान सभेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सर्व बहुजन समाजातील मंडळीच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम पार पडणार आहे. आपले घरदार सोडून तब्बल ३० दिवस ६००० किलोमीटर प्रवास करून खेड्‌यापाड्‌यांमध्ये संविधान समजावून सांगण्याचं काम ज्या संयोजन मंडळीनी केले त्या सर्वांचा सत्कार उपस्थित महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक संघटनेच्या प्रमुखांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन नितीनभाऊ मोरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com