भारत हा कृषीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असल्याने शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. याच शेतक-याची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात पहिला नदी जोड प्रकल्प राबविला व तो यशस्वी करून दाखविला त्या नदी जोड प्रकल्पाचा आज वर्धापन दिन म्हणजेच नदी जोड प्रकल्प दिन असून याच दिवशी मी व माझे संपूर्ण देशातील सहकारी 'ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना' या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करीत असल्याचे दिपक वानखेडे यांनी आज २४ सप्टेंबर रोजी मुंबईतील प्रेस क्लब येथे जाहीर केले. ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना हा पक्ष संविधानावर आधारीत असून सनदशीर मार्गाने येथे सर्व जाती धर्म घटकातील उपेक्षीत व वंचित असलेल्या व्यक्तींना न्याय देण्याचे काम करणार असल्याची अशी ग्वाही वानखेडे यांनी दिली.
मी व माझ्या सहका-यांनी आंबेडकरवादी व इतर प्रस्थापित पक्षात काम केले आहे. दलित आणि बहुजन यांना केवळ निवडणुकीतील मतांसाठी वापरले जाते त्यांना जाणिवपूर्वक निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. सामान्य कार्यकर्ता सामान्यच राहतो व इतर प्रस्थापित नेता अभिजन होतात. हा अनुभव आल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या व समाजाच्या न्याय हक्कासाठी पक्ष काम करील. तसेच भारतातील सर्व जाती, धर्म, पंथ, महिला, शेतकरी, कामगार, विद्द्यार्थी, लहान मोठे उद्योजक व मुख्यात्वे आजपर्यत सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेले दलित बहुजन अदिवासी, मुस्लिम यांच्या अस्मितेच्या लढाई साठी पक्ष काम करील. भारतीय संविधानाचे संवर्धन करण्याचे महत्वपूर्ण काम करील. दलित-बहुजन यांच्या सामाजिक, अर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना हा पक्ष काम करील. ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना या पक्षात संविधानवादी विचारांचा पुरूष महिला व तरूण कार्यकर्त्यांना सदस्य म्हणून घेतले जाईल व त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्या कार्याला योग्य न्याय दिला जाईल. असेही वानखेडे यांनी जाहिर केले.
0 टिप्पण्या