मंडणगड दापोली तालुक्यातील समविचारी युवकांनी एकत्र येऊन १ सप्टेंबर २०१३ रोजी चैत्यभूमी, दादर मुंबई या ठिकाणी मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान स्थापना केली.या प्रतिष्ठानचा११ वा वर्धापनदिन कासार वाडी बुद्ध विहार, दादर,मुंबई या ठिकाणी अध्यक्ष आयु. सुमेध सकपाळ यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला. वर्धापनदिनी उपाध्यक्ष सुनिल तांबे कोन्हवलीकर,सचिव उज्वल खैरे, सहसचिव तुषार नेवरेकर, खजिनदार निखिल कवडे, संघटक सचिन कांबळे ,उमेश जाधव ,महेश भातकुंडे , माजी सचिव राहुल अहिरे उपस्थित होते.
प्रतिष्ठान माध्यमातून आतापर्यंत ग्रामीण आणि मुंबई विभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले . विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर, गुणवंत विद्यार्थी तसेच प्रतिष्ठित मान्यवर सत्कार,लोकराजा शाहु महाराज जयंती, त्यागमुर्ती माता रमाई जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती,धम्म सहल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी स्वच्छता अभियान, संविधान प्रास्ताविक शाळा, महाविद्यालय,आणि शासकिय ठिकाणी देऊन संविधान जन जागृती करणे. कलावंत प्रोत्साहनासाठी कला सांस्कृतिक उपक्रम राबवणे अश्या विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात.
0 टिप्पण्या