सिंधुर्दुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनात स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले सहभागी झाले . तर, शाहू छत्रपतींनीही शरद पवार यांच्यासमवेत या आंदोलनात सहभागी होत राज्य सरकारचा निषेध नोंदवला.
राजकीय हेतूने आंदोलन प्रेरीत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ''माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का?. असा सवाल केला. आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. पण, महाराजांनी सूरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं. पण, सूरत कधी लुटली नव्हती, जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला, त्याला माफी मागायला सांगणार आहात का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे.
याबाबत आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची चॅलेंज दिलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कहर केला. महाराजांनी सुरत लुटली नाही, सुरत लुटली नाही फक्त छावनी लुटली, असं फडणवीस साहेबांचा म्हणणं आहे. आज माझं आव्हान आहे, बर्नियर नावाचे इतिहासकार होते त्यांनी हे लिहून ठेवलय. त्याकाळी सुरत हे व्यापारचे ठिकाण होते. त्यांनी महाराजांच्या विरोधातल्या लढाईत सुरतमधून मदत गेली हा राग होता. हा आमचा अभिमान आहे. फडणवीस सांगतात हे सगळं काँग्रेसने केलय. इतिहासकरांना काँग्रेस पक्ष सांगायला गेला होता का? महाराज छावनी लुटायला गेलेले असं म्हणतात पण तसं नाही. महाराज स्वराज्य घडवायला जन्माला आले होते. तुम्ही महाराजांना लहान करताय. महाराजांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करतायत.
महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, पण महाराष्ट्र अस्वस्थ आहे. त्यात मराठी माणसाला अतिशय दुःख झालं. मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. जगात अनेक पुतळे आहेत, अनेक वर्षा पूर्वीचा स्टॅचू ऑफ लिबर्टी, शाहू महाराज यांनी केलेला पुतळा गेट वे ऑफ इंडियाचा पुतळा आहे. कोणतेच पडले नाहीत. मालवणमध्ये आपटे यांनी पुतळा केला, पण एवढ्या लवकर पुतळा कसा असा झाला. ह्या ठिकाणी वादळ आलं असल्याच सांगितलं. त्यात नारळ आणि सुपारी सुद्धा पडत नाही. तुम्ही महाराजांकडे पहिलाच नाही. ज्याने क्लेचा पुतळा कधी बनवला नाही , तो आपटे महाराजांचा पुतळा बनवतोय. आपटे फरार आहे, हे फरार सरकार आहे. मध्यंतरी विशाल गडावर आक्रमण झाले. मशीद पाडली, त्यावर हल्ला केला. महाराजांनी सांगितलं कोणताही धर्म आणि जात असा भेदभाव करायचा नाही.
ह्याच ठिकाणी बदलापूर मधील घटना घडली. त्या ठिकाणी पोलीस केस घेत नव्हते. नंतर जनप्रक्षोभ झाला आणि केस घेतली. असं सरकार आहे कुठे चाललंय हा महाराष्ट्र ? आपटेला आणि शाळेला वाचवायचं आहे, त्यासाठी तिथे केस घेतली नाही. त्या ठिकाणी पोलिसांनी पोलिसांनी तक्रार घ्यायला 13 तास लावले. बदलापूरमध्ये शिवाजी महाराज यांचे चरण लागलाय. त्या ठिकाणी महाराज घोडे बदलायचे. त्या ठिकाणी असं सगळं घडतंय. त्यांच ठिकाणी आंदोलन करायला आलेल्या 300 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या ठिकाणी वामन म्हात्रे यांनी केलेला विधानसभा चुकीचं आहे, असंही आव्हाड म्हणाले.
मुंबईतील गेट वे वरील शिवाजी महाराजांचा पुतळा १९६० पासून उभा आहे. हा पुतळा समुद्राच्या बाजूला आहे, त्याला काही झालं नाही. मालवणातच का झालं?याचा अर्थ पुतळ्याच्या बांधकामाचा दर्जा चांगला नव्हता. काहीजण म्हणतात वाऱ्यामुळं पुतळा कोसळला. गेट वे वरचा पुतळा का नाही कोसळला. कुवत नसणाऱ्याला काम सोपवलं गेलं. त्याचं उद्घाटन घाई घाईने करण्यात आलं, प्रधानमंत्री मोदींनी पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली, पण लगेच म्हणाले की, सावरकरांचा अपमान केला जातो, तेव्हा कुणी माफी मागत नाही. या दोन गोष्टींचा संबंध काय? शिवाजी महाराज व सावकरांची एकत्र तुलना होऊ शकते का? चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहीत करतात एवढंच नव्हे तर अंगाशी आलं की मग माफी मागतात. - शरद पवार
0 टिप्पण्या