Top Post Ad

बदलापूर: आदर्श विद्यामंदीर... नव्याने जनहित याचिका दाखल

बदलापूर आदर्श विद्यामंदीर प्रकरणातील आरोपी  अक्षय शिंदेची चकमक बनावट असल्याचा आरोप होत असतानाच या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. ज्या शाळेत अक्षय शिंदे सफाई कर्मचारी होता, त्या शाळेचा ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. बदलापूर घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुस-याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची त्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. या संपुर्ण प्रकरणात बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं हा तपास तातडीनं सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

  याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.  उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत अजून मोठे खुलासे करण्यात आलेत. अक्षय शिंदेनं पोलिसांकडे मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचा याचिकेतून दावा करण्यात आलाय. आरोपी हायकोर्टानं स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे गेला तर प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीनं त्याचा एन्काऊंटर झाल्याचा याचिकेतून गंभीर आरोप करण्यात येत आहे. तसेच ट्रस्टी आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी अद्याप फरार असल्यानं ठाणे पोलीस आणि एसआयटीच्या कारभारावर सवाल उपस्थित केला जात आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाला. तळोजा तुरुंगातून बदलापूरला ट्रन्सिट रिमांडवर नेत असतांना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आत्मरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात अक्षयचा मृ्त्यू झाला. मात्र अक्षयच्या कुटुंबियांनी पोलिसांनी हेतुपूरस्क अक्षयचा एन्काऊंटर केल्याचा आरोप केला. कोणीतरी पोलिसांना त्याला मारण्यासाठी पैसे दिल्याचा आरोपही अक्षयच्या कुटुंबियांनी केलाय. चकमकीमागील सत्य समोर आलं पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. 

बदलापूरच्या शाळेच्या ट्रस्टींचा मानवी तस्करी व चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेटमधील सहभाग, रॅकेटच्या म्होरक्यांचे सत्ताधाऱ्यांशी असलेले कनेक्शन, ट्रस्टींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा रचलेला कट आदी गंभीर दावा करणारी फोजदारी याचिका माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी अॅड. राजाभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून दाखल केली आहे. याचिकेत ठाणे पोलीस आयुक्तांसह  सरकार व सीबीआयला प्रतिवादी बनवले आहे. अक्षय शिंदेच्या संशयास्पद एन्काऊंटरवरून विरोधकांनी सरकारला टार्गेट केले आहे. याचदरम्यान ही याचिका दाखल झाली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com