Top Post Ad

एमसीएचआय'तर्फे `रास रंग २०२४' उत्सवाची ३ ऑक्टोबरपासून सुरूवात

 महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्रोत्सवात `रासरंग २०२४' उत्सव भरविला जाणार आहे, ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होईल. या उत्सवाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगलमय वातावरणात भूमिपूजन करण्यात आले.`क्रेडाई-एमसीएचआय' ठाणे चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आज भूमिपूजनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली `क्रेडाई-एमसीएचआय'ने २०१७ मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून  भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, `क्रेडाई-एमसीएचआय' ठाणे चे अध्यक्ष जितेंद्र मेहता, `एमसीएचआय'चे पदाधिकारी सचिन मिराणी, फैयाज मिराणी, अमरसिंह ठाकूर, भरत मेहता, भावेश गांधी, कल्पतरु डोअर्सचे व्ही. के. पटेल, को-ऑर्डिनेटर जय ठक्कर आदी उपस्थित होते. 

बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन `क्रेडाई-एमसीएचआय'ने आशर ग्रूप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रास-रंग उत्सव भरविला आहे. बॉलिवूडमधील `ढोल किंग' हनिफ, अस्लम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुझुमदार, रुपाली कश्यप यांच्या सूरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लूटता येईल. त्याचबरोबर दररोजच्या आरतीवेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती राहील, अशी माहिती `क्रेडाई-एमसीएचआय' ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडली आहे, असे मेहता यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

 


विजेची आकर्षक व नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांना पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटता येईल. या कार्यक्रमाचे निवडक उपक्रम वाहिन्या, स्थानिक टीव्ही चॅनल आणि www.rassrang.in या वेबसाईटवर थेट प्रसारण केले जाईल, अशी माहिती  `क्रेडाई-एमसीएचआय' ठाणेचे सचिव मनिष खंडेलवाल यांनी दिली. या उत्सवाला आयएएस, आयपीएस यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती राहील, असे ते म्हणाले.

या दहा दिवसांच्या उत्सवाला १२ हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. ठाणे शहराबरोबरच मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी येथील नागरिकांकडून रासरंग उत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शविली जाते. त्यादृष्टीकोनातून भव्य उत्सवाचे नियोजन केले जात आहे. बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्रींबरोबर सुमधूर संगीताच्या साथीने हा उत्सव भाविकांच्या स्मरणात राहील, असा विश्वास  `क्रेडाई-एमसीएचआय' ठाणेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

दरवर्षी रासरंग उत्सवातील गर्दीत वाढ होत असून, ठाण्यातील नवरात्रोत्सवात हा उत्सव लोकप्रिय आहे. या पार्श्वभूमीवर `क्रेडाई-एमसीएचआय'ने १ लाख चौरस फूट क्षेत्रफळात उत्सव भरविला आहे. दांडिया नृत्य करणाऱ्यांसाठी जमिनीवर लाकडी प्लॅटफॉर्म टाकले जाणार असून, सुरक्षेसाठी २०० हून अधिक बाऊन्सर्स व सुरक्षा रक्षक, ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे यांच्यासह आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांसह वैद्यकीय पथक तैनात केले जाईल. सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी भव्य अॅंपल पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या अधिक माहितीसाठी सुमित गुडका - दूरध्वनी क्रमांक  ९३२२६८२०१० यांच्याबरोबर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com