दोन वर्षांपूर्वी रामदास आठवले यांची ध्येयधोरण न आवडल्याने दलित पँथरच्या अध्यक्षपदाची धुरा वाहणारे राम तायडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा मल्लिका ढसाळ यांनी आज केली. दलित शोषित समाजाचे प्रश्न ते सोडवतील असा विश्वास बाळगून मी विश्वासाने माझे अध्यक्ष पद त्यांना दिले, पण तदनंतर त्यांनी त्यांचे स्वार्थी राजकारण सुरु केले. कुठलेही निर्णय मला न विचारता घेणे, पदनियुक्ती असो अगर निवडणूक संदर्भातले विषय असो, जुन्या लोकांना काढणे आणि नवीन नियुक्ती केल्यावर त्यांनाही काढणे अशी अनेक पक्ष शिस्त विरोधी मनमानी कारभार करीत पक्षाची वाताहत करत होते. थोडक्यात हुकूमशाही, एकाधिकार याचा अवलंब करीत स्वार्थी राजकारण करीत होते. नामदेवची ध्येयधोरण तर दूरच पण नामदेव ढसाळ यांचा श्रद्धांजली समारोह देखील त्यांनी आर्थिक कारण देऊन टाळला आणि फक्त निवडणुकीच्या आर्थिक फायद्यावर डोळा ठेवून मला अंधारात ठेवून अनेक आर्थिक गैरव्यवहार केले त्यामुळे त्यांचे निलंबन करून मी पुनश्च दलित पँथरची आज नव्याने कार्यकारणी जाहीर करीत असल्याचे मल्लिका ढसाळ यांनी स्पष्ट केले. याबाबतची माहिती देण्यासाठी आज मुंबई पत्रकार संघ येथे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वप्निल ढसाळ यांच्याकडे देण्यात आली, तर संगिता ढसाळ यांच्याकडे महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वनिता मखरे, यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली.
दलित पँथर नामदेव ढसाळ यांनी 1972 साली स्थापन केली हे आपणा सर्वांना माहित आहेच, नामदेव ढसाळ यांच्या दुःखद निधनानंतर काही कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार मी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली; पण एक माझे जे तत्व होतं की मी लोकांचे प्रश्न, माझ्या आजारपणामुळे त्यांच्यापर्यंत जाऊन सोडू शकत नाही तर त्या खुर्चीवर वसण्याचा तत्वतः मला अधिकार नाही. पण पक्षश्रेष्ठी म्हणून काही निर्णय घेणे आणि ते कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अंमलात आणणे अपेक्षित असताना असे काहीही होत नव्हते. दलित पँथरचा समग्र प्रवास याची देही याची डोळा' पाहिला इतकेच नव्हे तर त्यासाठी खस्ता ही काढल्यात तेव्हा त्या पक्षाचे असे तीनतेरा होऊ न देण्यासाठी अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नामदेवने दिलेली प्रखर तेजस्वी वाट आहे; त्याच वाटेवर आम्ही जाणार आहोत, आमचे नवनिर्वाचित युवा अध्यक्ष डॉक्टर स्वप्निल ढसाळ हे नामदेव ढसाळ यांचे पुतणे आहेत. तेव्हा नामदेवची ध्येयधोरणेही त्यांना माहिती आहेत. त्यांच्या नेतृत्वात आमची नवी फळी नव्या जोमाने पुन्हा मैदानात उतरत आहे; आता मागचा दोन वर्षांचा काळा कालखंड पुसून आम्ही नव्या ऊर्जेने त्याच ताकदीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उतरत आहोत. फक्त शब्दछल नाही, आश्वासन नाहीत तर नामदेव ढसाळ प्रमाणेच हे माझे पँथर भाऊ व भगिनी रणांगणावरचे समर्थ वीर योध्येच असल्याचा आशावादही मल्लिका ढसाळ यांनी व्यक्त केला.
अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर स्वप्निल ढसाळ म्हणाले, मी शिक्षकी पेक्षाचा असल्याने माझा नेहमीच विद्यार्थ्यांशी संवाद असतो. मात्र हा अनुभव मला नविन आहे. विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे भविष्याच्या गोष्टींबाबत शिकवलं जाते. त्याचप्रमाणे संघटनेलाही स्वत:चे भविष्य निर्माण करण्याकरिता मी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणेन. आणि प्रत्यक्ष चर्चेतूनच निर्णय प्रक्रिया घडेल. त्यासाठी आपण सोबत एकत्रितपणे काम करू असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
बहुतेक मोठे प्रकल्प महाराष्ट्र बाहेर चाललेत आणि जे काही आहेत तुटपुजे त्याच्यामुळे कोकणाचं समृद्ध रूपच हरणार आहे तर दलित पँथर रोजगार योजना घेऊन येत आहे त्यात तरुणांच्या हाताला काम मिळेल. स्त्रियावरच्या अत्याचारासाठी आम्ही पँथर्स बायकर्स रात्रीच्या गस्तीसाठी ठेवणार आहोत कुठ. माता बहिणींच्या अब्रूवर घाला घालण्यास जे नराधम असतील त्यांना पँथर त्यांच्या पद्धतीने धडा शिकवतील कायद्याच्या भाषेत. यासाठी पोलीस खाते आम्हाला सहकार्य करण्यास तयार आहेत. महिलांसाठी लघुउद्योग यासाठी आम्ही व बैंक व महिला यांची सांगड घालून आमच्या माध्यमातून त्यांना भाजी, वडापाव वा झुणका भाकर व इतर छोटे उद्योग यासाठी कर्ज मिळवून देऊ. त्यामुळे आमच्या भगिनी स्वावलंबी होतील. ज्येष्ठांना औषधोपचारासाठी मोठा खर्च असतो तो ही आपली. दलित पँथर सोडवेल त्यासाठी पॉलिसी घेता येतील आणि पाच लाखांपर्यंत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मदत मिळेल अशी ही योजना आहे. अशी ही पोजना या सर्व योजना सर्वसामान्यांसाठी आहे ज्यांना रोजच जगणं म्हणजे लढणं वाटतंप ज्यांचे प्रश्न हे खूप जटील आहेत पण तेच सोडवण्याचं व्रत ज्या नामदेव ढसाळ यांनी घेतलं त्या सर्व ध्येप धोरणाचे आम्ही बांधील आहोत. ज्यांना सत्ता आणि त्यामुळे मिळणारे फायदे यातच त्यांचे लक्ष आहे त्यांना लाथाडून आम्ही पुढे जात आहोत.
जर आम्हाला सत्ता हवी असेल तर ती डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेली असेल पात सर्व समाजाचे जे सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यापासून वंचित असतील त्यांना त्यांचे हक्क देणे हे आमचं प्रथम कर्तव्य असेल कारण डॉक्टर बाबासाहेबांनी जे वचन सांगितले की माझी जमात शासन करती जमात व्हायला पाहिजे. कारण की त्यांना माहीत होतं जे शासन करते आपले नसतात ते आपली मान मुरगळतात. ही आमची भूमिका आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. मात्र आम्ही अद्यापही त्या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. आज केवळ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि संघटन बांधणी याबाबतच चर्चा होत आहे लवकरच आम्ही निवडणुकासंदर्भात आमची भूमिका जाहीर करू असे शेवटी मल्लिका ढसाळ म्हणाल्या.
0 टिप्पण्या