Top Post Ad

९६ पुरस्कार प्राप्त 'गटार' नाटकाचा शतकीय प्रयोग मुंबईत शिवाजी मंदीर येथे होणार

सगळीच घाण वाहून नेणारी लाईन म्हणजेच गटार. वंश परंपरेने हे काम करणारे लोक आहेत त्यांना घाणीत उतरुन हे काम करावं लागतं. आपल्या देशात जाती व्यवस्था ही माणसांच्या कामांनी म्हणजे व्यवसायाशी बांधली गेलेली आहे. जाती टिकविण्यासाठी लोकांना असे करकचून बांधून ठेवले गेले आहे. व्यवसाय सुटत नाही म्हणून जात सुटत नाही. जाती आणि जातीशी बांधलेले व्यावसाय सोडण्याचे धाडस करणारी माणसेच जाती नष्ट करु शकतात. ज्या कारणांमुळे जाती टिकतात ती कारणे कायम ठेऊन जाती कधीच नष्ट होत नाहीत. असे स्पष्ट मत जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले. बहुजन रंगभूमी, नागपूर निर्मित व प्रस्तुत वीरेंद्र गणवीर यांच्या 96 पुरस्कार प्राप्त 'गटार' नाटकाचा 100 वा शतक महोत्सव ऐतिहासिक प्रयोग सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व अॅक्टिविस्ट अमोल पालेकर ह्यांच्या विशेष उपस्थितीत शिवाजी नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.  

 


शनिवार 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आलेल्या या शतकीय नाट्यप्रयेागाला महाराष्ट्रातील अनेक नाट्यचळवळींचे प्रतिनिधी, लेखक, कलावंत, विचारवंत, समिक्षक, कवी व सिनेसृष्टीतील कलावंत उपस्थित राहणार आहेत. जाणत्या प्रेक्षक श्रोत्यांना सदर नाट्य कार्यक्रम बौद्धीक आणि नाट्यभिनयासंदर्भात अनोखी मेजवाणी ठरावा, असा  सर्व आयोजकांचा प्रयत्न आहे.  या कार्यक्रमाच्या अपेक्षित यशासाठी बहुजन रंगभूमीचे विरेंद्र गणवीर, डॉ. सुरेंद्र वानखेडे अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टसचे संचालक डॉ. योगेश सोमन,  अरुण कदम, श्रेयश अतकर, आशिष दुर्गे, अस्मिता पाटील, रोहित वानखेडे, रिपील ढोबळे इत्यादी कार्यकर्ते कलावंत परिश्रम घेत आहेत. तरी मुंबईकरांनी या प्रयोगाला अवश्य येण्याचे आवाहन गज्वी यांनी केले. 

समाज क्रांतीच्या वाटेवरील महाराष्ट्रातील चर्चित नाटक 96 पुरस्कार प्राप्त 'गटारचा' 100 वा शतक महोत्सव ऐतिहासिक प्रयोग सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व अॅक्टीव्हिस्ट अमोल पालेकर तसेच 99 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या प्रामुख उपस्थितीत होणार आहे. प्रयोगासाठी अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस, मुंबई विद्यापीठचे विशेष सहकार्य लाभलेले आहे. गटार या नाटकात क्रांतीचे आगमन चितारलेले आहे. गटार साफ करणाऱ्या माणसांचेही गटारीकरण झालेले आहे. यात गटारीकरणाचा भुतकाळ तसेच वर्तमानकाळही या नाटकात आहे. व या गटारीकरणातून बाहेर पडण्याचा निर्धार करणार्या भविष्याचाही उषःकाल या नाटकात आहे.  हे आपल्याला प्रत्यक्ष नाटक पाहिल्यावरच लक्षात येईल असा विश्वास लेखक/दिग्दर्शक: वीरेंद्र गणवीर, यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला अभिनेता श्रेयश अतकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

गटार -- गटारीने गिळलेले बाबा अम्मा चे पुर्वज हा गटारीकरणाचा भुतकाळ आहे. आणि बाबा, अम्मा, गौतम, यादव हा या गटारी करण्याचा वर्तमान आहे. बाबा, गौतम, यादव यांचे मुत्यु नाटकाच्या शेवटी होतात. म्हणजे या माणसांचे जगणे आणि मुत्यु गटारीनेच नियंत्रित केले आहे. गटारीत लपून बसलेल्या मुत्युने या लोकांची जीवने संपविली आहे. या गटारीकरणाच्या भीषण रात्रीचा अस्त घडवणारी पहाट नाटकातच शेवटी झालेली आहे. हे बघया क्रांतिकारी पहाटेचे नाव रवी आहे. रवी शिकायला लागला तो गटार काम करणाऱ्या वस्तीतुंन मनाने बाहेर पडला आहे. गटार नावाच्या मुत्युचा सापळा त्याच्या लक्षात यायला लागला आहे. आणी हे बदलायलाच हवं ही आग त्याच्या मनात भडकायला लागली आहे. रवी स्वतंत्र विचार करायला लागला आहे...

  • लेखक/दिग्दर्शक: वीरेंद्र गणवीर,
  • कलावंत: श्रेयश अतकर, अस्मिता पाटील, रोहित वानखेडे, ऋषिल ढोबळे, साक्षी नायगावकर आणि आशीष दुर्गे प्रकाश योजनाः किशोर बतासे. नेपथ्यः ऋतिक अमाळकर पार्श्वसंगीतः तनुष्क गणवीर / विशाखा साळवे,
  • रंगभूषा - वेशभूषाः पूजा विश्वेकर.
  • रंगमंच व्यवस्थाः शुभम लूटे, ऋषिकेश पोजगे / रोशन तडस. निर्मितीः सुरेंद्र वानखेडे व उत्कर्ष तायडे.
  • प्रस्तुतीः बहुजन रंगभूमी, नागपुर



बहुजन रंगभूमि नागपुर गत (35) वर्षापासून म्हणजे 14 एप्रिल 1990 पासून 2024 सातत्याने महाराष्ट्रातुन भारतीय रंगभूमिवर कार्य करणारी अग्रणी नाट्य चळवळ आहे. या रंगभूमिचा उद्देश्य देशातील अस्पर्शिताना या नाट्य सांस्कृतिक चळवळीत आणून देशातील मुळ, ज्या रंगभूमिला हजारो वर्षांचा स्वतंत्र असा इतिहास राहिलेला आहे. पण ती मुद्दाम दुर्लक्षित ठेवल्या गेली आहे अश्या बु‌द्धिस्ट ऐतिहासिक रंगभूमिला पुनर्जीवित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या विचारांच्या knowledge थिएटर उभे करने आहे. बहुजन रंगभूमि या नाट्य चळवळीतुन उभे झालेले कलावंत देशभरात कार्यरत दिसतात. आजपर्यत संस्थेने सत्तर (70) च्या जवळ पास नाट्य कृतींची निर्मिति करून, त्याचे हजारो यशस्वी प्रयोग भारतभरात संस्थेने केलेले आहे. विशेष म्हणजे बाल नाट्य चळवळी वर तीन दशके सातत्यपूर्ण कार्य करणारी ही एकमेव विदर्भ- महाराष्ट्रतील संस्था आहे. वीरेंद्र गणवीर यांनी या 35 वर्षात 13 बालनाट्य, 12 एकांकिका, 8 पथनाट्य, 1 महानाट्य आणि 16 नाटकांचे लेखन केलेले असून त्यात" उजळल्या साऱ्या नव्या दिशा", "दि लॉस्ट हुमान्स", "हिटलर की आधी मौत", "घायाल पाखरा", " भारत अभी बाकी है" "गटार", "भारतीय रंगभूमिचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष", "मैं फिर लौट आऊंगा" प्रामुख्याने या कलाकृति प्रसिद्ध आहेत.

बहुजन रंगभूमि च्या बहुतांश नाट्यकृतिना आणि कालवंतना निर्मिति बरोबरच लेखन, दिग्दर्शन, अभिनयाबरोबर सर्वच बाबतीत हजारो नामांकित पारितोषिके राज्य आणि राष्ट्रिय स्तरावर प्राप्त झालेली आहेत. बालनाट्य, पथनाट्य, एकांकिका, लोकनाट्य, महानाट्यांचा यात समावेश आहे. याच सोबत संस्थे‌द्वारे आज पर्यंत 31 युवकां बरोबर मुलांसाठी थिएटर कार्यशाळा विविध राज्यात घेतल्या गेल्या आहेत. दर वर्षी नाट्य आणि बालनाट्य महोत्सवाच्या विशेष आयोजना बरोबरच भारतीय रंगभूमिच्या संशोधनाच्या दृष्टीने राष्ट्रिय कांफेरेंस, परिसंवाद, चर्चा सत्र असे विविध बौ‌द्धिक नाट्य चळवळ वरती उपक्रम चलविले जातात आणि यातूनच अनेक रंगकर्मी राष्ट्रिय स्तरावर या क्षेत्रात अकेडमिक क्षेत्रा सोबत चित्रपट, मालिका, जाहिरातीतुन ज्यात तृषान्त इंगळे, सुरेंद्र वानखेडे, श्रेयश अतकर, अमित गणवीर, प्रीती नारनवरे, समीर रामटेके, वैष्णवी करमकर, सुहास खंडारे, स्वप्निल राउत हे कलावंत अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमधुन तसेच सुरेंद्र वानखेडे (जे एन यू, दिल्ही स्नेहलता तागड़े (एन एस डी), तथागत गायकवाड़ (फिल्म एंड telivision इंस्टिट्यूट, पुणे), अमित गणवीर, दर्शन दामोदर (थिएटर आर्ट्स, मुम्बई), आणि अतुल सोमकुंवर सारखे जुजबीचे कलावंत आज वैश्विक रंगमंचावर आपल्या अभिनय प्रतिभेला विस्तारित करताहेत... ज्यांचा बहुजन, रंगभूमिला उभे करण्यात मोठा वाटा आहे त्यात वीरेन्द्र गणवीर सह सुरेंद्र वानखेडे, अतुल सोमकुंवर, अमित गणवीर, प्रियंका तायडे, श्रेयश अतकर, अस्मिता पाटिल, साँची तेर्लेग, धम्मपाल माटे, उत्कर्ष तायडे, ऋषिल ढोबले, आशीष दुर्गे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यंदा बहुजन रंगभूमिला 35 वर्षे पुर्ण होताहेत. नाटक तालमी करतांना च्या समस्या नागपूर हे ऐतिहासिक सांस्कृतिक झपाट्‌याने विकसित होत असलेले शहर असले तरी पण इथे नाटकाला तिळमात्र प्रतिष्ठा नाही आहे. राजकीय दृष्ट्या मागासलेल्या मानसिकतेत इथली सांस्कृतिक जडण घडण पाहिजे तशी स्वतंत्रही नाही आहे. जातीच्या चाकोरीत ती कुठे ना कुठे राजकीय गुलामीची बांधील आहेत म्हणून इथले नाटक अथवा सांस्कृतिक विकास होतांना दिसून येते नाही. याचा अर्थ असा ही नाही की इथे रंगभूमी नाही आहे इथे नाटक घडतं,

 पण केवळ स्पर्धेच्या काळात अथवा दिवाळी दसरा असल्यासारखे कधी कधी नाटकवाले उभे दिसतात. मुंबई- पुण्याची व्यावसायिक नाटके इथुन गल्ला जमवुन जातात. परंतु इथल्याच नाटकांना सो कॉल्ड प्रेक्षक वळुनही बघत नाहीत. इथं चांगले - वाईट समिक्षा नाहीत. पत्रकारांना स्वःता नाटकाब‌द्दल लिहुन द्यावे लागते. कसे नाटक जगणार ?? परंतु बहुजन रंगभूमी नागपूर, सादत्याने वर्षभर नव्या निष्ठावान रंगकर्मी कार्यकर्ते निर्माण करून हे कार्य करीत असते. नागपुरात समज भवन, शाळा, लग्नाचे हॉल, प्रायव्हेट सरकारी हॉल इत्यादी भरपूर आहेत परंतु ते नाटकवाल्यासाठी नाहीत. अनेकदा तालमिसाठी भाडे वसूल केले जाते. त्यात त्यांच्या इतक्या जीवघेण्या प्रचंड अटी असतात की कुठलेच साहित्य घेऊन तालीम करता येणार नाही, वेळेचे बंधन, आवाज करता येणार नाही, मध्येच तालमी बंद करण्याच्या सूचना. कधी ही सामान बाहेर काढा अश्या धमक्या अश्या भीतीदायक वातावरणात आम्ही नाटक करतो... नाटकवाल्यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन ही अतिशय वाईट आहे. अनेकदा सन्मान सोडा, माणूस म्हणूनही त्यांना नीट वागणूक दिली जात नाही हा आमचा थिएटर करतानांचा दुर्दैवी अनुभव आहे. नागपुरात प्रोडूसर हा प्रकार नसतोच. तेव्हा नाटकाचा दिग्दर्शक हाच निर्माता व कलावंत जमाविण्या पासून सेट, लाइट्स, तालमीच्या जागा इतर सर्वच गोष्टींची ही सगळी व्यवस्था तोच करीत असतो. अनेकदा महापालिकेला पत्र देऊन ही तालमीच्या जागे बाबत उदासीन धोरण त्यांनी अवलंबिले असते, या सर्व बिकट परिस्थितीत ही आम्ही शुन्यातुन जग निर्माण करण्यावर विश्वास ठेवणारी माणसे आहोत म्हणून एका नाटकाचे 100 150 च्या वर प्रयोग स्वताःच्या हिमतीवर करतो. व्यावसायीक नाही सामाजिक नाटक हौशी प्रायोगिक रंगभूमीवर यशस्वी करून दाखवले आहे. वर्कशॉप घेत असतो सातत्यपूर्ण, एकांकिका, नाटक, पथनटक, बाल नाटक यातून चांगल्या कलाकृती निर्माण करायचा, लेखक दिग्दर्शक कलावंत व प्रेक्षकही निर्माण करायचे असतात आम्हाला. पण या असल्या वातावरणात कलावंत पार खचून जातात व कायमची रंगभूमी सोडतात. प्रत्येक वेळेला नवीन कलावंतांना तय्यार करीत आयुष्य एका टोकावर येवुन संपायला लागले. ह्याला ही व्यवस्था जबाबदार नाही का ??

14 एप्रिल 1990 रोजी दक्षिण नागपूर येथून संस्थेची स्थापन करण्यात आली. 35 वर्षांपासून आमची संस्था निष्ठेने कार्य करीत आहे. संस्थेने आजवर विदर्भ, महाराष्ट्र आणि देशाच्या अनेक प्रांतातून सुमारे 75 च्या जवळपास एकांकीका, पथनाट्य, नाटक, बालनाट्ये, महानाटक सादर केलेली आहेत, आमच्या नाट्य चळवळीचा उद्देश समाज परिवर्तन हाच आहे. बुद्ध, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या जीवनमुल्यांचा पुरस्कार करणे. या देशातील बहुजन समाजाला परिवर्तनाशी जोडणे बाल आणि युवा कलावंतांना इलेक्ट्रॉनिक मिडीयापर्यंतची सर्व दोर उघडून देण्याचा प्रयत्न करणे हे आमच्या रंगभूमीचे ध्येय आहे. त्यातून नवे कलावंत मन, एक नवे पक्षक मन परिवर्तनाच्या वाटा चालणारे नवे समाजमन जन्माला घालणे यासाठी आमची रंगभूमी धडपडते आहे. याकरीता रंगभूमी राज्यस्तरीय संशोधन परिषदा, नाट्य शिबीरे, नाट्य महोत्सव, व्यक्तीमत्व विकास शिवीर, खुली चर्चासत्र, परिसंवाद, नाट्यवाचन असे नानाविध उपक्रम सातत्याने राबविण्याची पराकाष्ठा करीत आहे. फुले, आंबेडकरांना अभिप्रेत समाज परिवर्तनाची चळवळ गतिमान व्हावी, तिला नवी विज्ञान शक्ती प्राप्त व्हावी असा आमच्या रंगभूमीचा ध्येयवाद आहे. रंगकर्मी म्हणून भंते अश्वघोष यांचे 'बुद्ध चरितम्', ज्योतिबा फुल्यांचे 'तृतीय रत्न' हे नाटक, अण्णाभाऊ साठे यांचे लोकनाट्ये, लोककलावंत आणि मराठीतील परिवर्तनवादी नाट्य विश्व यांची प्रेरणा आमच्या पाठीशी आहे. या प्रेरणेचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीकारी प्रेरणेचे बळ हेच आमचे बळ आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com