Top Post Ad

बदलापूर...आदर्श विद्यामंदीर....चौकशीसाठी एसआयटीची नियुक्ती... वकील उज्ज्वल निकम

  बदलापुरच्या आदर्श विद्यामंदीर शाळेतील  ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीने  ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत… म्हटल्यावर आईने दवाखान्यात नेले. तेव्हा कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या इसमाने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचे बळी बनवले. चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना व्हायरल होताच संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन रेलरोको केला आणि आरोपीला तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने या प्रकरणाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवले आहे.  १४ ऑगस्ट रोजी सदर घटना घडली मात्र ती अशा तऱ्हेने बंद डब्यात ठेवण्यात आली की ती लोकांपर्यंत यायला २० तारीख उजाडावी लागली. यावरून येथील प्रशासन यंत्रणा किती जलद गतीने कार्य करीत आहे. आणि आरोपींना मोकाट सोडण्यासाठीच काम करीत आहे का असा सवाल आज बदलापूर शाळेत जमलेल्या पालकवर्गाने केला. 

 आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली.    24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदेची  1 ऑगस्टला  शाळेत नेमणूक झाली. सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आरोपीवर या चिमुकल्या मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली आणि घात झाला. आरोपीचं वागणं संशयास्पद होतं, अशाही परिस्थितीत शाळेने या आरोपीवर जबाबदारी देत नालायकपणाचा कहर केल्याची टीका होत आहे.  त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे 14 ऑगस्ट रोजी उजेडात आले.  यातील एका मुलीने आमच्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय, असंही या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला, तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलीसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. असा आरोप येथील पालकवर्गाने केला आहे. 

पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.  घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले असून एसआयटीची नियुक्ती केली आहे. तर या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. ज्यांच्याकडे या आधी कल्याण येथील पुजाऱ्यांनी मंदिरामध्येच एका महिलेवर अत्याचार केलेल्या खटल्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. यापूर्वी या प्रकरणात SIT ची स्थापना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रस्ताव आजच दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. 

ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी  याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थिनीना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक, किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आले पाहिजे. सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल.  आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्यात येणार. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा झाली असून सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही दिले आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मला वाटतं की आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी (लाडली बहन) योजना राबवतोच पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे, देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या, तर त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.. दिल्लीत काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण घडले होते. त्या आरोपीला फासावर लटकवायला इतका वेळ लागला. अशा प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रियेला विलंब करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवे. हातरस, उन्नाव, राजस्थान किंवा आता बदलापूरमध्येही प्रत्येक आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आमच्या मुलींना संरक्षण मिळाले पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे दोन ते तीन दिवसांचे झाले होते. आमचे सरकार गद्दारांनी पाडले म्हणून आम्ही हे विधेयक आणू शकलो नाही. आता त्यांनी हे विधेयक रखडवले आहे. हे विधेयक मांडून या आरोपींना या शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचे मला समजले. यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही. कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलेच पाहिजे,  पुणे हिट अँड रन आरोपी मिहीर शाह अटकेत आहे. त्यांनी पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीला निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे ते या नराधमाला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? कठोर कारवाई व्हायला हवी आणि न्याय प्रलंबित प्रक्रियेत अशी प्रकरणं गायब होणं परवडणारं नाही. तेव्हाच आपण म्हणू शकतो की, आपल्या लाडकी बहन आणि मुलींबद्दल आपल्याला आदर आहे.- उद्धव ठाकरे

आरोपीला तात्काळ फासावर लटकवा या मागणीसाठी  बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रचंड आंदोलन करण्यात येत होते. पोलिसांनी आंदोलकांना वारंवार विनंती करुन देखील आंदोलक माघार  घेण्यास तयार होत नव्हते. आंदोलकांनी जवळपास 9 तास रेल्वे सेवा ठप्प केली होती.  अखेर  पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. यावर आंदोलकांकडून दगडफेक झाली. पण पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत गर्दीला पांगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.  पोलिसांच्या लाठीचार्जनंतर काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाला सध्या छावणीचं स्वरुप आलं आहे. पोलिसांनी संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक खाली केलं. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलक रेल्वे रुळाच्या बाहेरच्या दिशेला निघाले. संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक रिकामं करण्यात पोलिसांना यश आलं.

तू अशा बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे''-  बदलापूरचे माजी नगराध्यक्ष  वामन म्हात्रे
बदलापूर प्रकरणी एक महिला पत्रकार वार्तांकन करत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष  वामन म्हात्रे यांनी घाणेरडी भाषा वापरली आहे. ''तू अशा बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे''.असं वादग्रस्त विधान वामन म्हात्रे यांनी केलं आहे. म्हात्रे यांच्या विधानामुळे पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर जनउद्रेक होईपर्यंत ढिम्म राहिलेले वामन म्हात्रे या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेत्याने, महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य भाषेत केलेल्या विकृत शेरेबाजीचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध करत आहे.  तुम्ही घटनेचे वार्तांकन असे करताय की जणू अत्याचार आपल्यावरच झाला, असे कमालीचे हीन वक्तव्य वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून केले आहे. वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध करीत आहे.. वामन म्हात्रे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करत आहे. -  अध्यक्ष- संदीप चव्हाण


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com