Top Post Ad

पंतप्रधानांनी माफी मागितली आता ख-या गुन्हेगारांना शिक्षा करा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या राजकोट किल्यावरील पुतळा भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर माफी मागावी लागली. महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमानासाठी आवाज उठवणा-या तमाम शिवप्रेमींचा व मुंबई काँग्रेसचा हा विजय आहे. छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही व झुकणारही नाही हे आज पुन्हा अधोरेखित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असली तरी ना खाऊंगा, ना खाने दुंगा अशी वल्गणा करणा-या मोदींच्या नाकाखाली झालेल्या भ्रष्टचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भाजपाला भ्रष्टाचाराचा भस्या रोग जडला आहे, किरकोळ कारवाई करून पाप झाकले जाणार नाही, याप्रकरणी संबंधित जबाबदार बड्या धेंडांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

 


 यासंदर्भात बोलताना प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेच्या भावना तीव्र आहेत. या घटनेस जबबादार असणाऱ्यांवर सरकार कारवाई करत नाही परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी आवाज उठवणाऱ्यांवर भाजपाचे निर्लज्ज सरकार कारवाई करते. काँग्रेस नेते व पदाधिकारी यांना घरातून बाहेर पडू दिले नाही, हा कुठला न्याय आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी यासाठी मुंबई काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती परंतु गुजरात धार्जिण्या भाजपा युती सरकारने काँग्रेसचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता व महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुजरातची हुजरेगिरी करण्यात धन्यता वाटते. नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत शिवरायांच्या मावळ्यांचा आवाज पोहचू नये म्हणून फडणवीसांनी मोठा पोलीस फौजफाटा काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर ठेवला पण स्वाभिमानाचा या बुलंद आवाजाने दिल्लीच्या तानाशाहच्या कानाचे पडदेही फाडले व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या भूमीत गद्दारांची गय केली जाणार नाही हेच दाखवून दिले.

महाराजांच्या पुतळ्याचे गुन्हेगार, बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारे खरे गुन्हेगार मोकाट आहेत, पोलिसांवर धावून जाणारे व घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपा नेत्यांवर कारवाई करण्याची हिम्मत देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही. फडणवीस फक्त विरोधकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा वापर करतात पण जनतेच्या भावना दुखवल्या आहेत, सरकारने हा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो दबणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस व युती सरकारला जनता माफ करणार नाही.  काँग्रेसचे आमदार अमिन पटेल, अस्लम शेख, भाई जगताप, सचिन सावंत, संदीप शुक्ला, प्रनिल नायर, महेंद्र मुणगेकर, कचरू यादव, सुरेशचंद्र राजहंस, डॉ ज्योती गायकवाड, अखिलेश यादव, रवी बावकर यांच्यासह नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याबद्दल खासदार वर्षा गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपा युती सरकारचा धिक्कार केला.


 मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी पार्क येथे कोकणातील मालवण येथील पुतळा प्रकरणी प्रतीकात्मक भ्रष्टाचार आणि महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा/ आंदोलन करण्यात आले यामध्ये अॅड. रवी जाधव सहभागी झाले. कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये जन आक्रोश मोहीम करणार असून. महाराष्ट्रातील सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केली, छत्रपतीचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही येणाऱ्या काळात जनता ही त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही जाधव म्हणाले.

महाविकास आघाडीचे रविवार, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता 'जोडे मारो' आंदोलन
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणी आहे. या घटनेचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. जी घटना घडली, त्यामागे जे दोषी आहेत त्यांना सोडून इकडे आमच्या मागावर पोलीस फौजफाटा पाठवलाय.. किती ही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढत राहणार..धिक्कार असो या सरकारचा..! लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत अतिघाईने राजकीय फाय‌द्यासाठी महायुती भ्रष्ट्र सरकारने गाजावाजा करीत मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले होते. या खोके सरकारने महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही अतिभ्रष्ट्राचार केल्यामुळे मात्र अवघ्या ८ महिने २२ दिवसांतच शिवरायांचा पुतळा कोसळला. ही अतिशय शरमेची बाब असून तमाम शिवप्रेमींच्या अस्मितेचा अपमान आहे. हे म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून त्रिवार सत्य हेच आहे की, हे सरकार जनतेचे नव्हे, तर केवळ ठेकेदारांचे आहे. या बनावगिरी सरकारच्या भ्रष्टाचार विरोधात महाविकास आघाडीने रविवार, दि. १ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी १० वाजता 'जोडे मारो' आंदोलन पुकारले आहे. या मोर्चाची सुरुवात हुतात्मा चौक पासून होऊन गेट वे ऑफ इंडिया पर्यंत असणार आहे. तरी आपण या 'जोडे मारो' आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन मुंबई काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

 माझ्या राजाच्या शब्दाखातर जागले ते खरे मावळे,
आजचे धूर्त सरकार केवळ सत्ता नि पैशांच्यामागे धावले..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com