संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची तपोभूमी श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर व भंडारा डोंगराची शासनमते सन २०११ ची मूळ न्याय्य अधिसूचना ही अध्यादेश काढून शासनाने कायम स्वरूपी लागू करावी. वारकरी संप्रदायाला हा पुरातत्व शासनाचा २०११ चा सुधारित प्रस्ताव मान्य नाही. वारकरी, फडकरी, दिंडीकरी व महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतीनी ठराव करून त्यावर वेळोवेळी अनेक हरकती नोंदविल्या आहेत. परंतु त्यावर निर्णय घेणे शासनाचे प्रमुख कर्तव्य असतानाही अद्यापपर्यंत शासकीय स्तरावरून याची कुठल्याही प्रकारे संवेदनशिलपणे दखल घेतलेली नाही. या तपोभूमी डोंगरांप्रति असणारा वारकरी संप्रदायाचा जिव्हाळा तसेच संस्कृती प्रेमी, इतिहास प्रेमी आणि जनभावनेचा गांभीर्याने विचार करून दोन्ही डोंगरांची सन २०११ ची मूळ अधिसूचना जशीच्या तशी लागू करण्याचा अध्यादेश त्वरित काढावा आणि या तपोभूमी डोंगरातील अतिक्रमण त्वरित हटवावे अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीने आज जाहीर करण्यात आले. याबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीचे अध्यक्ष मधुसूदन पाटील, कार्याध्यक्ष माधवी माने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. याबाबत मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी देण्यात आले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सन २००७ पासून संतभूमी संरक्षक संघर्ष समिती चे प्रमुख मधुसूदन पाटील महाराज तसेच वारकरी आणि शेतकरी सनदशिर मागनि संत तुकोबांच्या तपोभूमी रक्षणार्थ आंदोलन करीत आले आहेत. वारकऱ्यांनी "डाऊ' ला या संतभूमीतून हाकलून हद्दपार केल्यानंतर, मधुसूदन महारांजांच्या अभ्यासपूर्ण आणि सातत्यपूर्वक पाठपुराव्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाला हा प्राचीन लेणी वैभवसंपत्र, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा हा अमूल्य वारसा श्री क्षेत्र भामचंद्र व भंडारा डोंगर सन २०११ ला "राज्य संरक्षित स्मारक म्हणून अधिसूचना काढून घोषित करावा लागला, परंतु या तपोभूमी बाबत अनभिज्ञ असणारे म.औ.वि.म. तसेच येथील सुधारीत प्रस्तावाच्या नावाखाली पुरातत्व विभागाने आमुलाग्र बदल करून रा.सं. स्मा अंतर्गत संरक्षित झालेले क्षेत्र निम्म्याहून कमी केले व तसा प्रस्ताव पुरातत्व विभागाने सन २०१२ ला शासनाकडे मंजुरीस पाठवाला परंतु हा प्रस्ताव कसा चुकीचा आहे व या तपोभूमी डोंगरांचा कसा विध्वंस करणारा व ऐतिहासिक वारशाला कसा हानिकारक आहे हे वेळोवेळी अनेक पत्र प्रस्ताव निवेदनाद्वारे महाराजांनी दाखवून दिले तसेच तिथे झालेले अतिक्रमणयुक्त अवैध उत्खणन पुराव्यानिशी शासन दरबारी सिद्ध देखील केले. असे असून देखील शासन प्रशासन कोणताही निर्णय घेत नाही म्हणुन शासनाच्या या धोरणा विरोधात वारकऱ्यांमध्ये रोष आहे.
- प्रमुख मागण्या
- 1. राज्य संरक्षित स्मारक कायद्यानुसार सन २०११ मध्ये भंडारा- भामचंद्र डोंगरांसाठी काढलेल्या अधिसूचने प्रमाणे अध्यादेश काढावा आणि तो कायम करावा
- 2. सन २०११ च्या अधिसूचने प्रमाणे भंडारा-भामचंद्र डोंगर संरक्षित क्षेत्रात व MIDC भूमाफिया यांनी बेकायदेशीर रित्या केलेले अतिक्रमण त्वरित काढून टाकावे
- 3.सन २०११ च्या अधिसूचने प्रमाणे भंडारा-भामचंद्र डोंगर संरक्षित क्षेत्रा भोवती संरक्षक भिंत बांधून हद्द कायम करावी
- 4. प्राचीन बौद्ध, जैन आणि शैव लेण्यांचे जतन संरक्षण व संवर्धन करण्यात यावे
- 5. भूतदया गायी पशुंचे पालन ! तान्हेल्या जीवन वनामाजी !! संत तुकाराम महाराजांच्या या अभंग वाचनाला अनुसरून साधक आणि पशु पक्षांसाठी पाण्याची सोय करावी व अशाप्रकारे जैव विविधतेने नटलेल्या या डोंगर परिसराचे जतन करण्यात यावे
- 6. प्रदूषणमुक्त परिसर राहण्यासाठी डोंगर परिसरातील कंपन्यांवर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रचलित असलेल्या कायद्यांचे पालन करण्याचे कडक निर्बंध घालावेत
- 7. प्राचीन भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा असलेल्या लेण्यांचे अस्तित्व नाकारून खोटे ठराव करून वरिष्ठांची दिशाभूल करणारी माहित देनाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी
- 8. या क्षेत्रा संबंधात जात आणि धर्माच्या आधारे समाजात दुही निर्माण करून शांततेचा भंग करणाऱ्या आणि अराजकता व दहशत माजविणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत
- 9. सन २०११ च्या अधिसूचने प्रमाणे भंडारा-भामचंद्र डोंगर संरक्षित क्षेत्रात लाखो करोडो रुपयांचा संघटीतपणे जमीन गैर व्यवहार करणाऱ्या व्यक्ती विरोधात संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात यावी
- 10. सन २०११ च्या अधिसूचने प्रमाणे भंडारा-भामचंद्र डोंगरा चे अध्यादेश काढून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना पुरातत्व विभाग, सांस्कृतिक विभाग, पर्यावरण विभाग, पर्यटन विभाग, प्रदूषण विभाग वनविभाग, जैव विविधता विभाग नगररचना विभाग आणि महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने देण्यात याव्यात
- 11. नियम आणि कायद्याची जाणीवपूर्वक पायमल्ली करणाऱ्या संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी
- 12. संत तुकाराम महाराजांच्या ध्यान चिंतन तपोभूमी अंतर्गत श्रीक्षेत्र घोराडा (शेलारवाडी लेणी) येत आहे परंतु तो पूर्वीच केंद्र शाषित पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे या डोंगरातही वरील मागणी क्रमांक ८,९,११,९०, प्रमाणे कार्यवाही करावी. व या डोंगराच्या पायथ्याला झालेले अतिक्रमण हटवून डोंगर सभोवती संरक्षित भिंत बांधून येथील साधकांची शांतीएकांत, व सुरक्षितता अबाधित ठेवावी.
- 13. भंडारा -भामचंद्-घोराडा डोंगरांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे, सुरक्षा भिंती भोवती प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा रक्षकांचे नियोजन करावे.
- 14. भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगरांच्या सोई सुविधा आणि भविष्यातील कामांचे नियोजन आणि व्यवस्थापन "संतभूमी संरक्षक संघर्ष समिती" महाराष्ट्र राज्य यांच्याशी विचार विनिमय करून ठरविण्याची कायम स्वरूपी तरतूद करण्यात यावी.
0 टिप्पण्या