Top Post Ad

बदलापूर:आदर्श विद्यामंदीर....आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र स्वीकारायला वकिलांचा नकार

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदीर शाळेत घडलेल्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचं वकीलपत्र स्वीकारायला कल्याणमधील वकिलांच्या संघटनेन नकार दिला आहे. अक्षय शिंदे याच्यासारखे नराधम कधीच तुरुंगाबाहेर येऊ नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचे वकिलांच्या संघटनेने सांगितले. डीआयजी आरती सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटीने पथकाने मंगळवारी बदलापूर पोलिसांकडून याप्रकरणाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली होती.  अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सध्या पोलिसांकडून अक्षय शिंदे याची कसून चौकशी सुरु झाली आहे. या घटनेची दखल  मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली. हायकोर्टाने आपल्या सुनावणीत राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं होतं, लोकांनी रस्त्यावर उतरण्यापर्यंतची वाट तुम्ही पाहाता का, अशा शब्दात सरकारला फटकारलं. त्यामुळे, हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनले आहे. तक्रारदारांना ११ तास पोलिसस्टेशन मध्ये बसवून ठेवणारी  पोलीस यंत्रणा ते राज्य सरकारमधील मंत्रीही आता गांभीर्याने या प्रकरणात लक्ष घालत आहेत.


  बदलापूरमध्ये मंगळवारी नागरिकांकडून उग्र आंदोलन करण्यात आले होते. बदलापूरच्या आंदोलनाला नेतृत्व नव्हते,    बुधवारी बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.  या नागरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके नेमली आहेत.  या तपासात अनेक आंदोलक बाहेरचे होते असे म्हटल्याचे जात असतानाच ज्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यांची माहिती पाहिली असता ते सर्व बदलापूरचे रहिवाशी असल्याचे समजते आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी 68 जणांना अटक केली आहे. यात कल्याण रेल्वे पोलिसांनी 28 जणांना तर बदलापूर पूर्व पश्चिम पोलिसांनी 40 जणांना अटक केलीय.  सध्या बदलापुरात तणावपूर्व शांतता आहे. बदलापुरातील तीव्र आंदोलनाची दखल जवळपास संपूर्ण देशानं घेतली. अशातच आता या घटनेत 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  बदलापूर रेल्वे पोलिसांनी  अटक केलेल्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या अजामीनपात्र गुन्ह्यांविरोधात वकील आक्रमक झाले आहेत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

दरम्यान बुधवारी बदलापूरमध्ये अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. अक्षय शिंदे खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो. ग्रामस्थांनी बुधवारी त्याच्या घरात शिरत कुटुंबीयांना बाहेर काढले आणि घरातील सामानाची तोडफोड केली. यानंतर गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हुसकावून लावत गाव सोडण्यास भाग पाडले. अक्षय शिंदे याचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे. अक्षयचा जन्म खरवई गावात झाला होता. तो याठिकाणी असणाऱ्या एका चाळीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ असे तिघेजण आहेत. अक्षयच्या कृत्यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तो दहावीपर्यंत शिकला होता. यापूर्वी तो एका इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. खरवईच्या ग्रामस्थांनी अक्षय शिंदे याच्या घरावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्या घरात लहान मुलांची खेळणी सापडली. ही खेळणी नेमकी कुठून आली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याबाबत एसआयटी पथकाकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. 

"नराधमांचं सरकार आहे का?, राजकारण आहे म्हणणारेही विकृत आहेत" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुरक्षित बहीण हे प्राथमिकता आहे. जर बहीण सुरक्षित असेल तरच लाडकी बहीण योजना ही आणता येईल. २४ ऑगस्टला महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी विनंती करतो की, आपण जात-पात, धर्म हे सर्व बाजुला ठेवून बंदमध्ये सहभागी व्हा. हा बंद माझ्या बहिणींसाठी आहे. आपण जागृत आहोत हे दाखवण्यासाठीचा हा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवू शकतो. उद्रेकाला वाचा फोडण्यासाठीचा हा बंद आहे. राज्यभर निषेध होत असताना मुख्यमंत्री कुठे होते? ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून ही योजना आणली आहे. पण हे विकृती आहे, दुष्कृत्य आहे. एखाद्या घटनेचा निषेध करणं यात राजकारण कधीपासून यांनी वाटायला लागलं. बातमी वाचण्याचं धाडस माझ्यात नाही. ही विकृती आली कुठून? मुलीच्या गर्भवती आईला १२ तास बसून ठेवलं, तिला १०२ ताप आहे, रुग्णालयात दाखल करावं लागलं. हे सरकार कोणाचं आहे, नराधमांचं सरकार आहे का? आम्ही राजकारण करत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते कोणाच्या बाजुने आहेत?, हे असंवेदनशील सरकार आहे. जर त्यांना वाटत असेल यात राजकारण आहे तर असं म्हणणारे सुद्धा विकृत आहेत " - उद्धव ठाकरे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com