मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई विभागीय काँग्रेसने मुंबई न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी मुंबादेवी मंदिरातून या न्याय यात्रेची सुरुवात होईल आणि दिवसाच्या शेवटी मुंबादेवी येथे समारोप होईल. या न्याय यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आणि मुंबईतील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्षा, खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आता विधानसभेलाही मुंबईतून जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपा व शिंदेसेनेला सत्तेतून बाहेर करायचे आहे. राज्यातील महायुती सरकारने सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार केला आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, मुंबईत महिला सुरक्षित नाहीत, गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून मुंबई न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे तसेच महायुती सरकारच्या विरोधात महायुतीचे पापपत्र जनतेच्या हाती दिले जाणार आहे, मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे. महायुती सरकारचा भ्रष्टाचार, पायाभूत सुविधांचा अभाव, रस्त्यावरील खड्डे, पावसात मुंबईची तुंबई झाली, महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. लाडका कंत्राटदार योजना सुरु असून मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटण्याचे काम महायुती सरकार करत आहे. दोन वर्ष झाली मुंबईमहानगर पालिकेच्या निवडणुका भाजपाप्रणित युती सरकारने घेतलेल्या नाहीत. न्याय यात्रा मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघाला भेट देणार आहे.स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कॉर्नर सभाही घेतल्या जाणार असल्याची माहीती गायकवाड यांनी दिली.
- मुंबई जोडो यात्रा शुभारंभ
- शनिवार दि. 10 ऑगस्ट सकाळी - 10 वाजता
- स्थळ - बँडस्टँड गार्डन, स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ, कोपरेज गार्डन, कुलाबा
- पहिला भाग -
- मा. स्वर्गीय राजीव गांधी पुतळा* (आंबेडकर पुतळा चोक) -
- डॉ.आंबेडकर पुतळा (महर्षी कर्वे रोड)
- बाळासाहेब ठाकरे पुतळा ते एअर इंडिया बिल्डिंग मार्गे मादाम कामा रोड
- एअर इंडिया बिल्डिंग ते महात्मा गांधी पुतळा - मंत्रालय मार्गे एन एस रोड ) समाप्त.
- दुसरा भाग -11:30 A.M
- गांधी पुतळा ते बॅकबे डेपो... कार आणि बाईकने प्रवास.
- कफ परेड येथील बॅकबे डेपो कुलाबा ते कफ परेड पोलीस स्टेशन ते T.L मार्गे पदयात्रा. वासवानी मार्ग.
- कफ परेड पोलीस स्टेशन ते म्हाडा संक्रमण शिबिर मार्गे टी एल वासवानी मार्गे पदयात्रा
- ट्रान्झिट कॅम्प ते डॉ आंबेडकर नगर टोक
- तिसरा भाग 12:30
- डॉ.आंबेडकर नगर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - कार व दुचाकीने विजय चौक
- वुडहाऊस रोड ते कुलाबा मार्केट - रीगल सिनेमा - हॉर्निमन सर्कल - मोदी स्ट्रीट - सीएसएमटी ते जय जवान चौक - आझाद मैदान
0 टिप्पण्या