Top Post Ad

उठसूठ 'शोभायात्रा' काढणारे...आता आक्रोश यात्रा' किंवा 'जवाब दो यात्रा' काढतील काय

 

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच घडली.  त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. काल दहिहंडीचा उत्सव धुमधडाक्यात साजरी केल्यानंतर आज २८ ऑगस्ट रोजी सर्वच राजकीय पक्षांना आणि नेत्यांना महाराजांच्या पुतळ्याची आठवण झाली आणि ते तडक सिंधूदुर्ग येथे पोहोचले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर निषेध नोंदवण्यासाठी गेले होते. त्याचवेळी नारायण राणे देखील या ठिकाणी आले होते.  आदित्य ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे आमने सामने आले. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा  झाला. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. तब्बल दीड तास राजकोट किल्ल्यावर धुमश्चक्री सुरु होती. या राड्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राड्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा नारायण राणे यांनी म्हटले की, आम्ही काहीही केले नाही. आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो. आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते. तेव्हा त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले. आम्ही काहीच केले नव्हते. आम्हाला काही करायचे असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही ओ, एकही पोहोचू शकला नसता घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का?, असे नारायण राणे यांनी म्हटले.

दरम्यान याप्रकरणी पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्टचरल इंजिनिअर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. यापैकी कल्याणमध्ये वास्तव्याला असणारा ब्राह्मण समाजातील जयदीप आपटे घराला टाळे लावून फरार झाला आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जयदीप आपटेच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. त्यामुळे आता तो नेमका कुठे आहे आणि पोलीस त्याला कधी ताब्यात घेणार. असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.   भारतीय नौदलाकडून फारसा अनुभव नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील 28 फुटांचा ब्राँझचा पुतळा उभारण्याचे काम त्याला देण्यात आले होते.  आपटेने अवघ्या सहा ते सात महिन्यांमध्ये शिवरायांचा हा पुतळा तयार केला होता. या कामापूर्वी  आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळे त्याला नेमक्या कोणत्या निकषांच्याआधारे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच काम देण्यात आले, असा सवाल उपस्थित करीत राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्रात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वातावरण तापलेले आहे. साधारण आठ महिन्यापूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी पुतळ्याचे अनावरण केले होते. आठ महिन्यातच पुतळा पडल्याने प्रियंका गांधी यांनी थेट मोदींना भष्ट्राचारी म्हणत हल्लाबोल चढवला आहे. इतकेच नव्हे तर मोदींनी केलेल्या कामाचा आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केलेल्या कामाचा थेट पाढाच प्रियंका गांधी यांनी वाचला आहे. पंतप्रधानांनी मागील वर्षीच सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. पण फक्त आठ महिन्यात पुतळा कोसळला आहे. अयोध्येचे मंदिर, उज्जैन महाकालमधील सप्तर्षींच्या मुर्ती, नवे संसदभवन, हायवे, पूल, रस्ते, मोठे बोगदे जे काही सरकारकडून बनवले जात आहे त्यामध्ये काही ना काही दोष आढळून येत आहे. पंडित नेहरु यांच्यावेळी सुद्धा भाकरा नांगल सारखी धरण उभारण्यात आली. हीराकुंड सारखे बांध उभारले गेले. IIT, IIM, AIIMS सारखी शैक्षणिक संस्थाने उभारण्यात आली. सर्वच्या सर्व अजूनही नीट आहेत आणि देशाच्या विकासात योगदान देत आहेत. पण भाजपने श्रद्धेच्या, महापुरुषांचा आणि देशाच्या नावावर भ्रष्टाचार केला त्याचे उत्तर द्यावे लागेल अशी भूमिका प्रियंका गांधी यांनी मांडली आहे.


महाराष्ट्राचे 'राज्यपाल ते मालवण' (महाराजांचा पडलेला पुतळा) असा वेळोवेळी या भाजपाई-संघीय व्यवस्थेने केलेला महाराजांचा अपमान, आपण अजून किती काळ सहन करणार? रोज अर्धचंद्रकोरीचा टीळा व कोरलेली महाराजांसारखी दाढी ठेवलेले, गळ्यात रुद्राक्षमाळ घातलेले, गाडीवर 'छत्रपती शासन' असं लिहलेले..."बघतोस काय मुजरा कर" व "इथे झुकावच लागतंय"...असं लिहणारे असंख्य मराठी-तरुण, कुठे आहेत आणि *कुठे आहे तो मराठ्यांना उल्लू बनवण्यासाठी 'संभाजी' नाव धारण केलेला मनोहर ऊर्फ संभाजी भिडे...???*
महिने दोन महिने शोभयात्रेची तयारी करणारे मराठी-तरुण, बॉसला सांगून कामावरुन लवकर येऊन तयारीला लागणारे तरुण....  शोभयात्रा अतिशय चोख व दिमाखदार व्हावी म्हणून झटणारे तरुण, शोभयात्रेत शिवकालीन वेषभूषा करणारे, शिवकालीन देखावा उभारणारे, मावळ्यांचे फेटे घालून शिवकालीन शस्त्रांचं वीरश्रीयुक्त प्रदर्शन करणारे...असा सारा जामानिमा करुन बेधुंद होऊन नाचणारे तरुण....
सिंधुदुर्गावर शिवछत्रपतींचा पुतळाच केवळ नव्हे; तर, अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता आणि शोभा ढासळली... पण, एकाही मराठी-तरुणाने तोंडातून ब्र तर नाहीच काढला...उलट, थयथया 'गोविंदा गोविंदा' करत नाचत राहीले! 
...निदान आतातरी, उठसूठ 'शोभायात्रा' काढणारे, या प्रकरणाबाबत एखादी 'मराठीजन-आक्रोश यात्रा' किंवा 'जवाब दो यात्रा' काढतील काय...???
- रत्नदीप कांबळे  (8898340312)

पत्रकार अमोल मोरे यांना धमकावल्याबद्दल भाजप खासदार नारायण राणे यांचा मुंबई मराठी पत्रकार संघाकडून तीव्र निषेध
आज बुधवार, 28 ऑगस्ट, 2024 रोजी राजकोट किल्ल्याच्या भेटीदरम्यान एबीपी वृत्तवाहिनीचे पत्रकार अमोल मोरे यांना धमकावल्याबद्दल भाजप खासदार नारायण राणे यांचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेऊन या अरेरावी प्रवृत्तीला रोखावे अशी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला त्या जागेचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गात आलेल्या राणे यांनी पत्रकाराचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मोरे यांचा बूम माईक संतापाने हिसकावून घेत, प्रश्न विचारल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.
 पत्रकारांना धमकवणाऱ्या नारायण राणे यांचे वर्तन पूर्णपणे अयोग्य आणि सत्तेचा माज दाखवणारे आहे. आम्ही याचा निषेध करतो. पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि समाजातील या जागल्याना त्यांचे काम करण्यापासून राणे किंवा अन्य कोणीही रोखू वा धमकावू नये हीच आमची भूमिका आहे.
नारायण राणेंनी पत्रकाराशी गैरवर्तन केल्याची ही लिंक.

संदीप चव्हाण - अध्यक्ष        
शैलेंद्र शिर्के- कार्यवाह

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com