सिडकोचा भूखंड अदानीच्या घशात... गुजरात-दिल्ली-मुंबई नंतर आता अदानी ठाण्याच्या वेशीवर
ऐरोलीतील ७० एकराचा भुखंड लाडक्या बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट
भुमिपुत्रांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भुखंडांचे वाटप करण्यासाठी आडेवेढे घेणार्या सिडकोने सत्ताधार्यांच्या दबावाखाली ऐरोलीतील ७० एकरचा भुखंड लाडक्या बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. राज्यात सिडकोने भुखंड विक्रीचा धडका लावला आहे. नवी मुंबई शहर प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर उभा राहिले आहे. प्रकल्पग्रस्तांना भुसंपादन झालेल्या जागेच्या बदल्यात साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भुखंडाचे वाटप केले जाते. या योजनेतील हजारो भुखंडांचे वाटप अद्याप झालेले नाही. जर प्रकल्पग्रस्तांनी साडेबारा टक्के योजनेतील भुखंडासाठी अर्ज केला तर भुखंड शिल्लक नाहीत असा कांगावा सिडकोच्या माध्यमातून केला जातो. मात्र बिल्डरच्या घश्यात घालण्यासाठी इतका मोठा भुखंड मोठ्या तत्परतेने उपलब्ध केला जात आहे. लाडक्या बिल्डरांच्या खशात भुखंड घातले जात असल्याचा आरोप होत आहे.
खारघरमध्येही सुमारे शंभर एकराच्या भुखंडाचा झोल करण्यात आला आहे. ऐरोलीमध्ये हजारो कोटी रुपये किंमतीचा भुखंड लाडक्या बिल्डरच्या घशात घालण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू आहे. हा घोटाळा सिडकोच्या कर्मचारी संघटनेने उघडकीस आणला असून त्यांचे धाडक कौतुकास्पद आहे. सिडको प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारच्या दबावाला बळी पडून हे भुखंड लाडक्या बिल्डरांच्या घशात घालण्यात येत आहेत. नवी मुंबई शहर हे प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर उभा राहिले आहे. मात्र त्यांची एकही मागणी सहजासहजी मान्य झालेली नाही. त्यांना प्रत्येक मागणीसाठी संघर्ष करावा लागत आहे. साडेबारा टक्के योजनेतील भुखंडाचे प्राधान्याने वाटप करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत.मात्र याकडे सरकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे प्रकल्पधारकांचे म्हणणे आहे.
या विरोधात माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी आज सिडकोवर धडक दिली. महिलांवर होत असलेल्या अत्यांचारांकडे यांना पाहयाला वेळ नाही. हे दिवसरात्र फक्त भुखंड शोधण्याचे काम करीत आहेत. याच कामात व्यस्त असल्यामुळे राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खोके सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे चालवले आहे. कडकी लागली की खोके सरकारने राज्य डबघाईला आणले आहे. भुखंड लाटायचे बाकी राहिल्यामुळे यांनी निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी टिकाही यावेळी विचारे यांनी केली.
0 टिप्पण्या