भारतीय संघ राज्यांमध्ये सुरुवातीपासूनच महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात प्रगतशील व शांतता सुव्यवस्था सुरक्षितता प्रिय राज्य मानले जाते . भारतीय संविधानाचा आधार असलेली शिव फुले सयाजी शाहू आंबेडकर गाडगेबाबा तुकडोजी पंजाबराव अण्णाभाऊ प्रबोधनकार ही विचारधारा इथेच जन्माला आली . पोसली . तसेच घरोघरी पोचली . समाजातील सर्व घटकांनी स्वीकारली . आत्मसात केली . परंतू दुर्दैवाने गेली काही वर्षे आर एस एस व भाजप क्रुरपणे महाराष्ट्रातील सौख्य कायमस्वरूपी बिघडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी कार्यरत आहे . त्यासाठी किरकोळ कारणावरून महाराष्ट्रात धार्मिक जातीय दंगली घडवून आणल्या जात आहेत . यामागची ऐतिहासिक कारणमीमांसा करताना या बाबी स्पष्ट होतात
मुळातच महाराष्ट्रावर अठराव्या शतकात पेशवाईचे प्राबल्य निर्माण करण्यात तत्कालीन ब्राह्मणी शक्ती यशस्वी झाल्या होत्या . छत्रपती निष्क्रिय व नामधारी झाले होते . या परिस्थितीत भारतातील प्लासीच्या लढाईत इंग्रजांना यश मिळाले आणि व्यापारी इंग्रज बंगाल प्रांताचे राज्यकर्ते झाले . नंतर बक्सरच्या लढाईतील यशाने इंग्रजी सत्तेला बळ मिळाले . तर त्याचवेळी भारतीय ब्राह्मणी शक्तीने इंग्रजांना आपले भाऊ मानले . मोगलशाही हारली व इंग्रज सत्तेवर आले हा आनंद साजरा करण्यासाठी बंगाली साहित्यिक बकीमचंद्र चटोपाध्याय यांनी आनंदमठ कादंबरी लिहिली . त्यात वंदे मातरम् गित घातले .. एकीकडे मराठेशाही खिळखिळी झाली व १८१८ जून मध्ये चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण चिंत्या नातूने शनिवारवाड्यावरील फडकणारा भगवा खाली उतरवून युनियन जॅक तेथे फडकवला . छत्रपती व पेशवे इंग्रजांचे गुलाम पाहूणे झाले ... पुढे १९४७ पर्यंत ब्राह्मणांनी इंग्रजांच्या काळात नोकरशहा बनून सत्तेचा मलिदा खाल्ला . परंतू अनेक प्रकारचे प्रयत्न करुनही इंग्रजांनी ब्राह्मणांना राजसत्तेच्या पायरीवर देखील येऊ दिले नाही .. तरीही इंग्रजी सत्ता रहावी असे मानणारा मोठा उच्च शिक्षित ब्राह्मण समाज होता . याच धामधुमीत ब्राह्मणांनी आर एस एस ची स्थापना १९२५ मध्ये केली . त्या दिवसापासून त्यांना महाराष्ट्रावर एकसुत्री आर एस एस ची रामदासी राजसत्ता प्रस्थापित करायची एकमेव तिव्र अभिलाषा आहे . इंग्रजांनी पेशव्यांकडून राज्य ताब्यात घेतले होते . ते इंग्रजांनी ब्राह्मणांनाच परत देणे व मनुस्मृती नुसार नव पेशवाईने राज्यकारभार करणे हीच ब्राह्मणी पाशवी इच्छा आहे . त्यामुळेच त्यांना भारतातील महाराष्ट्र वगळता अन्य सर्वच राज्ये व केंद्रशासित प्रदेशात एकहाती सत्ता व भारतात केंद्रीय सत्ता ताब्यात असली तरी समाधान नाही . एकच लक्ष्य , महाराष्ट्रात पेशवाई लादणे ... आणि हे यश मिळत नाही तोपर्यंत या मावळ्यांच्या अवर्णनीय कर्तृत्वाने निर्माण झालेल्या स्वराज्याचे जमेल तसे लचके तोडून महाराष्ट्र राज्य कंगाल करणे हे ब्राह्मणी कारस्थान सुरू आहे .
महाराष्ट्रात आर एस एस चे मुख्यालय आहे , जागतिक किर्तीचे ब्राह्मणवादी रामदासी विचारवंत आहेत , देशाच्या राष्ट्रपती पदावर ते प्रधानमंत्री , तिन्ही सेनाप्रमुख , सर्व नोकरशाही , सर्व उद्योजक, बैंकर्स , कुलपती कुलगुरू , सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक संस्था आर एस एस च्या ताब्यात आहेत . जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या आहेत. प्रत्येकाच्या मनात व ह्रदयात आर एस एस चे नाव व विचार पोचवले आहेत . तरीही महाराष्ट्रातील फाटका तुटका बहुजन समाज शिव फुले सयाजी शाहू आंबेडकर गाडगेबाबा तुकडोजी पंजाबराव अण्णाभाऊ प्रबोधनकार यांच्या विचारांचा वारसा सोडायला तयार नाही . शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दोन तुकडे केले , कॉग्रेसच्या नेत्यांना भाजपवासी केले तरी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पाहावा लागला . खरे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे चाळीस तर महायुतीचे आठ उमेदवार निवडून येणे अपेक्षित होते . परंतू भाजपला पोषक ठरणारा घोळ झाला . महाविकास आघाडीचे उमेदवार शंभर टक्के यशाची खात्री करून निवडले जातील . तिन्ही पक्षांचे एकमत झाले तरच उमेदवार नाव ठरवू . अशा चर्चा झाल्या . पण दुर्दैवाने तसे झाले नाही . महाराष्ट्रातील परिवर्तनवादी बहुजनवादी पुरोगामी चळवळींचे कार्य व विचार भारतीय राज्यातील गावोगावी पोहचलेले आहेत . २००४&२००९ मधील सार्वजनिक निवडणुकीत संभाजी ब्रिगेडची भंडारकर संस्था विरोधात केलेली कारवाई महाराष्ट्रात व देशात युपीए सरकार आणण्यासाठी उपयोगी ठरली होती . २०२४ मध्ये हीच पुनरावृत्ती झाली आहे . गेले अनेक वर्षे शेकडो पुरोगामी चळवळी रात्रंदिवस महाराष्ट्रातील समतावादी मानवतावादी संविधान आचरणातून प्रदर्शित करणारी जनता निर्माण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत .. या व अन्य कारणांमुळे आर एस एस चे प्रमुख नेते व कर्मठ ब्राह्मण अस्वस्थ झाले आहेत . सामाजिक चळवळीतील संभाजी ब्रिगेड व अन्य निवडक संघटना जनजागृती करत आहे . विविध धर्म जाती जमातीचे लोक सर्वच मतभेद विसरून एकत्र आले आहेत . तर राजकीय पक्षांचे शरदराव पवार , राहूल गांधी व उध्दव ठाकरे असे नेते जोपर्यंत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात आर एस एस चे एकहाती ब्राह्मणी सरकार स्थापन करणे अशक्य आहे , याची जाणीव आर एस एस व भाजपच्या नेत्यांना झाली आहे . सध्याच्या वातावरणात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण बहुमताने निवडून येणार आहे . हा मोठा धसका घेतला आहे ...
मध्ययुगीन काळात किल्ले जिंकून घेणे गरजेचे होते . मराठ्यांच्या शत्रुंना प्रयत्न करुनही अनेकदा किल्ले जिंकून घेणे जमत नव्हते . अशा वेळी शत्रू वेगवेगळ्या प्रकारच्या विध्वंसक आयुधांचा वापर करून मराठ्यांच्या किल्ल्यांचे अतोनात नुकसान करत होते ...वर्तमानातील शत्रू लोकशाहीचा अडथळा असल्याने महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक विधी आर्थिक शैक्षणिक राजकीय वातावरणात द्वेषमूलक भावनांची वादळे निर्माण करत असताना दिसतात . त्यातल्या त्यात २०१९ पासून देवेंद्र फडणवीसांच्या तोंडातील घास अनेकदा न गिळताच ओकावा लागला . तर मी पुन्हा येईल म्हणत मुख्यमंत्री पदाची संधी गेली . गुडघ्याच्या बाशिंगाला सांभाळत आहेत .तर २०२४ विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत . त्यातही पराभव स्पष्ट दिसत आहे .. याच कारणाने व सत्तेसाठी प्रचंड आसुसलेल्या विकृत भावनेने आर एस एस व भाजपने इतरांना ब्लॅक मेल करत महाराष्ट्रातील विकासाची पाच वर्षे गमावलेली आहेत ... आणि आता केंद्रातील सत्ता गेल्या मुळे त्यांची चिड चिड प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे . या पार्श्वभूमीवर आर एस एस व भाजप महाराष्ट्रातील महानगर नगर शहर गाव खेडे वाडा वाडी पाडा तांडा वस्ती अशा सर्वच ठिकाणी धार्मिक जातीय जमातीय भाषिक लिंग या क्षेत्रात दंगली घडवून आणण्यासाठी आकाशपाताळ एक करु शकतात असे अनेक गुप्तचर यंत्रणा , पोलीस यंत्रणा , संस्था , राजकीय नेते व अभ्यासक बोलत असतात ... महाराष्ट्रात एकहाती ब्राह्मणी सत्ता स्थापन होईपर्यंत महाराष्ट्राला बरेच काही गमवावे लागणार आहे ... तेव्हा पुरोगामी चळवळीतील मित्र मैत्रिणींनो , बंधू भगिनींनो सावध राहा . रात्र वैऱ्याची आहे .
धन्यवाद व सदिच्छा प्रशांत ..
+ पुरुषोत्तम खेडेकर चिखली .
दिनांक -- १८-८-२०२४ .
0 टिप्पण्या