सर जेम्स प्रिन्सेप यांच्या 225 व्या जन्मदिनांच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
जगात अनेक संशोधक होउन गेलेत त्याना नोबेल पुरस्कार मिळाले कारण त्याच्या संशोधना मुळे मानवी जीवनात अमुलाग्र बद्ल झाला . सर जेम्स प्रिन्सेप यानी सम्राट अशोक आणि त्यांची धम्मलिपी चा शोध लावला की त्यांच्या शोधा मुळे मानवी जिवनात सामाजिक व धार्मिक बाबतीत अमुलाग्र बदल घडून आले.सर जेम्स प्रिन्सेप यांचा जन्म 20 ऑगस्ट ,1799 इंग्लंड येथे झाला.त्याच्या आइचे नाव सोफिया व वडिलांचे नाव जॉन होते ,ते आपल्या आई वडिलांचे दहावे अपत्य होते.त्यांचे वडील भारतात 1771 ला मर्चेंट म्हणून आले वअमाप पैसा कमविला कारण ते व्यवसायिक होते, तसेच त्यांनी भारताच्या पार्लिमेंट मधे उच्च अधिकारी म्हणून काम केले,म्हणून त्याना असे वाटायचे की,माझ्या मुलाने सुद्धा भारतात जावे व अमाप पैसा कमवावा.परंतु जेम्स प्रिंसेप ला इंजीनियरिंग व आर्किटेक्चर मधे रुची होती. त्याची ट्रेनिंग पुर्ण झाल्या नंतर त्याला कोलकत्ता च्या मिंट मध्ये 15 सप्टेंबर ,1819 ला अच्छे मास्तर म्हणून नोकरी मिळाली,त्या वेळी त्याचे वय केवळ 20 वर्षे होते. त्याचे काम बघून त्याची बदली वाराणसी येथे करण्यात आली.त्याचे काम नाणे वर नव नवीन डिझाइन्स करणे व त्या निर्माण करणे. तो जेंव्हा फावल्या वेळात वाराणसी शहरात फिरत असते वेळी त्याला अनेक प्राचीन वास्तू दिसल्या त्यांचा उपयोग तो नाणे वर डिझाईन म्हणून वापर करायचा. वाराणसीतिल मिंट ची इमारत व चर्चची ईमारतिचे चे डिझाईन त्याने तयार केले ,तसेच त्याने वाराणसी शहराचा मैप तयार केला, तसाच तो एखाद्या विशिष्ठ तापमानावर धातू वितळऊन त्याचे वर डिझाईन काढण्यात निपुण होता.तसेच त्याने भारतात वजन व मापे यांच्यात सुधारणा करुन अचूक वजन मापन पद्धती शोधून काढली.तसेच त्याने इस्ट इंडिया कंपनी ला सुचविले की सिल्वर कॉइन हा एक सारखाच असायला पाहिजे,तसेच त्याने एक डिवाइस तयार केले की त्यांच्या साहाय्याने
तो वातावरणातील हवामान बदलाचे अचूक निदान करायचा, त्याने ब्यारोमीटर मधे सुधारणा करुन वातावरणातील तापमाण, हवामान व दाब आणि आर्द्रता यावर अचूक निदान करायचा.
तसाच तो एक उत्कृस्ट आर्टीस्ट ,ड्राफ्टमन होता,आणि तो प्राचीन मोनुमेन्ट चे स्केच तयार करायचा.त्याने वाराणसी शहरातील अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम्ं व सानिटेशन या मध्ये सुधारणा केल्या तसेच त्याने कर्मनसा नदीवर आर्च स्टोन ब्रिज निर्माण केला. त्याने अतिशय चांगल्या प्रमाणे कामे केलीत म्हणून त्याच्या कामाची दखल घेत त्याची बदली परत कोलकाता ला करण्यात आली.
1832 साली एसियाटिक सोसायटी ऑफ़ बंगाल ची स्थपना केली व त्याची नियुक्ती एशियाटीक सोसायटी ऑफ़ बंगाल चे सेक्रेटरी पदावर करण्यात आली. तसेच त्याने अभियान चालविले क्लीनिंग ऑफ़ साइंस व एक जर्नल काढले व त्या जर्नल च्या माध्यमातून तो रसायन शस्त्र ,भूगर्भशास्त्र,मिनरल आणि इंडियन antiquities वर लेखन करायचे.
कॉईन हा त्यांचा आवडीचा विषय होता तसेच तो कूशान कालीन नाणे व bactria व गुप्त कालीन नाणे चे लिप्यंतर करणे,खरोष्टी स्क्रिप्ट या मधे त्याचा जास्त इंटरेस्ट होता,तसेच निरनिराळे स्क्रिप्ट चे लिप्यंतर करन्यात त्याची अधिक रुची होती.एकदा अलाहाबाद ला असताना रस्त्याच्या कडेला त्याला एका खडकावर काही तरी लिहिलेले दिसले, सुरुवातीला त्याला वाट्ले की हे नैसर्गिक आहे. परंतु जेंव्हा त्याने निरीक्षण केले तेंव्हा त्याला असे आढळून आले की हे नैसर्गिक नसुन त्यावर कोणीतरी अक्षरे कोरलेली आहे.परंतु ती अक्षरे त्याला वाचता येत न्हवती ,त्या अक्षराबदद्ल त्याने अनेक लोकाकडे विचारणा केली परंतु कोणिही त्याला त्यावर काय लिहिले आहे हे वाचून सांगू शकले नाही.नंतर त्याला माहित पडले की संस्कृत ही आद्य भाषा आहे म्हणून तो संस्कृत चे जाणकार याना घेऊन तो त्या खडकावर काय लिहिले आहे हे वाचून दाखविण्या करिता घेऊन गेला,परंतु ते संस्कृत चे जाणकार सुद्धा काही वाचू शकले नाही म्हणून त्याने निस्कर्ष काढला की संस्कृत ही आध्य भाषा नाही. त्या अगोदर कोणती तरी भाषा होती.परन्तु त्याने हिंमत सोडली नाही व त्यावर विचार करु लागला.आणि असाच एक रॉक कट एडिक्ट ओरिसा मधे आढळून आला ,त्यांचे खरोष्टी वरिल लेख जर्नल मधून प्रसारित होत होते,नन्तर त्याला असे आढळून आले की अनेक ठिकाणी अश्या प्रकारचे रॉक एडिक्ट मिळत आहे,त्याची उत्सुकता वाढली की अस्या प्रकारचे शिलालेख सर्वत्र मिळत आहे तर नक्किच कोनी तरी लिहिले असेल व ते कोनी लिहिले व काय लिहिले या बद्दल तो जाणून घेण्यास उत्सुक झाला. व हे काय लिहिले आहे या बद्दल इतर कोणि वाचू शकत नाही म्हणून त्याला वाटले की हे काय लिहिले आहे ते आपणच वाचले पाहिजे, कारण हे जे लिहिले ते कोणीतरी महान व्यक्ती असले पाहिजे आणि त्यावर जे लिहिले ते लोकांच्या हिता चे असले पाहिजे, किंवा महत्वाचे असले पाहिजे,म्हणून त्याने आव्हान केले की जिथे कुठे असे रॉक एडिक्ट मिळाले तर ते माझ्या कडे पाठवा. त्या वेळी एक वेगळीच क्रांती निर्माण झाली ,ज्याना अश्या प्रकारचे लेख दिसले की त्यांचे चित्र काढून त्यांचे कडे पाठवायचे व जिथे शक्य होईल तिथे प्रत्यक्ष जात असे ,अशाच प्रकारचे रॉक एडिक्ट श्रीलंका,चाइना ,बंगला देश,अफगाणिस्तान व पाकिस्तान इत्यादी ठिकाणी मिळू लागले ,प्रत्येक स्क्रिप्ट चा त्याने तौलणिक अभ्स्यास केल्या नन्तर त्याला काही अक्षरा मधे बरेच साम्य दिसले .त्यापैकी शेवटचे अक्षर हे एक सारखे होते. एकदा बाप्तीस वेन्चूरा फ्रेच जनरल ,महाराज रणजितसिंह च्या दरबारात रावलपिंडी येथे उत्खनन करित असते वेळी त्याला एक शिलालेख मिळाला तो त्याने जेम्स प्रिन्सेप कडे पाठविला ,अशाच प्रकारचा शिलालेख बहरुत येथे मिळाला,सहा महिन्या च्या दिर्घ प्रयत्ना नंतर आणि प्रत्येक शब्दाचा एनालीसीस करुन शेवटचे अक्षर सारखेच दिसत असल्यामूळे ते अक्षर दानम किंवा दान आहे हे (देय धम्म)वाचण्यात त्याला यश मिळाले,व त्या अधारावर त्याने सर्व शिलालेखाचे वाचन केले ते वर्ष होते 1837.बहुतेक सर्व शिलालेखा च्या सुरुवातीला देवाणपीय पिय्यद्सी राजा लेखा पिता असे लिहिलेले असायचे, तर सुरुवातीला असे वाट्ले की हा श्रीलंकेचा राजा असेल,परंतु संनती येथे एका शिल्पा मधे राया असोका असा शिलालेख आढळून आला त्यामूळे जेम्स प्रिन्सेप ची खात्री पटली की, हे सर्व शिलालेख महान चक्र वर्ती सम्राट अशोक राजानेच लिहिले आहे. अशा प्रकारे महान सम्राटाचा शोध 1837 मधे लावला व ते सर्व साहित्य त्याने एसियटिक सोसायटी ऑफ़ बंगाल च्या मिटींग मधे पेश केले व अश्या प्रकारे महान सम्राट अशोका चे साहित्य जगासमोर आणले.एक दूरदर्शी प्रजा हित दक्ष,दयाळू,प्रजेला आपली संतांन मानणारा राजा, बुद्ध शासंन execute करणारा जगासमोर आणला. हा जगातील मानवी इतिहासातील सर्वात मोठा शोध होता.त्यांचे हे अदभूत कार्य बघून अनेक students व schollars त्याच्या कडे आकर्षीत झाले .देश विदेशतील विविध भागातून त्यांचे कडे अनेक शिलालेख किंवा त्यांचे ठसे प्रत्यक्ष आनून देत किंवा पोस्टाने पाठवित होते. ते वाचन करणे व भाषांतर करणे या करिता तो दिवसांचे अठरा अठरा तास काम करित असे.C.Beadon इंजीनियर गोल्ड माईन मधे काम करुन घरी परत येते वेळी मास्कि,जिल्हा रायचूर karnataka येथे त्याला एका दगडावर काही तरी कोरले आहे असे दिसून आले ,त्याची माहिती लगेच जेम्स ला देण्यात आली. जेम्स ने त्याचे वाचन केले व तो सम्राट अशोक चा चवथा शिलालेख म्हणून घोषित केले व 2200 वर्षापूर्वी सम्राट अशोक चे राज्य व त्याची moral writings जेम्स प्रिन्सेप ने जगाला माहित करुन दिली.
त्याला प्रश्न पडला की एवढा मोठा महान सम्राट पृथी वरुन कसा काय गायप झाला,लोकांच्या कसा काय विस्मरणात गेला.त्या नन्तर बरेच भारतीय लेखकानी सम्राट अशोक चे चरित्र त्यांच्या पुढे ठेवले व म्हणाले की सम्राट अशोक किती महान होता,परंतु त्याने त्यांचे कडे जरा सुद्धा लक्ष दिले नाही उलट त्याने त्या लेखकाला प्रश्न केला की तुमच्या कडे जर सम्राट अशोक बद्द्ल एवढी माहिती होती तर मग तुम्ही अगोदर का जगाला सांगितली नाही, तर जेम्स ला त्या लेखकांच्या सम्राट अशोक च्या इतिहासा बद्दल शंका निर्माण झाली , म्हणून जेम्स ला वाट्ले की आपणच सम्राट अशोक चा खरा इतिहास लिहावा.परंतु अगदी कमी वयात म्हणजे 22 एप्रिल,1840 ला अति परिश्रम केल्या मुळे त्याला मेंदूचा आजार झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
त्यांच्या या महान कार्या बद्दल 1839 मधे महान botanist जॉन फोर्बेस रॉयल यानी एका palnt ला prensepia हे नाव दिले.
1861 मधे Archaeological Survey of India ची स्थापना झाली व सर Alexander Cunningham हे प्रथम डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्त केले.त्या दोघानी अनेक ठिकाणी उत्खनन केले व बौद्ध इतिहास जगसमोर आणला.सर जेम्स प्रिंसेप ला वाटत होते की आपन जे साहित्य जगासमोर आणले ते Corpus Inscriptonium Indicarium म्हणून पब्लिश व्हावे असे वाटत होते परंतु त्यांचा अल्पावधित मृत्यू झाल्या त्यामूळे ते सर Alexander Cunningham ने 1877 मधे पब्लिश केले.त्यानी अफगाणिस्थान, पाकिस्तान मधे सुद्धा उत्खनन केले,1843 ला एसियटिक सोसायटी औफ़ कोलकत्ता आणि Citizen औफ़ कलकत्ता या सर्वानी मिळुन हुगली नदीवर प्रिन्सेप घाट बांधला व त्याची design W.Fitzgerald ने केली.
सर जेम्स प्रिन्सेप व सर alexander Cunningham हे खास मित्र होते ते दोघे ही क्रिस्चियन धर्माचे असुन त्यानी भारतात उत्खनन करुन बौद्ध धर्माचा इतिहास जगा समोर आणला.ते म्हणाले की आम्ही बुध्दाचे अनुयायी म्हणून बुध्दाला श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.
याच बरोबर त्याचे लेखण व साहित्य सुद्धाआहे, Banaras Illustrated, Coins Weights Measure British India,History of Punjab and Essay on Indian Antiquities.
त्यांनी बेंगाल एसीयाटीक सोसायटी स्थापन केली जेम्स प्रिन्सेप त्यांचे सेक्रेटरी होते.
सर जेम्स प्रिन्सेप यांच्या 225 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
शामराव सोमकुवर
0 टिप्पण्या