Top Post Ad

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी चौकशीसाठी समितीची स्थापना


 पुण्यातील प्रोबेशनरी (प्रशिक्षणार्थी) सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची नुकतीच पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. त्या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत. . व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणे, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करुन स्वतःसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई यासंबंधीची मागणी वारंवार करणे. परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी त्यांच्या मागण्या करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे.

पूजा खेडकर यांच्या चमकोगिरीच्या गोष्टी राज्यभरात चघळल्या जात असतानाच त्यांचा आणखी एक प्रताम समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुण्यात वास्तव्यास असताना पूजा खेडकर ज्या ऑडी कारचा वापर करत होत्या त्या कारवर अनेक दंड (चालान) ठोठावण्यात आले आहेत. पूजा खेडकर वापरत असलेली कार त्यांच्या खासगी अभियांत्रिकी कंपनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचं पोलीस तपासांत निष्पन्न झालं आहे. या कारवर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २१ तक्रारींची नोंद आहे. तसेच या कारवर २७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, जो अद्याप वसूल केलेला नाही. कारण पुणे पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

दरम्यान ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात चौकशीसाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती पूजा खेडकर यांच्या निवडीबाबत करण्यात आलेले दावे आणि इतर तपशिलांची चौकशी करणार आहे.प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं त्यांच्याबाबत सध्या प्रचंड चर्चा आहे. 

आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेल्या आयएएस प्रोबेशनरी ऑफिसर पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी बनावट रेशनकार्डचा वापर केल्याचे समोर आले आहे. भारतीय नागरी सेवेतील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. दृष्टीदोष व मानसिक आजारी असल्याचे बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून त्यांनी सरकारी नोकरी बळकावल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

यूपीएससी आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी खोटा पत्ता आणि बनावट रेशनकार्डचा वापर केला. पूजा खेडकर यांनी प्लॉट क्रमांक ५३, देहू-आळंदी, तळवडे हा पत्ता यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलला (वायसीएम) सादर केला. मात्र, ज्या जागेवर तिने आपले घर असल्याचा दावा केला, तो भाग थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या बंद पडलेल्या कंपनीची जागा आहे. बनावट शिधापत्रिका तयार करण्यासाठी खोट्या पत्त्याचा वापर करण्यात आल्याचे दर्शविणारी कागदपत्रे मिळाल्याचा दावा इंडिया टुडेने केला आहे. त्यानंतर पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून पुण्यातील वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले. २४ ऑगस्ट २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात पूजा खेडकर यांना गुडघ्यात सात टक्के अपंगत्व असल्याचे नमूद करण्यात आले होते.

खेडकर यांचा बनावट पत्ता असलेल्या थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग या कंपनीअंतर्गत ऑडी कारची ही नोंदणी करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून २ लाख ७० हजार रुपयांची थकबाकी आहे. या आरोपांशिवाय पूजा खेडकर यांच्यावर सत्तेचा गैरवापर आणि पोलिस अधिकाऱ्यांना धमकावल्याचाही आरोप आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) संचालक असताना पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा सविस्तर अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारला सादर केला. पूजा खेडकर चे प्रशिक्षण थांबविण्यात आले असून तिच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी तिला लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत बोलावण्यात आले आहे.

पूजा दिलीप खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना परीविक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली. प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी प्रशासनाचे कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित होते. मात्र तिथे ऋजू होण्याच्या आधीच त्यांनी अवास्तव मागण्या करणे सुरू केले. त्यांच्या विनंत्या मान्य करुनसुद्धा त्यांनी काही ना काही कारणाने तक्रारी करतच राहिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रारी नोंदवल्या. अखेर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार नोंदवली. पूजा खेडकर  व्यवसायाने डॉक्टर आहेत. 2022 मध्ये बहुविकलांगता या प्रवर्गातून या पदासाठी निवड झाली आहे.  2021 मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेत त्यांची सहायक संचालक या पदावर नियुक्ती झाली होती. 2021 मध्येही त्या बहुविकलांगता (PwBD5) या प्रवर्गातून नागरी सेवा उत्तीर्ण झाल्या होत्या.  2022 मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांचा 821 वा क्रमांक होता. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे देखील महाराष्ट्र शासनात ज्येष्ठ अधिकारी होते. तर त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथ बुधवंत वंजारी समाजातील पहिले सनदी अधिकारी होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com