उद्योग-व्यवसायात येऊ इच्छिणारे मराठी नवोदितच नाही, तर सध्या उद्योग-व्यवसाय करत असलेल्यांकरिता मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने यज्ञार्थ या उद्योजकांसाठी दिशादर्शक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा एकूण १३ महिन्यांची असणार आहे. गुरुवार १८ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या मार्गदर्शनपर सत्रात (Introductory) कार्यशाळेचे उदिष्ट आणि कार्यशाळेचे स्वरूप याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एका दिवशी प्रत्येकी तीन तासांचे १ सत्र आयोजित केले जाणार आहे. अशी सलग १२ सत्रे घेण्यात येतील. हे पहिले मार्गदर्शक सत्र सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे सायं ४ ते ८ या वेळेत होईल. अशी माहिती मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी स्वप्निल राणे, महेश बापट, मेहुल माने, मजीदर पेडणेकर यांच्यासह मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप चव्हाण देखील उपस्थित होते.
१३ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३९ तासांच्या या कार्यशाळेद्वारे उद्योग-व्यवसाय करण्यासाठी मराठीजनांची मानसिकता तयार करण्यासोबतच त्यांना प्रोत्साहीत केलं जाईल. तसंच व्यवसायाचं प्रभावी नियोजन कसे करावे? व्यवसायाचे अर्थकारण कसे हाताळावे? लक्ष्यपूर्तीसाठी विचार-कृतीत सुसूत्रता कशी आणवी याचे मार्गदर्शन करण्यात येईल. सेल्स- मार्केटिम म्हणजे काय? ते कसे करावे? ग्राहकाभिमुख व्यवसाय कसा उभा करावा ? व्यवसायात येणाऱ्या आव्हानांना सामोरे कसं जावं याचेही धडे देण्यात येतील. उद्योजकांसाठी महत्वाचा असलेल्या नेतृत्व गुण वाढीसाठी तसंच परस्पर सहकार्य भावनेने काम करण्याची सवय लागावी यासाठी कार्यशाळेत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
'यज्ञार्थ' या कार्यशाळेला आंतरराष्ट्रीय किर्तीचे बिझनेस कोच सचिन कामत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून ही कार्यशाळा मराठी भाषेतून असणार आहे. अशाप्रकारच्या कार्यशाळेसाठी प्रति सदस्य साधारण १ ते २.१.५० लाख इतके शुल्क आकारले जाते. मात्र तीच यशस्वी उद्योजक घडवणारी कार्यशाळा MCC मार्फत अवघ्या १.३,५००/- रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या बॅचमध्ये फक्त १०० जणांना ही सुवर्णसंधी मिळणार आहे. मराठी तरुण-तरूणींनी उद्योग व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेऊन रोजगार स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध कराव्यात आणि मराठी उद्योग-व्यवसायाची पताका सातासमुद्रापार फडकवावी, या उदात्त हेतूने मराठी चेंबर ऑफ कॉमर्सने हे एक सकारात्मक पाऊल उचललं आहे.
मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अर्थात MCC ही संस्था मराठी उद्योजक व्यावसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, उत्कर्षासाठी गेली ४४ वर्ष अविरत प्रयत्न करत आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. 'महाराष्ट्र व्यापारी पेठ' सारखे व्यापारी- उद्योजकांसाठी हक्काचे एक व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. त्यातच आता एक पाऊल पुढे टाकत, उद्योजकांची एक नवीन पिढी घडवण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे. याचकरीता सर्वांसाठी जे उद्योजक आहेत आणि ज्यांना उद्योजक बनायचं आहे अशासाठी ही कार्यशाळा असणार आहे. तसेच त्यासाठी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स चा सदस्य असणं बंधनकारक नाही. तेव्हा अधिकाधिक संख्येने उद्योगक्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या आणि सध्या उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अर्थात MCC. मराठी उद्योजक-व्यावसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, उत्कर्षासाठी अविरत प्रयत्न करत आहे. संस्थेच्या माध्यमातून आपण विवीध योजना राबविल्या आहेत. 'महाराष्ट्र व्यापारी पेठे' सारखे व्यापारी- उद्योजकांसाठी हक्काचे एक व्यासपीठ निर्माण केले आहे. त्याचबरोबर चायना बिझनेस टुर, बिझनेस नेटवर्किंग मिटिंग्स आणि एक दिवसाच्या व्यावसायिक कार्यशाळा हि भरवल्या आहे. आज संस्थेला ४४ वर्ष पूर्ण होत असताना संघटनेने मराठी उद्योजकांची एक नवीन पिढी घडवण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.मराठी व्यक्तीला उद्योग करता येत नाही, मराठी व्यक्ती उद्योग व्यवसायात टिकू शकत नाही, असं नेहमीच हिणवलं जातं. परंतु खऱ्या अर्थाने घरात व्यवसाय-उद्योगाला पूरक वातावरण नसणे, व्यवसाय वृध्दीसाठी योग्य मार्गदर्शन नसणे, विचारात व कृतीत सुसूत्रता नसणे, भविष्याची शाश्वती न वाटणे, अशी त्यामागची मुख्य कारणे आहेत. असं असलं तरी गेली अनेक दशकं मुंबई-महाराष्ट्रच नाही तर देशाच्या उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रावर अनेक दिग्गज मराठी उद्योजकांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. अशा उद्योजकांची उज्ज्वल परंपरा महाराष्ट्रातील तरूणाईने पुढे न्यावी, उद्योजकांची एक नवी पिढी घडावी हा उद्देश आहे. या कार्यशाळेद्वारे उद्योग-व्यवसाय करण्यासाठी मराठीजनांची मानसिकता तयार करण्यासोबतच, त्यांना प्रोत्साहीत केलं जाईल. तसंच व्यवसायाचं प्रभावी नियोजन कसे करावे, व्यवसायाचे अर्थकारण कसे हाताळावे, तसंच लक्ष्यपूर्तीसाठी विचार-कृतीत सुसूत्रता आणवी याचे मार्गर्शन करण्यात येईल. सेल्स- मार्केटिंग म्हणजे काय ? ते कसे करावे ? ग्राहकाभिमुख व्यवसाय कसा उभा करावा ? व्यवसायात येणाऱ्या आव्हानांना तोंड कसं द्यावं याचेही धडे देण्यात येतील. नेतृत्व गुण वाढीसाठी व परस्पर सहकार्य भावनेने काम करण्याची सवय लागावी यासाठी कार्यशाळेत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी ८९२८५३४३८१
0 टिप्पण्या