: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी लढा दिला. त्यांची आठवण जतन करण्यासाठी सातारा बस स्थानक शेजारी क्रांतीस्तंभ उभारण्यात आलेला आहे. सध्या क्रांती स्तंभाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे . या क्रांती स्तंभाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांवर नव क्रांती करण्याची वेळ राज्यकर्त्यांनी आणलेली आहे .
याबाबत माहिती अशी की, भारतीय स्वतंत्र संग्राम १९४२ चलेजाव चळवळीची आठवण जतन करण्यासाठी सातारच्या प्रति सरकार स्मारक क्रांतीस्तंभ उभारण्यात आले. या क्रांतीस्तंभचे पायाभरणी सोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०१६ रोजी तात्कालीन सातारा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आले. ही संकल्पना सातारचे प्रति सरकार स्मारक समितीने केली. त्याकाळी सुमारे २५ लाख खर्च करून या क्रांतीस्त्यांची उभारणी करण्यात आली. त्यावर क्रांतीकारक क्रांतिसिंह नाना पाटील, रावसाहेब कळके, शेख काका, जोशी काका, अच्युतराव पटवर्धन, बापूराव जगताप, कमलाबाई शेडगे, लक्ष्मीबाई नायकवडी, अरुणा अश्रफ अली, महादेव सिरगे, बापू कचरे, बापूजी साळुंखे, बाबूजी पाटणकर, गणपतराव पाटील, लाला इंगळे व जंगम गुरुजी अशा अनेक मान्यवरांची नावे कोरली गेलेली आहेत. आज याच क्रांती स्तंभाला बेवारस झाडे झुडपांनी आलिंगन दिलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तू संग्रहालयाच्या शेजारी या क्रांतीस्तंभाकडे जाण्यासाठी असलेल्या दरवाजाला फक्त कुलूप असून बाकीचा सांगाडा उघडा पडलेला आहे. हाच उघडा सांगाडा राज्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकत आहे. सदरच्या क्रांतीस्तंभाची देखभाल व दुरुस्ती राज्यकर्त्यांकडून होत नसेल तर या ठिकाणी सामाजिक संस्थेकडे ही जागा सुपूर्द करून त्यांच्यामार्फत या जागेची निगा राखावी. अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, शहर सुधार समितीचे असलम तडसर कर शाहीर शहाबुद्दीन शेख शेतकरी संघटना व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब राजेशिर्के, वंचित च शहराध्यक्ष मिलिंद कांबळे व उपाध्यक्ष अमोल गंगावणे व सातारकर नागरिकांनी केली आहे.
------------------------------------
या क्रांतीस्तंभ शेजारी असलेल्या संग्रहालयात ऐतिहासिक शिवकालीन वागणके दिनांक 19 जुलै रोजी आणण्यात येणार आहे यावेळी अनेक रथी महारथी उपस्थित राहणारे तत्पूर्वी या क्रांती मला न्याय मिळेल का? याची सातारकर प्रतीक्षा करत आहेत.
---------------------------------------
(अजित जगताप)
0 टिप्पण्या