Top Post Ad

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नव्या दमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे - ना. डॉ. रामदास आठवले

 


 रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नव्या दमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन सायबर पँथर्स सज्ज असून प्रस्थापित पक्षांच्या आयटी सेल इतकीच भरीव कामगिरी करतील असा विश्वास  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.  पक्षाच्या सोशल मीडिया व आयटी सेलच्या प्रशिक्षण व संवाद शिबिराला संबोधित करताना ते बोलत होते.  आतिश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आयटी सेलची बांधणी संपूर्ण महाराष्ट्रभर झाली आहे. आपले सायबर पँथर्स पक्षाची बाजू चांगल्या प्रकारे मांडत आहेत. पण सोशल मीडियावर विरोधकांकडून अनेक वेळा विचित्र भाषेचा प्रयोग केला जातो. अशा परिस्थितीत शांतपणे उत्तर देऊन आपल्या पॉलिटिकल भूमिकेची मांडणी करणे गरजेचे आहे. प्रत्येकाला आपली गोष्ट पटलीच पाहिजे असे नाही, मात्र लोकशाहीच्या मूल्यांना धरून आपली भूमिका मांडायला हवी असे आठवले यांनी स्पष्ट केले. 

 


यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पार पडलेल्या पक्षाच्या सोशल मीडिया व आयटी सेलच्या या शिबिरात समाज कल्याण विभाग आणि एससी एसटी हबच्या अधिकाऱ्यांनी सायबर पँथर्स ना विविध रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आलेल्या प्रमुख सायबर पँथर्स सह  शिबिराला माजी राज्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, ईशान्य भारताचे प्रभारी विनोद निकाळजे, महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम सोनवणे, सुरेश दादा बारसिंग,  पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड, सुमित वजाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  पक्षाची ध्येयधोरणे, भूमिका आणि उपलब्धी सोशल मीडियावर प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच पॉलिटिकल सायबर वॉरमध्ये यशस्वी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य असल्याचे मतही यावेळी आठवले यांनी व्यक्त केले.   


डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून विरोधकांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची आणि प्रस्थापित पक्षांना आपली ताकद दाखवण्याची जबाबदारी सायबर पँथर्सवर असल्याचे आतिश कांबळे म्हणाले. महाराष्ट्रातील व देशातील प्रत्येक महिन्याला करत असलेल्या लाखो किलोमीटरच्या दौऱ्यांची माहिती दिली. त्यांनी आयटी सेलच्या माध्यमातून या गोष्टींची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही केले..

          या वेळी मुंबई अध्यक्ष उमाजी सपकाळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र सोनवणे, मुंबई सरचिटणीस किशोर कांबळे, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, उत्तर पश्चिम मुंबई अध्यक्ष रमेश पाईकराव,  ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाश वानखेडे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण, जळगाव जिल्हाध्यक्ष महेंद्र करणकाळे, नाशिक शहराध्यक्ष सागर सोनवणे, सांगली जिल्हाध्यक्ष विशाल काटे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष विकास राऊत, बांद्रा तालुका अध्यक्ष संतोष बिरवटकर, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अंकुश हिवाळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष मंगेश मोकळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.           सूत्रसंचालन आयटी सेलचे सरचिटणीस सचिन कटारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयटी सेलचे संपर्कप्रमुख महादेव साळवे यांनी केले. 

यावेळच्या विधानसभा निवडणूकीत किमान जागा मिळवून पक्षातील काही नेत्यांना आमदारकी मिळवण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे असून यावेळच्या निवडणूकीत आपल्या पक्षाला जागा मिळाल्याच पाहिजे अशी आग्रही भूमिका  पक्षाचे अध्यक्ष या नात्याने आठवले यांनी घ्यावी अशी चर्चा मात्र यावेळी कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.  


मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष संदीप चव्हाण यांचा आजच वाढदिवस असल्याने त्याचे औचित्य साधून रिपब्लिकन आय.टी.सेलचे प्रमुख अतिश कांबळे यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले  यावेळी चव्हाण यांनी देखील आय.टी.सेलच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com