Top Post Ad

रुग्णवाहिकेअभावी अन्यायग्रस्ताची तडफड...सरकारकडे न्याय मागत असतानाच ...अन्याय

राज्यभरातून लाखो आंदोलनकर्ते मुंबईत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आले आहेत. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात दिवसा उकाडा व सायंकाळी पाऊस असल्याने आंदोलनकर्त्यांची त्रेधातिरपीट उडत असताना स्त्री परिचर संघटनेच्या एका पुरुष आंदोलनकर्त्याला आकडी आली. कुणी चांमड्याची चप्पल त्यांच्या नाकाला लावली तर कुणी कांदा आणा म्हणून ओरडू लागले. पोलिस व बघ्यांची गर्दी वाढू लागली पत्रकारांच्या कॅमेरा क्लिक व आंदोलनकर्त्यांच्या मोबाईल क्लिक सुरू असताना तो अन्यायग्रस्त तडफडत होता.आकडी ( फिट ) येऊन बेशुद्ध अवस्थेत तडफडू लागल्यानंतर पोलिसांची व बघ्याची गर्दी आझाद मैदानात होऊ लागली, मात्र सरकारने आझाद मैदानात रुग्णवाहिका न ठेवल्याने आंदोलनकर्ते भर पावसात संतप्त झाले होते. या  सर्व गडबडीत सरकारी रुग्णवाहिका मात्र मैदानात दिसत नव्हती. आज आकडी आली उद्या कुणालाहार्ट अटॅक आला तर सरकारकडे काय उपाय योजना आहे ? असा सवाल आंदोलनकर्ते करत होते. न्याय मागण्यासाठी येत असतानाच अन्याय होत आहे. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्ते करत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com