Top Post Ad

सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी बौद्धांना संधी द्या


  राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे ३१ जुलैला सेवानिवृत होत आहेत त्या रिक्त जागेवर बौद्धसमाजातील आय ए एस अधिकारी यांची नियुक्त करावी असि मागणी आंबेडकरी चळवळीतील जेष्ट सामाजिक कार्येकर्ते समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी सरकारकडे केली आहे ।सामाजिक न्याय विभाग हा वंचित घटकाचा विकास करणारा महत्वाचा विभाग मानला जाते पाच महामंडळे शिवाय बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी, अमर सारख्या महत्वाच्या विद्यार्थी परदेश शिक्षण संशोधन करणारे व उच्चपदस्य अधिकारी निर्माण करणारे विभागही याच खात्यात येतात शिवाय घरकुल योजना सारख्या अनेक योजना मागासवर्गिय समाजाची उन्नती करणारे कामही याच विभागात मोडते सर्वात जास्त आर्थीक बजेट याच विभागाला मिळते म्हणून या निधीचा उपयोग मागासवर्गिय वर्गालाच व्हावा असी अपेक्षा असते 

परंतु मागासवर्गियाचा निधी ईतरत्र ओळविला जातो अनेक वर्षापासून चालत आलेले आहे त्यामुळे ज्याला प्रश्नाची जान आहे गरीबीतून सनदी अधिकारी झाला अश्या बौद्ध अधिकीरी यांची सचिव पदी निवड करावी असेही समाजभूषण उतमराव गायकवाड यांनी सूचविले आहे ।।बौद्ध समाजात अनेक मात्तबर अनुभवी सनदी अधिकारी आहेत तर मागासवर्गीय महामंडळे विविध या खात्यातील योजना यावर वचक बसेल आलीकडच्या काळात तर दिंडी वारकरी संप्रादाय वारकरी महामंडळही या विभागास जोडले आहे. फेलोशिप बाबतीत वंचित आर्थीक दुर्बल विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे २०१८ पासून २०२४ पर्यंत विद्यार्थी व्यवस्थीत फेलोशिप मिळत नाही म्हणून या अन्याया विरोधात लढत आहेत या विभागाचा निधी ईतरत्र वर्ग केला जातो म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने सरकारवर ताशेरे ओढले बौद्ध अधिकीरी असावा म्हणून बौद्धोतर समाजाची मागणी आहे शिवाय या पूर्वी अनेक बौद्ध अधिकारी यांनी सचिव म्हणून जबादारी पार पाडली आहे. एक तर या विभागास स्वतंत्र मंत्री नाही मुख्यमंत्री यांनी हे अत्यंत महत्वाचे व श्रीमंत खाते आपल्याकडे ठेवले आहे त्यामुळे मागास सामादाला विद्यार्थ्यासह पोहचता येत नाही समाजाचे कामे आडली जात आहेत म्हणून बौद्ध अधिकारीच दिला पाहिजे तरच काही प्रमाणित विकासाला चालना मिळेल मंत्र्याची उणीव कमी होईल असेही समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com