महाराष्ट्र शासनाकडे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि.२३ ऑगस्ट २०२३ रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग भरती प्रक्रिया २०२३ जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत सदर जाहिरातीमध्ये सर्व प्रकारचे शैक्षणिक अटी व नियमांचा उल्लेख तसेच नमुदही करण्यात आले. दिलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी आरोग्य निरिक्षक व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी अर्ज भरले. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत परिक्षेचा दिनांकाचा कालवधी ठरविण्यात आला. सदर कालावधी हा परिक्षा घेण्याचे कालावधी दि.३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२३ असा होता. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परिक्षा सुध्दा दिली. सदर परिक्षेचा निकाल हा त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीचे शासनाचे अधिकृत वेबसाईट वर दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी निवड यादी जाहिर करण्यात आली.
निकाल प्रसिध्द केल्यानंतर जी यादी प्रसिध्द करण्यात आली त्या ७५ संस्थांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी स्वच्छता निरीक्षक कोर्स चालविण्याचे मान्यता देण्यात आलेली नाही. असे २० फेब्रुवारी २०२४ रोजी ७५ शासन मान्य संस्थेची सह संचालक पुणे कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आले. मग अशा संस्थांमधुन कोर्स पुर्ण करणे कसे शक्य आहे ? तरीही वरील संस्थेच्या यादीनुसार नियुक्ती मिळेल असे सांगण्यात आले व त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दि.२१ फेब्रुवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालवधी कागदपत्राची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान तेव्हाच्या मा. अवर सचिव, आरोग्य सेवा, सेवा-५, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांनी ७५ शासन मान्य संस्था व्यतिरिक्त सेवा नियम २०२१ नुसार दोन संस्थांना समकक्ष ग्राह्य धरल्यास हरकत नाही असे आशयाचे पत्र काढले. त्यानुसार त्या संस्थेतील विद्यार्थी आज रोजी नियुक्ती आदेश घेऊन सेवा देत आहेत. इतर संस्थेच्या सर्व ४७७ विद्यार्थ्यांनी ज्या संस्थेमधुन कोर्स पुर्ण केला आहे. त्यांचा अभ्यासक्रम हा समान आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे. की आम्हाला समकक्ष या पदभरती पुरते ग्राह्य धरुन नियुक्ती आदेश मा. मेहरबान साहेबांनी द्यावेत.
हा सर्व परिक्षेचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत राबविण्यात आला. तसेच कागदपत्राची पडताळणी होऊन देखील मागील ५ महिन्यापासुन अद्यापही या विद्यार्थ्यांना नियुक्तीचा आदेश देण्यात आलेला नाही. याबाबत वारंवार संबंधित विभागाशी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष संपर्क साधुन वेळोवेळी त्यांना निवेदन देण्यात आले. तरीही कोणतेही उत्तर मिळत नसल्याने हे विद्यार्थी प्रचंड संतापले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती प्रक्रिया २०२३ मध्ये निरिक्षक / बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी निवड झालेल्या ४७७ विद्यार्थ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात यावे. जोपर्यंत नियुक्ती मिळत नाही. तसेच न्याय मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत जाहिर केले.
२६.६.२०२४ रोजी मा.आरोग्य मंत्री, तानाजी सावंत यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी ४८ तासात तुमचा निर्णय लावतो असे आश्वासन दिले परंतु आज जवळ जवळ २० दिवस झाले असुन अद्यापपर्यंत काहीही निर्णय झालेला नाही. म्हणून या सर्व ४७७ विद्यार्थ्यांनी दिनांक १५ जुलै २०२४ पासुन आझाद मैदान, मुंबई येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण मार्गाचा अवलबंला आहे. गेल्या ५ महिन्यापासुन आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या या विद्यार्थ्यांमुळे यांचा परिवार अत्यंत ताणतणावाखाली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे मुलं असणारे हे विद्यार्थी. मुंबई व इतर भागात अत्यंत प्रमाणात पाऊस असूनही या परिस्थितीत आंदोलन करीत आहेत. मात्र प्रशासनाला याची कोणतीही दखल घ्यावीशी वाटत नाही. मा.ना.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व मा.ना.तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तसेच संबंधित प्रशासकीय विभागाला याद्वारे आम्ही विनंती करीत आहोत की आम्हाला त्वरीत न्याय देण्यात यावा असे आवाहन या विद्यार्थ्यांनी यावेळी केले.
0 टिप्पण्या