Top Post Ad

अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत कारवाईचा धडाका

 


 मुंबई महानगरपालिकेने केले अनधिकृत १,१८६ हातगाड्या, १,८३९ सिलिंडर व २,४१० इतर साहित्य जप्त

मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत दिनांक १८ जून ते जुलै या गत सतरा दिवसात विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे ५ हजार ४३५ साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे.  ज्यामध्ये चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान एकूण ५,४३५ जप्त करण्यात आले. ज्यामध्ये चारचाकी हातगाड्या - १,१८६, सिलिंडर – १,८३९, स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडे इत्यादी विविध प्रकारचे साहित्य – २,४१० यांचा समावेश आहे.

मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱया तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱया फेरीवाल्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जाते. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीसांनी संयुक्त कार्यवाही सुरू आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com