Top Post Ad

चला निसर्ग मित्र बनूया.... चला निसर्ग मित्र बनवूया


भविष्यात पोटात ओरिजिनल अन्न टाकायचा असेल आणि शेती करायची असेल तर यावर्षी आपल्या घर आणि दुकानाचा बाहेर बाहेर 1/1 झाड आणि शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल. 

🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.
🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.
एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.
🌳आता नाही तर कधीच नाही.
🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने
     पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देवदूत मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.
।। *वृक्ष वल्ली आम्हा सोयरे* *वनचरे* ।।
🌳 *" निसर्ग मित्र व्हा "*
🌴चला निसर्ग मित्र बनवूया, चला निसर्ग मित्र बनवूया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com