Top Post Ad

संविधान वाचलं पाहिजे...संविधान वाचलंच पाहिजे.


  लोकशाही मध्ये लोकनियुक्त  लोकप्रतिनिधिचं सरकार हा लोकशाहीचा आत्मा असतो असा हा लोकशाहीचा आत्मा २०२४ च्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचा टप्पा पार करून संसदेमध्ये सरकारपंथी तत्वास दुर सारुण सरकार पदी नियुक्त झाला,स्वातंत्र्याची सत्याहत्तरी पार करत असतांना आझादी का अमृत महोत्सव ही आपण स्वाभिमानाने साजरा केला,पुंढील वर्षी आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करु ,संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपण प्रवेश करत असतांना १८ वी लोकसभा निवडणुक महत्वपूर्ण ठरते कारण कधी नव्हे ते या वर्षी झालेली लोकसभा निवडणुक संविधानाभोवती फिरली. "संविधान वाचलं पाहिजे" या एका तीन अक्षरी शब्दांच्या वाक्यावर १८ वि लोकसभा निवडणुक लढल्या गेली

निवडणुक प्रचार काळादरम्यान निवडणुकीत सहभागी झालेल्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष, धर्मांध, पुरोगामी, प्रतिगामी, अशा विविध विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांनी पक्षाच्या जाहिरनामा वर भाषणं करण्याऐवजी. संविधान नष्ट होणार ते वाचलं पाहिजे... यावर अधिक प्रमाणात बोलल्या गेलं,तर शालेय शिक्षणात मनुस्मृति च्या काही श्लोकांचा समावेश करावा अशा आशयाचं नोटीफिकेशन प्रगतिशील महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षा सचिव यांनी काढलं व त्याचं काळात ज्यांच्या पासून संविधान बदललं जाईल अशी भिती पसरविली जात होती त्यांच्या मुखातुनचं.." प्रत्यक्षात आज बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी तेंही संविधान बदलु शकणार नाहीत" अशी बलदांड आरोळी ठोकल्या गेली,अशा संविधान वातावरणात निवडणूक पार पडली. संविधान वाचलं पाहिजे.. हां मक्ता घेऊन मैदानात उतरलेल्या व ज्याच्यापासुन संविधान बदलण्याची भिती होती अशा दोहों घटकांना संमिश्र यश मिळालं. निकाल आला व नुकतंच ज्यांच्यापासून संविधानास धोका होता त्यांचच सरकार शपथ ग्रहणासमयी संविधानाला शरण येऊन संविधानातील तत्वानुसार सरकार चालवू अशी भिष्मप्रतीज्ञा घेऊन  स्थानापन्न झालं ,याकरीता लोकशाही अधिक प्रगल्भ करण्याकरीता निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्व जीत-पराजित मान्यवरांच अभिनंदनचं!


सरकार स्थानापन्न झालं,निवडणुक संपली, व खरी लढाई आता सुरु होईल संविधानानुसार सरकार चालतं किंवा नाही यावर बारकाइने अभ्यासपूर्ण दिवसरात्र लक्ष ठेवायला हवं , संविधान नियमावली प्रमाणे भारतातील प्रत्येक घटकातील समाज समूहाच्या व्यक्तींचा व त्याच्या कुटुंब कल्याणकारीता काय उपाय योजना आखल्या जातात? संविधानाने रोजगार आरोग्य व मानवीय कल्याण हेतु केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या करीता दिलेल्या समाविष्ट मार्गदर्शक सुचना नियमावली नुसार प्रत्यक्षात अमंलबजावणी करणारी यंत्रणा विकसित केल्या जात आहे का हे पाहणं प्रत्येक व्यक्ति दृष्टया महत्वपूर्ण असलं पाहिजे,आणि  हे होत नसेल तर.. "संविधान वाचलं पाहिजे हे म्हणण्या आधी ते आपण वाचलं पाहिजे".. व ते वाचल्यानंतर त्या प्रमाणे सरकार ने कार्य केले पाहिजे या साठी नागरीकांनी रस्त्यावर नाक्यावर चौकाचौकात उपक्रम राबवले पाहिजे ,संविधान वाचलं पाहिज.. असा टाहो फोडुन संसदेत पोचलेल्यांनी संसद सभागृहात आवाज उठवला पाहीजे आणि येणाऱ्या काळात आपण यावर कार्य केले नाही तर "संविधान वाचलं पाहिजे" ही लढाई तुम्हीं भोंदू,ढोंगी होऊन लढली हे सिद्ध होईल, तुम्हीं ढोंगी नाही आहात हे सिद्ध करण्यासाठी किमान तुम्हाला लढावं लागेल ,तरचं भविष्यात निर्माण होऊ पाहणारया पिढीकरीता भविष्यकालीन उदरात जन्म घेणारी नवसृजन पिढी करीता स्वयंप्रकाशीत स्वावलंबी भारत निर्माण होईल. भारत भूमिवर वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक घटकातील मानव समूहाच्या प्रत्येक व्यक्तींच्या सर्वांगीण उन्नति होऊन स्वयंप्रकाशीत स्वावलंबी भारत निर्माण करीता स्थानापन्न सरकार,विरोधी पक्ष व समस्त भारतीय नागरिकास मंगलमय सदिच्छा!

  • लोकसभा निवडणुक २०२४ एक परिमार्श!
  • ॲड.पुजा प्रकाश एन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com