कॉंग्रेसनेते राहूल गांधी यांनी का शेअर मार्केटमधील घोटाळा उघडकीस आणला. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निर्मला सितारमण यांनी मतमोजणीच्या एक दिवस आधी लोकांना शेयरबाजारात गुंतवणुकीचं आव्हान केलं. मात्र यात लोकांचे लाखो रूपये डुबले. काही धनधांडग्यांचा फायदा झाला. याच्या चौकशीची मागणी राहूल गांधीींनी केली होती.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना शेअर बाजारातील अनियमित व्यवहाराच्या मुद्द्यावरुन लक्ष्य केले. पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी मतदानाच्या निकालापूर्वी लोकांना 'गुंतवणुकीचा सल्ला' दिला होता. यात सहभागी असलेल्या 'बनावट' पोलस्टर्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे.. तसेच त्यांनी ३० लाख कोटी वापरुन 'बनावट' एक्झिट पोल रचण्यात आल्याचे देखील नमूद केले. मतदानाच्या निकालापूर्वी भाजप नेत्यांनी ५ कोटी कुटुंबांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास का प्रोत्साहन दिले? तसेच "दोन्ही मुलाखती एकाच माध्यम समूहाला का दिल्या, ज्यांची सध्या शेअर बाजारात फेरफार केल्याप्रकरणी सेबीची चौकशी सुरू आहे? भाजप, बनावट एक्झिट पोलर्स आणि संशयास्पद विदेशी गुंतवणूकदार यांच्यात काय संबंध आहे? ज्यांनी एक्झिट पोल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी गुंतवणूक केली आणि पाच कोटी कुटुंबांमार्फत मोठा नफा कमावला.
या मागणीची अर्थ मंत्रालयाने माजी सचिव ईएएस सरमा यांनी दखल घेत आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांना पत्र लिहिले आहे. अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय आणि सीबीडीटीकडून शेअर बाजारातील या घसरणीची चौकशी करण्याची मागणी या पत्रातद्वारे केली आहे. सेबीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे का, असा सवालही सरमा यांनी यावेळी केला. एनडीएच्या निर्णायक विजयाच्या एक्झिट पोलच्या भाकीतांमुळे, BSE सेन्सेक्सने आठवड्याची सुरुवात २५००च्या वाढीव अंकांनी ७६,४६९ च्या विक्रमी उच्चांकावर नेली. तथापि, मंगळवारी मतदानाच्या निकालानंतर ४३९० गुणांची मोठी घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या ३१ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचा चुराडा झाला. एका क्षणी मोठ्या प्रमाणात शेअर विक्रीमुळे सेन्सेक्स ६००० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर आता तो सावरला आहे, गुरुवारी ६९२ अंकांनी वाढून ७५,०७४ वर बंद झाला.
.'लोकसभेच्या निकालाच्या दिवशी ४ जून रोजी भाजप विक्रमी आकडा गाठणार असून तेव्हा शेअर बाजारही नवा विक्रमी उच्चांक गाठेल, असं मी खात्रीपूर्वक सांगतो', असे नरेंद्र मोदी दिनांक २३ मे रोजी म्हणाले होते. मात्र निकालाच्या दिवशी बाजार कोसळला होता. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भारतातील पाच कोटी नागरिकांना गुंतवणुकीचा सल्ला का दिला होता? गुंतवणुकीचा सल्ला देणे हे त्यांचे काम आहे का? शेअरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सेबीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या एका उद्योग समूहाच्या मालकीच्या टीव्ही चॅनल्सना मोदी आणि शहांनी मुलाखती का दिल्या? असा सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत केला आहे. शेअर बाजारातील या मोठ्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
'मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेच्या तयारीत असल्याने शेअर बाजार वाढत आहेत.' असे म्हणाले आहेत. तर 'राहुल गांधींनी अजूनही स्वपक्षाचे लोकसभा निवडणुकीतील नुकसान भरून काढलेले नाही, आता ते बाजारातील गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा कट रचत आहेत.गेल्या दहा वर्षांत शेअर बाजाराच्या वाढीचा सर्वाधिक फायदा किरकोळ आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांना झाला आहे,' गुंतवणूकदारांच्या भीतीबद्दल काळजी वाटली पाहिजे. कारण काँग्रेस अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत असताना बाजार कोसळला होता. आता लोकांना विश्वास आहे की मोदी सरकार परत येत आहे आणि बाजार स्थिर झाला आहे तसेच बाजाराच्या मागील उच्चांकांवर पुन्हा स्थिरावणार आहे.' तसेच 'नवीन सरकारचा सुधारणेचा अजेंडा देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक काळात सुरू राहील, - उत्तर मुंबईचे नवनिर्वाचित खासदार पीयुष गोयल
0 टिप्पण्या