Top Post Ad

जगभरात कागदी मतपत्रिका वापरल्या जात असताना आपल्याला मशीन्स का हव्यात


  प्रत्येक निवडणुकीचे निकाल लागले की, मुख्य माध्यमं असोत की, सोशल मिडिया असोत की, विचारवंत समीक्षक असोत, या सगळ्यांना घाई होते. भाजप आणि संघाच्या केडर , बूथ व्यवस्थापन आणि निवडणूक व्यवस्थापन कौशल्याच्या कौतुकाचे पूल बांधायची; तशीच, कथित सोशल इंजिनिअरिंग म्हणजे, जातीच्या राजकारणात कोण जिंकलं... याचा उहापोह करण्याची आणि सोबत मेलेल्या कॉंग्रेसपक्षावर अजून दोन चार धपाटे घालायची. हे सगळे भेकड आणि बुळगे विचारवंत ट्रोल होण्याला घाबरतात; का, आयोगाला घाबरतात की, आणखी कुणाला घाबरतात कुणास ठाऊक. झापडं ओढून बसलेल्या लोकांना साधे बेसिक प्रश्न पडत नाहीत की, मतदारांना हे तद्दन मूर्ख आणि बावळट समजतात ? हे तथाकथित लिबरल आणि विचारवंत पहिल्यांदा जोड्याने बडवले पाहिजेत. जगभरात कागदी मतपत्रिका वापरल्या जात असताना, अमेरिका सुद्धा कागदी मतपत्रिका वापरत असताना आपल्याला मशीन्स का हव्यात आणि आपल्या निवडणूक यंत्रणेत काही दोष असू शकतात...हे तुम्ही मान्यच करत नाहीत, हा नेमका कुठला बोटचेपेपणा. 

नाशिक महानगरपालिका निवडणुकीत घडलेलं उदाहरण. एका अपक्ष उमेदवाराला शून्य मतं पडलेली...त्याचं मतदान, त्याच प्रभागात असताना. माणूस किमान स्वतःला मतदान करेल ? निदान त्याची लेकर बायको मतदान करतील ? शून्य मतदान ? तरीही, हे भंगार लोक मशीन निर्दोष म्हणून टिर्या बडवतात. अशी वेळोवेळी अनंत उदाहरणं समोर आलेली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत नेमकं किती मतदान झालं आणि किती मत मोजली गेली; याची अचूक आकडेवारी निवडणूक आयोगाला वेबसाईटवर टाकायला दीड वर्षे वेळ झाला नाही, तो कशामुळे ? सगळं संगणकावर असताना दीड वर्षे का लागावीत ? एक दोन, हजार नव्हेत; तर, १९ लाख ईव्हीएम मशीन्सचा हिशोब लागत नाही; त्याची याचिका कोर्टात अजूनही तशीच पडून आहे, कुठे गेलीत ती १९ लाख मशिन्स ?

लोक बावळट असतील; पण, एवढेही बावळट नाहीत.  निदान शेतकरी नक्कीच माठ आणि बावळट नाहीयेत.   लखमीपूर खिरीमध्ये, जिथे शेतकरी चिरडून मारले तिथल्या अठरा जागा भाजपने जिंकल्या.  त्याच जिल्ह्यात भाजपचे नेते फिरकत नव्हते, त्यांना अनेक ठिकाणी गावातून हुसकून लावलेलं होत. शेतकरी चिरडून मारलेल्या गावात, आंदोलन सुरु असताना आणि त्यानंतर, ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री उद्दामपणे पदावर बसून राहिला... त्याबद्दल सातत्याने शेतकरी संताप व्यक्त करत असताना अवघ्या सहा आठ महिन्यात झालेल्या निवडणुकात लोक सगळे विसरुन भाजपला निवडून देतात ? आणि, हे तुम्हाला पचत ?  हाथरसमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येतो ? एवढं कांड झाल्यावर पण ? गोरक्षकाच्या झुंडीने माणसं मारलीच; पण, तपास करणारा पोलीस अधिकारी पण मारला, नागरिकत्व-कायद्याच्या वेळेस, शेतकरी आंदोलनाच्या वेळेस प्रत्येकवेळेला सामान्य लोकांना तुडवून काढल्यावर पण लोकांनी एवढं भरघोस मतदान केलेलं आहे ? 

विकासाच्या नावाने लोकांनी मतदान केलं, असले अचाट दावे लोक बेशरमपणे करतात. ११० रुपये पेट्रोल आणि १०० रुपये डिझेल घेऊन, ४५ वर्षातली सगळ्यात जास्त बेरोजगारी, बंद पडणाऱ्या कंपन्या आणि बुडणाऱ्या बँका घेऊन कसला कर्माचा विकास साधला जातोय ? मतदानाला गेलेले भय्ये पुन्हा बोचके डोक्यावर घेऊन मुंबईत पोट भरायला येणार असतील; तर, लिहिणाऱ्या पत्रकाराची फटफटी काय पाण्यावर चालते काय ?
बरं, हे झाल्यावर लगेच बिनतोड सवाल केला जातो, पंजाबमध्ये काय ?
ममतादीदी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होत्या. त्यांचा राजकीय इतिहास जे विसरलेत आणि ज्यांना, त्यांना दुर्गा वगैरे उपमा द्याव्याश्या वाटतात, त्यांच्यासाठी हे तथ्य विसरलं जातय का ? बंगालमध्ये ममता दुसऱ्यांदा आल्या, त्यावेळी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि कॉंग्रेस डावे संपले.
पंजाबमध्ये आपने भाजपचा पराभव केलाय का ? तिथे कॉंग्रेस आणि अकाली दोन्ही संपले. भाजपला तिथं तसं पण गमवायला काहीही नव्हतं. 

अतिशय गांभीर्याने सांगतोय, ममता दीदी आणि केजरीवाल...हे दोघेही एकाधिकारशाही पद्धतीने राज्य चालवणारे नेते आहेत, भलेही ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले असले तरीही. प्रत्येकवेळेला, ज्या राज्यात भाजपला गमवायला काहीही नसतं, तिथेच दुसरा पक्ष निवडून येतो...हा योगायोग अतिशय दुर्मिळ आहे. प्रत्येकवेळेला, सदोष निवडणूक यंत्रणेवर टीका केली की, भाजप निवडून न आलेलं एक राज्य दाखवून सगळे नामानिराळे होतात, जिथे भाजपला काहीच गमवायचं नव्हतं; तिथे गमवले कुणी, हा प्रश्न मात्र कुणालाच पडत नाही.  सगळे पत्रपंडित हिंदुत्व कार्ड चाललं म्हणून बिल फाडून मोकळे होतात. त्यांच्याकडे, भाजपच्या ओस पडलेल्या सभा, मोकळ्या खुर्च्या, भाजप नेत्यांना झालेली गावबंदी आणि शेतकरी आंदोलनात असलेला लोकांचा आक्रोश, शेतकरी आंदोलनात दिलेली आश्वासन न पाळण्यामुळे जाहीरपणे शेतकऱ्यांनी केलेली टीका, यावर काय उत्तर आहे ? हे सगळच फक्त हिंदुत्व एवढ्याच मुद्द्याखाली कानाडोळा करावं इतकं सोप आहे ? 

युपीमध्ये मतपेट्या आणि मशीन्सची वाहतूक करताना झालेला गलथानपणा सगळ्यांनी पाहिलेला आहे, तिथं सुरक्षेसाठी गुजरात पोलीस का मागवले ? महाराष्ट्र पोलीस, छत्तीसगड पोलीस, तामिळनाडू पोलीस का नाही बोलावले ? ज्यांना ज्यांना म्हणून वरील प्रश्नांची समाधानकारक उत्तर सापडलेली आहेत, त्यांनी ती मांडावीत. आम्हाला राजकीय पंडितांएवढं ज्ञान नसलेही; पण, आम्हाला माणसांच्या जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात, अशा भारतातले आम्ही नागरिक आहोत. आम्हाला वरील प्रश्न पडलेले आहेत आणि त्याची उत्तरं आमच्यासाठी महत्त्वाची आहेत...या अशा, आणि यापुढे होणाऱ्या (झाल्याच तर) निवडणुका, निव्वळ धूळफेक असणारेत. गुजरात मॉडेल नावाचा खोटारडेपणा करुन निवडून आलेले, १५ लाख फक्त जुमला होता म्हणणारे , फोटोशॉप करूनच प्रचार करणारे, मिडीयाला हाताशी धरून विखारी प्रचार करणारे, कोरोनाच्या आपत्तीमध्ये सुद्धा पीएम-केअर फंड काढून पैसे लाटणारे ,स्वायत्त संस्था मोडीत काढून सगळ्या यंत्रणा बटीक करणारे लोक निवडणुका नि:पक्ष आणि अतिशय अचूक करतात, यावर ज्यांचा भरवसा आहे अशा लोकांच्या बुद्धीला कोपरापासून दंडवत!

आनंद शितोळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com