Top Post Ad

२४ ते ३० जून, गोव्यात हिंदु राष्ट्र महोत्सव


हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे संपन्न होणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस सर्वाेच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता  घनश्याम उपाध्याय, विरार येथील श्रीजीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य  प्रदीप तेंडोलकर आणि ‘मराठा वॉरीअर्स् गड-किल्ले संवर्धक’चे संस्थापक-अध्यक्ष   राहुल खैर हेही उपस्थित होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर पुढे म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांचे परिसंवाद, तसेच प्रत्यक्ष समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी गटचर्चा असतील. ‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा’, ‘धर्म आणि राष्ट्रविरोधी नॅरेटीव्हला प्रत्युत्तर’, ‘हिंदु समाजाच्या रक्षणाचे उपाय’, ‘हिंदु राष्ट्रासाठी संवैधानिक प्रयत्न’, ‘मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे उपाय’, ‘वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचे रक्षण’, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्‍या हलाल अर्थव्यवस्थेवर उपाय’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, ‘गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे’ यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विविध विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.

सर्वाेच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय म्हणाले, ‘कट्टरवादी मुसलमान भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा स्थितीत आज जनसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता आहे. भारत हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आताच पावले उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल’. *विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य श्री. प्रदीप तेंडोलकर म्हणाले*, ‘आज केवळ हिंदूंची मंदिरेच शासनाच्या ताब्यात आहेत. भक्त्यांच्या ताब्यात हिंदूची मंदिरे आली पाहिजेत त्यासाठी आमचा लढा सुरु आहे. देश स्वतंत्र झाल्यावर भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हायला पाहिजे होते, ते साध्य होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नरत आहोत’. तर ‘मराठा वॉरीअर्स् गड-किल्ले संवर्धक’चे संस्थापक-अध्यक्ष राहुल खैर यावेळी म्हणाले ‘आज महाराष्ट्रासह अनेक राज्यांत गड-दुर्गांवर अतिक्रमणे झाली आहेत. सरकारने याकडे लक्ष देऊन कृती करण्याची मागणी आम्ही या हिंदू राष्ट्र अधिवेशनात देखील करत आहोत.’

 हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर शेवटी म्हणाले की, या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, घाना, नेपाळ आणि बांग्लादेश या देशांतून प्रतिनिधी येणार आहेत. या देशांसह भारतातील २६ राज्यांतील १००० हून अधिक हिंदु संघटनांच्या २००० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने इंदूर येथील महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगड येथील  श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, छत्तीसगढ येथील ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.


  याशिवाय श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी, तसेच काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक कपिल मिश्रा, भारताचे माजी माहिती आयुक्त तथा ‘सेव कल्चर सेव भारत’चे संस्थापक उदय माहूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. 

भारताचार्य पू. सु.ग.शेवडे, वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, प्रख्यात शल्य चिकित्सक आणि लेखक डॉ. अमित थढानी, व्ही.पी.बेडेकर एंड सन्स प्रा.लि.च्या मालक श्रीमती अनघा बेडेकर, रायगड येथील शिवराज्याभिषेक सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार आदी मान्यवरांसह मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३५ विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकूण ७५ प्रतिनिधीही या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.   या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या ‘फेसबुक’द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी दिली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com