Top Post Ad

... आणि आंदोलन भडकवण्याचे मनसुबे उधळले गेले


 शालेय शिक्षणात मनुस्मृर्ती व ईतर धार्मीक श्लोक टाकण्याच्या निषेद्धार्थ तीन चाकी सरकार विरोधात महाड येथे वाजतगाजत मनुस्मृर्तीचे दहन केले आणी जीव गेला तरी चालेल परंतु मनुचा शिरकाव शालेय पाट्यापुस्तकात करू देणार नाही असी भीम प्रतिज्ञा भीमाचे वाघ डॉ जितेंद्र आव्हाड यांनी केले परंतु दुर्दैवाने किंवा नजर चुकीने कार्यकर्ते यांनी आणलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असणारे मनुस्मृर्तीचा मजकूर असणारे पत्रक अनावधाने कार्यकर्ते यांच्या बरोबर डॉ आव्हाड यांनीही फाडली. चुकून झालेली ही महाचुक साऱ्या देशाने पाहिली ही नकळत झालेली चुक आहे परंतु लक्षात आल्यावर त्यांनी पश्चाताप स्विकारून आंबेडकरी समाज तसेच देशाची माफी मागितली. झालेली चुक मला मान्य करावी काही आंबेडकरी लोकात निषेध भावना जरूर उमठल्या नकळत झालेली चुक आहे हेही लक्षात आले. सातत्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर निष्ठा ठेवणारे आमदार मंत्रीपदाची व ईतर भाषणे व्हिडीओ प्रवचने देतांना जयभीम म्हणनारे डॉ आव्हाड मुद्दाम चुक करणार नाहीत हे लक्षात आले 

परंतु या विषयाचा बाऊ करून निषेध आंदोलने करण्याचा नारा भाजपा प्रदेश अध्यक्ष बावणकुळेनी दिला त्यांच्या जोडीला शिवसेना राष्ट्रवादी व काही बगलबच्चे धावून गेले ३० तारखेला आंदोलन केले. अगदी खालच्या दर्जाचे आपल्या आंदोलनात आंबेडकरवादी मोठ्या ताकतीने उतरतील ते मोठे आंदोलन उभारतील, महाराष्ट्रात हंगामा होईल, स्पोटक वातावरण निर्माण होईल आणी आपले सरकार  घेऊ पहात असलेल्या निर्णायाला पाठबळ मिळेल अशीच भूमिका होती. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरा विषयी एकाएकी आलेला पुळका ओळखायला आंबेडकरी समाज दुधखुळा राहिलेला नाही. त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद तर मिळालाच नाही पण त्यांच्या पक्षातीलही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माणनारा कार्यकर्ता उतारला नाही तेथे आंबेडकरवाद्याचा तर प्रश्नच येत नाही उलट अनेक आंबेडकरी संघटना सामाजिक संघटनेने आपले आव्हाडाच्या बाजूने मत नोंदविले अनावधाने झालेली चुक आहे त्यांनी तात्काळ जाहिर माफी मागितली आहे वाईट जरूर वाटले परंतु सरकारविरोधी रागाच्या भरात झालेली चुक आहे 

वास्ताविक पहाता ही कोणाच्या नाकर्तेपणामुळे झाली कोणामुळे आव्हाडाला आणी का महाड येथे मनुस्मृती जाळायला भाग पडले कोण आंबेडकरद्रोही कोण आंबेडकर समर्थक आंबेडकरी अनुययी याचे उतर भाजपाला माहित आहे. शालेय पाट्यपुस्तकात मनुस्मृतीचे श्लोक टाकण्याची प्रक्रिया सरकारने चालविली नसती तर डॉ आव्हाडला मनुस्मृती जाळण्याचा प्रसंग आला नसता आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नकळत फाडला गेला नसता उलट सरकारच्या विरोधात तात्काळ सर्वात प्रथम उतारले याचे आंबेडकरवाद्यानी स्वागत केले डॉ आव्हाडाची खरोखरच चुक असती तर आंबेडकरवाद्यानी भाजपा व मित्र पक्षाला आंदोलन करण्याची संधीच दिली नसती एवढे प्रचंड आंदोलन देशात उभे ठाकले असते भाजपाचे नकली आंदोलन राजकिय स्टंड तेही निष्फळ ठरले

डॉ जितेंद्र आव्हाड यांचे अभीनंदन त्यांच्या आंदोलनामुळे अंगावर घेतलेल्या केसेसमुळे महाराष्ट्र सरकारला शालेय पाट्यपुस्तकात मनुस्मृती व इतर धार्मीक श्लोक टाकण्याची स्वप्नातही हिम्मत होणार नाही. आपल्या जातीयवादी कटकारस्थानावर पांघरून घालण्यासाठी केलेला तो डाव होता. जोआंबेडकरी समाजानेच पालथा ऊघडा पाडला एका बाजूला चारसो पार सविधान बदलण्याच्या वल्गना भाजपातील नेत्यांनी केल्या त्या विरोधात डॉ आव्हाडाने इतराप्रमाणे सर्वात अगोदर रान उठविले लगेच माघारी फिरले हीच परीस्थीती मनुस्मृतीची झाली. देवेंद्र फडणवीस, केसरकर यांना निवेदन करावे लागले असा विचार नाही प्रस्ताव नाही श्लोक टाकले जाणार नाहीत. पलटी मग ना़ रामदास आठवलेना वेड लागले होते काय केसरकराला फोन करायला आणी पत्र द्यायला. काय उत्तर दिले केसरकरने सार्या महाराष्ट्राने ऐकले आहे डॉ आव्हालाही का वाटले मनुचा शिरकाव होऊ देयाचा नाही म्हणून महाडला आंदोलन करावे लागले. आपले पाप झाकण्यासाठी नकळत झालेल्या चुकाचे कोलीत भाजपा मित्र पक्ष य़ांना मिळाले आणी डॉ आव्हाड सारख्या सच्चा आंबेडकरी नेत्याचे सामाजिक राजकीय जीवन उद्वस्त करायचे कारस्थान आखले गेले. पण नितीला हे मान्य नव्हते म्हणून जगाला ओळख असणार्या अन्याय अत्याचारा विरोधात लढणार्या आंबेडकरी समाजाने भाजपाचे मनसुबे उधळून लावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com