Top Post Ad

तर... सपूर्ण मुंबईच्या झोपडपट्टीधारकांचा वकीलनामा घेऊन मी ही लढाई लढेन- अॅड सांजकर

 


निवारा हक्क संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष अॅड. संतोष सांजकर
१९९५ साली बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीत ४० लाख लोकांना घर देण्याचे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनावर राज्यात सेना-भाजप ची सत्ता सुद्धा आली. ४० लाख घरांचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकारने १९९६ साली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली, परंतु मागील २८ वर्षाच्या कालावधीमध्ये केवळ २ ते ३ लाख लोकांनाच घरे देण्यात आली हि वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांबाबत त्यांचे रक्ताचे आणि स्वतःला विचारांचे वारसदार म्हणवणाऱ्याना विसर का पडला. असा जाहीर सवाल उपस्थित करत, बाळासाहेव ठाकरे यांनी ४० लाख लोकांना दिलेल्या घरांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी राईट टू शेल्टरच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असल्याचे निवारा हक्क संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष अॅड. संतोष सांजकर  यांनी जाहीर केले. मुंबईतील प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

घर हा विषय सर्वांसाठी विशेष करून मुंबईकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असताना, या विषयाला सातत्याने दुर्लक्षित केले जाते आणि या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे आज मुंबईमधला गरीब, कष्टकरी, झोपडीधारकांची अवस्था फार भयावह झाली आहे.  टोलेजंग इमारतीमधून मुंबईकर कधीच हद्दपार झाला असून आता उरला सुरलेला झोपडपट्टी मधला भूमिपुत्रसुद्धा मुंबईमधून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.  शासनाच्या SRA योजनेमुळे हे काम अति जलद गतीने होत आहे. असे असताना देखील लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्याच पक्ष्याच्या अजेंड्यावर गरिबांच्या घरांचा विषय नसावा हि मोठी शोकांतिका असल्याची खत  सांजकर यांनी व्यक्त केली. 

झोपडीधारकाला सर्व स्तरावरून केवळ अन्यायाला सामोरे जावे लागत आहे हि आजची परिस्थिती आहे, एका बाजूला सरकार त्यांना अपात्र घोषित करतय, दुसऱ्या बाजूला बिल्डर त्यांचे वर्षानुवर्षांचे प्रलंबित घर भाडे देत नाही व त्यांचे पुनर्वसन निकृष्ट दर्जाचे करत आहे, तिसऱ्या बाजूला मीडिया त्यांच्या वर झालेल्या अन्यायाची नोंद घेत नाही आणि चौथ्या बाजूला माननीय न्यायालय त्यांना तारखा वर तारखा देत आहे. अशा चारही बाजुने कोंडलेल्या परिस्थितीत या गरीब झोपडीधारकाने कोठे दाद मागावी.  झोपडी धारकांचे जीवनमान उंचावणारी हि SRA योजना झोपडीधारकालाच मुंबईच्या बाहेर हाकलून लावत आहे. याच योजनेमुळे आज मुंबईमध्ये हजारो रहिवाशी/कुटुंब बेघर होत आहे, त्यांचे वर्षानुवर्षाचे घर भाडे प्रलंबित असून त्यांचे पुनर्वसन अगदी निकृष्ट दर्ज्याचे करण्यात येत आहे. या सर्व लोकांचे प्रतिनिधित्व सरकार समोर, संसदेत व न्यायालयात करण्यासाठीच या निवडणुकीत उतरलो असल्याचे अॅड. संतोष सांजकर म्हणाले. मी अनेक झोपडपट्ट्यांचा वकिलनामा स्विकारला आहे. त्यांच्यासाठी मी मा.न्यायालयात झगडत आहे. पण जर लोकप्रतिनिधी म्हणून मी निवडून आलो तर हा ताकद आणखीन वाढेल आणि सपूर्ण मुंबईच्या झोपडपट्टीधारकांचा वकीलनामा घेऊन मी ही लढाई लढेन असे आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला दिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com