सालाबादप्रमाणे यंदाही ५ मे २०२४ रोजी जगन्नाथ गॅलेक्सी ए विंग जोवेली बदलापूर यांच्या विद्यमाने विश्वरत्न,महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात, थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर या क्रांतिकारी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार, दिपप्रजोलन करुन बुद्धवंदना घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव कमिटी अध्यक्षा सौ.आरती सावंत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सावंत आणि अमोल गायसमुद्रे यांनी केले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक आयु. मंगेशदादा धुळे आणि माजी नगरसेवक आयु.चेतनदादा धुळे उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. लहान मुलांच्या कलेला वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने विविध मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मुला- मुलींनी महापुरुषांच्या जीवना आधारित भाषणे केली.
त्याचप्रमाणे अनेकांनी डान्स केले. सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना बक्षिस देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यात सौ . विद्या गायकवाड,रागिणी करवडे,स्वाती टाचतोडे, विद्या आगवणे , प्रज्ञा सोनवणे, आरती गरुड, प्रियांका माने,आयु.उमेश जाधव,नरेश तांबे,राजेंद्र कांबळे, प्रितम कर्णिक , बादल राठोड , केशव आगवणे,नंदकिशोर कोरी तसेच जगन्नाथ गॅलेक्सी ए विंग सर्वच सभासदांनी मोलाचे योगदान दिले. अनेकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या