Top Post Ad

फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन ....भारताचा अधोगतीचा प्रवास !

 


२०१४मध्ये नरेंद्र मोदी, मनमोहनसिंगांच्या काँग्रेस-सरकारवर टीका करताना म्हणत होते, "लोक विचार करत असतात की, सचिन तेंडुलकरची 'सेंच्युरी' प्रथम पुरी होणार की, कांद्याच्या भावाची 'सेंच्युरी' पुरी होणार?" तेव्हा, गटारातून स्वयंपाकाचा गॅस तयार करणारे आणि पाकिस्तानी रडारला चकवण्यासाठी ढगाआडून बालासोर 'सर्जिकल-स्ट्राईक' करायला लावणारे...'फेकू-सम्राट' नेहमीप्रमाणेच एक वर्षाअगोदरच (२०१३) क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला सचिन तेंडुलकर, जणू अजूनही फलंदाजी करत असल्याचं, आपल्या राजकीय सोयीसाठी भोळसट जनतेला भासवत होते! ...आणि, विशेष म्हणजे, मनमोहनसिंगांच्या नव्हे; तर, नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातच 'कांद्याने सेंच्युरी' पार केली होती! ...ना शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या, ना शेतकर्‍यांचं उत्पन्न दुप्पट झालं, ना त्यांना किमान आधारभूत किंमत किंवा MSP मिळाली...उलटपक्षी, त्यांना त्यांच्याच शेतातून उखडून फेकून देत शेतजमिनी, मोदींच्या 'गुजराथी-भाषिक' काॅर्पोरेटीय-मित्रांना आंदण देण्यासाठी, 'तीन काळे शेतकी-कायदे' लादण्याचा, निर्घृण प्रयत्न करुन पहाण्यात आला.

खाद्यतेलाचे भाव तिप्पट, स्वयंपाकाच्या गॅसचे अडीच पट; तर, इंधन तेलाचे दुप्पट वाढले...'महागाई' नावाचा उंदीर, सामान्य जनतेचे खिसे गेल्या १० वर्षात कुरतडत राहीला...'महागाई' नावाचा कागदावर नसलेला म्हणून 'अदृश्य'; पण, प्रत्यक्षात होरपळून काढणारा व प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे रोज वाढणारा 'कर' (Inflation-Tax) एखाद्या निष्णात खिसेकापूसारखा मोदी-सरकारच्या कार्यकाळात, जनतेचे खिसे सतत कातरत राहीला...गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाची घरं भरत राहीला! 'नोटबंदी' करताना जाहीररित्या सांगितलेल्या एकाही उद्दिष्टाची पूर्ति होणं तर खूप दूरच राह्यलं (आणि, असं काही अपयश आल्यास, आपल्याकडे फक्त ५० दिवसांची मुदत मागणारे पं. नरेंद्र मोदी, शिक्षा म्हणून भरचौकात फास लावून घेणार होते)...पण, शंभरावर अधिक माणसं 'नोटबंदी'त केवळ रांगेत उभी राहून मेली; तरी, नोटबंदीचं समर्थन करणारे अजून ढोल बडवतायत; त्यांना, जनतेनं 'व्होटबंदी' करण्याचं मनावर घेतलंय, घ्यायलाच पाहिजे! 

...तशीच, शेकड्यांनी माणसं शेतकरी-आंदोलनात मारली गेली, मंत्र्यांच्या मुलाच्या गाडीखाली चिरडली गेली...तरीही, नरेंद्र मोदींचं न थकता गुणगान करणार्‍या 'अंधभक्तां'चं, हे केवळ, भाजपाई-संघीय 'आयटी-सेल'कडून झालेलं ‘संमोहन'च नव्हे; तर, ती त्यापलिकडची 'मनोरुग्णता' किंवा 'नमोरुग्णता' आहे! ...आणि, ४ जूनला 'मावळते पंतप्रधान' बनणाऱ्या (सध्या, ते निवडणुका घोषित झाल्यापासून 'हंगामी पंतप्रधान' आहेत) पं. नरेंद्र मोदींच्या अतिशय खालच्या पातळीच्या धर्मविद्वेषी भाषणांना प्रतिसाद म्हणून, आजही चाललेला त्यांचा जल्लोष, समाजमाध्यमांवरची उन्मादी भाषा व विकृत-विखारी संदेश पेरणी...ही सारी थेरं म्हणजे, 'नरेंद्र-भक्ति'साठी डोक्यातील 'मेंदू' नावाचं इंद्रिय' बाजुला काढून ठेवल्याचं, एक व्यवच्छेदक लक्षण होय! या भारतानं  गांधींच्या रुपाने 'फादर ऑफ नेशन' पाहिला आणि भ्रष्टाचार मिटवण्याच्या बाता मारणाऱ्या नरेंद्र मोदींच्या रुपाने 'इलेक्टोरल-बाॅण्ड'च्या महाघोटाळ्यातून 'फादर ऑफ डोनेशन' पाहिला* (तसे, नोटबंदी, PMCare फंडासारखे, इतर अनेक घोटाळे उघडकीला यायचेच अजून शिल्लक आहेत)!

दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याच्या थापेबाजीवर विसंबून राहिलेल्या, बेरोजगार-अर्धरोजगार तरुणाईच्या हाती... लष्करी-सेवेत औटघटकेचे 'अग्निपथावरील अग्निवीर' बनण्याचे किंवा खाजगी क्षेत्रातील नोकरीत "१२ तासाला १२ हजाराच्या पगाराचे" 'कंत्राटी-गुलाम' बनण्याचे...शब्दशः पोळून काढणारे 'निखारे', मोदी-शहांच्या भाजपा-सरकारकडून ठेवण्यात आले! ...जसा, सचिन ३९व्या वर्षी निवृत्त झाला; तसे, हे काही स्वतःहून निवृत्त होऊन बीजेपीच्या 'मार्गदर्शक-मंडळा'त जाऊन बसणार नाहीत (की, आपल्या कार्यकाळात केलेल्या कुकर्मांमुळे तुरुंगात जातील?). तेव्हा, आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यापिढ्यांना...बाकी सगळं तर सोडाच; पण, *निव्वळ 'मोकळा श्वास' घ्यायचा असेल; तर, नरेंद्र मोदींना, या लोकसभा-निवडणुकीतून आपल्याला सक्तिने 'निवृत्त' करायलाच हवं... नव्हे, तो 'भारतीय-अध्यात्मा'त वर्णिलेला, आपला सद्यस्थितीतला 'आपद्धर्म'च होय आणि तेच, जाज्वल्य 'हिंदुत्व' होय!  ...अन्यथा, या थापेबाज, फसव्या, लुटारु व निर्दयी शोषक 'गुजराथी-लाॅबी'मुळे, अवघं मराठी-जगणं नासून तर जाईलच...जगण्याची 'कोंडी' केली जाऊन ते महाकर्मकठीण होऊन तर बसेलच; पण, आपल्या हलाखीच्या स्थितीबद्दल अश्रू ढाळायलाही महाराष्ट्रातला एखादा कोपरा, ही 'गुजराथी-लाॅबी' आपल्यासाठी शिल्लक ठेवणार नाही!

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com