मुंबई, ठाणे, नवीमुंबईत् मुसळधार अवकाळी पावसासहित वादळी वाऱ्यामुळे आज अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या . मुंबई महानगर पालिकेच्या इमारतीची कौले उडाली तसेंच मुंबई मराठी पत्रकार संघाचा भला मोठा फलक वाऱ्यामुळे तुटून खाली पडला. घाटकोपर मध्ये जाहिरातीचे होर्डिंग कोसळले तर वडाळ्यात इमारती शेजारी तयार करण्यात आलेला लोखंडी जिना पत्त्यासारखा कोसळला. ठाणे परिसरातही अनेक झाडे कोसळली असली तरी कोणतीही जिवितहानी झाली नाही.
घाटकोपर् मध्ये कोसळलेल्या होर्डिंग खाली पेट्रोल पंपावर कोसळलेल्या लोखंडी होर्डिंग खाली अनेक गाड्याचे नुकसान झाले. तसेच् अनेक जण अडकले. मुंबईत प्रथमच आलेल्या पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर रमाबाई कॉलनी येथील अनधिकृत जाहिरातीचे होर्डिंग्ज पेट्रोल पंपावर कोसळले. सदर होर्डिंग्ज अनेक महिन्यांपासून विनापरवाना लावल्याची प्राथमिक माहिती असून या अपघातात काही लोक मृत्यूमुखी पडले असून १०० च्यावर लोक या होर्डिंग्ज खाली अडकले आहेत. या प्रकरणी जाहिरात कंपनी सबंधित पालिका अधिकारी यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतांच्या नातेवाईकांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रिय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे..
तसेच - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र.प्रवक्ता आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबई.अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी देखील
सदरील हॉर्डींग अनधिकृत असून संबंधित ऍड कंपनी, रेल्वे प्राधिकरण आणि या अनधिकृत होर्डिंगकडे अक्ष्यम दुर्लक्ष करणाऱ्या मुंबई महानगर पालिका विभागाचे अधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबई याविरुद्ध तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे
असाच एक प्रकार वडाळा येथे घडला असून या घटनांमुळे पालिका प्रशासन आणि जाहिरात कंपन्यांचे साटेलोटे समोर आले आहे. अशा प्रकारे सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मुंबईतील सर्व जाहिरात कंपन्या तसेच पालिकेच्या सर्व सबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी.मुंबईतील सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्यात यावेत.दक्षता म्हणून मुंबईतील धोकादायक इमारती, झाडे, डोंगरावरील वस्त्या यांचा आढावा घेवून कार्यवाही करावी तसेच घाटकोपर मधील घटनेप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा जखमींना उपचारासाठी मदत तसेच मृत्यांच्या नातेवाईकांना आर्थिक सहाय्य करण्यात यावे अशा मागण्या भीम आर्मीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
0 टिप्पण्या